8.9.15

भूतान बाईक ट्रीप - पूर्वातयारी - कागदोपत्री

मे २०१२ ला मी लंडन वरुन काम संपवून कायमचा मुंबईत परतलो. याच दरम्यान नाचऱ्याने सर्वांना भूतान बाईक ट्रीप बद्दल ई-मेल पाठवला होता. जे कोणी या ट्रीपसाठी इच्छुक असतील त्यांनी अभिजीतला लागणारी त्यांच्या बद्दल ची  सर्व माहिती मागवली होती. मी नाचऱ्याच्या परवानगीने हा ई-मेल अभिजीत राव आणि सिद्धेश शिरसाटला पाठवला. कारण मी आणि अभिजीत रावने पण या ट्रीप बद्दल बरेचदा चर्चा केल्या होत्या. रावने आणि मी बऱ्याच छोट्या मोठ्या बाईक ट्रीप एकत्र केल्या आहेत. लेह बाईक ट्रीप नंतर सिद्धेश व त्याची मैत्रीण उर्वशी मला बोलली होती कि अश्या बाईक ट्रीप वर त्यांना पण यायला आवडेल. उर्वाशीचे मला फार काही जास्त माहीत नव्हती, म्हणून मी तिच्या बद्दल पक्के धरले नव्हते.

नाचऱ्या बरोबर सिद्धेशने एक - दोन ट्रेक केले होते आणि राव बद्दल त्याला जास्त काही माहिती नव्हती. त्यामुळे तो थोडा चिन्तादायक होता. पण मला बाईक ट्रीपसाठी रावची संपूर्ण खात्री होती आणि मी त्याची सर्वस्वी जवाबदारी घायला तयार आहे असे सांगितले. नाचऱ्याला माझा स्वभाव माहिती आहे, मी जर अश्या प्रकारची भूमिका घेतो तर मी खात्री पूर्वकच घेतो, नाही तर मग घेतच नाही. त्यामुळे त्याने राव आणि सिद्धेशला  पण ट्रीपसाठी सामील करून घेतले.

पुढे कालांतराने सिद्धेश मला त्याची मैत्रीण उर्वशी पण या ट्रीप वर येण्यास फारच इच्छुक आहे असे पुन्हा सांगू लागला. तसे पहिले गेले तर आता ती माझी पण मैत्रीण झाली होती. मग मला तिचा पण फोन आला आणि तीला पण भूतान ट्रीप वर यायचे आहे म्हणून ती माझ्या कडे  विनवणी करू लागली. जून २०१२ मध्ये मी, सिद्धेश, उर्वशी आणि बाकीचे दुसरे काही मित्र मिळून गोवा परिसरातल्या सापांवर अभ्यास करण्यासाठी एकत्र काम केले होतो. तेव्हा पासून उर्वशी पण बाईक ट्रीपसाठी मस्त मुलगी आहे याची मला खात्री झाली होती. ती आणि ऐश्वर्या मिळून ट्रीप वर फारच धमाल करतील असे मला वाटत होते. मला तिच्या येण्या बद्दल काही हरकत नव्हती आणि मी जर तिच्या येण्या बद्दल बोललो असतो तर नाचरे ही काही बोलला नसता. पण तरी ही औपचारिकता म्हणून मी सिद्धेशलाच तिच्या बद्दल नाचरेला विचारायला सांगितले. नाचऱ्याने उर्वशी बद्दल माझ्याकडे चौकशी करून तिला येण्याची परवानगी दिलीच.

बर्याच जणांनी अभिजीत नाचरेला त्यांचे येण्याचे नक्की केले आणि काही नेहमी प्रमाणे १० वेळा सांगून पण नक्की करायचे बाकी होते. पहिल्या फळीत होकार देणाऱ्यान मध्ये अभ्या - मनाली, मी, अभिजित राव, सिद्धेश, अमेय म्हात्रे आणि त्या वेळेला त्याची होणारी बायको. ट्रीप होई पर्येंत ती त्याची बायको होणार होती. एवढ्यांनी नक्की केले होते. सिद्धेश त्याच्या बायकोला म्हणजे अनन्याला या ट्रीपसाठी तयार करत होता. ऐश्वर्या व आदित्य यांचे अजून नक्की ठरायचे होते. दीपाली व अमोल यांचे पण ठरायचे बाकी होते. या वेळेला जर अमोल नाही आला तर मग दीपालीला पण येता येणार नाही. त्या दोघांना जोडप्यानेच येण्याची परवानगी नाचऱ्या कडून होती. विधुलाचे पण अजून नक्की ठरायचे होते. कुलदीप, उन्मेष, पूनम, आशिष यांनी या ट्रीपसाठी नाही असे सांगितले. राजेशला यायचे होते पण त्याल आर्थिक तयारी करायची होती आणि मग तो नक्की काय ते सांगणार होता. अभ्याने येणार्या सर्व लोकांना फाइनल रूट आणि बाकी सर्व माहिती पाठवली. यात ट्रीपसाठी येणारा खर्च आणि वगैरे - वगैरे सर्व माहिती दिली होती.

नाचऱ्याने पाठवलेल्या रूट मध्ये सिक्कीम नव्हते घेतले. मी लगेच नाचऱ्याला फोन लावला आणि सिक्कीम आपण या ट्रीप मध्ये करत नाही आहोत या बद्दल विचार पूस केली. त्याने मला वेळे अभावी सिक्कीम - भूतान एकत्र करता येणार नाही आणि त्या बदली आपण फक्त भूतानच करत आहोत असे सांगितले. त्याने मला हे ही सांगितले कि मात्र आपण भूतान संपूर्ण आणि व्यवस्थित फिरणार आहोत. सिक्कीम मध्ये बघण्या सारखे तसे बरेच जास्त काही नाही आहे, असे नाचऱ्याने सांगितले. मग मी त्याला विचारले कि जर समज तरी पण आपण  सिक्कीम पटा - पट पाहायचे ठरवले तर किती दिवस जास्त लागतील? मग तो मला बोलला कि सिक्कीम मध्ये तसे फक्त जाताना डार्जीलिंग, पुढे गॅंगटॉक आणि नथुला पास हेच करावे आणि यासाठी सुधा किमान ४ - ५ दिवस तर लागणारच. नाचऱ्याच्या मते आपल्याला भूतानलाच कमीत कमी १५  दिवस लागणार आहे आणि मग ४ - ५  दिवस अजून सर्वांना सुट्ट्या मिळणार नाही. मग मी नाचऱ्याला सांगितले की ज्यांना सिक्कीम व भूतान दोन्ही करायचे असेल त्यांना दोन्ही करू दे आणि ज्यांना फक्त भूतान करायचे आहे ते फक्त भूतान करतील. नाचरे स्वता फक्त भूतानच करणार होता. मी त्याला सिक्कीमचा व भूतान दोन्हीचा पण प्लान करायला सांगितला. अभ्याने सर्वांना सिक्कीम व भूतान दोन्ही बद्दल पण विचारणा केली, पण त्यातून फक्त मी, राव व सिद्धेशच निघालो.

अभ्याने येणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या मीटिंगसाठी भेटायचे ठरवले. पण ज्या दिवशी त्याने सर्वांनी भेटायचे ठरवले त्या दिवशी मला फक्त २ - ३ तासांसाठीच वेळ होता कारण त्या दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. मी जास्त वेळ देऊ शकणार नव्हतो. मग मी नाचऱ्याला सांगितले की मी येईन तर फार थोड्या वेळेसाठी आणि मीटिंग ठेवणार असशील तर ती माझ्या घरा पासून फार लांब नको. जसे की ठाणे, दादरला येऊन जायला मला फार वेळ होईल. मग मी त्याला पवई किंवा ठाणे घोडबंदर वगैरे असे पर्याय सुचवले. कारण हि ठिकाणे ठाण्यातल्या लोकांना पण बरे पडतील आणि मला पण. शेवटी त्याला मी घोडबंदर जवळ एक मंदिर सुचवले आणि ते त्याने मान्य केले.

आम्ही ठरवल्या प्रमाणे घोडबंदरच्या मंदिरा कडे सर्वांनी भेटायचे ठरले, त्या प्रमाणे सारेच तिकडे ठरलेल्या वेळेत पोहोचले.  मी आधीच सांगितलेल्या प्रमाणे मिटिंगला उशिराने पोहोचलो. मी गेल्या - गेल्या लगेच मीटिंगला सुरवात झाली. मंदिराच्या आवारातच खाली मांडी घालून आम्ही बसलो आणि मिटिंग चालली होती. मीटिंगसाठी नाचरे दाम्पत्य, सिद्धेश, दीपाली, अमृता, बेंद्रे बंधू - भगिनी आणि त्यांची आई पण आली होती. बेंद्रे परिवाराला मिटिंग नंतर कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे होते, म्हणून ऐश्वर्या आज साडी नेसून आली होती. सर्व आज ऐश्वर्याची मजबूत टेर खेचत होतो. मी येण्या पुर्वी सर्व मंडळी भेटली होती आणि लांबूनच ऐश्वर्याला साडीत पाहताच मी तर थक्कच झालो आणि जोरात हसायला लागलो. मी हसलेला पाहून सर्वच पुन्हा हसू लागले. नाचऱ्याने मीटिंग मध्ये भूतानचा रूट सांगितला आणि सर्वांना भूतानचा नकाशा पण दिला. बाकीची सर्व चर्चा करून त्याने प्रथम तिकीट बुकिंगसाठी पैसे पाठवण्याचे सर्वांना आवाहन केले. त्याच मिटिंग मध्ये त्याने सर्वांना सांगितले कि मी, राव व सिद्धेश सिक्कीम व भूतान दोन्ही पण करणार आहोत, जर कोणाला दोन्ही करायचे असेल तर आमच्या बरोबर करू शकतात. हे हि त्याने जाहीर केले.

आता पर्येंत येणारे म्हणून जे होत त्यात पण बरीच मंडळी गळल्याचे ही कळले. अमोल चे येण्याचे अजून नक्की काही ठरत नव्हते. तर मग मी लगेच दीपालीला बोललो "या ट्रीप वर पण तुला माझ्या मागेच तुला बाईक वर बसावे लागणार वाटते". तेवढ्यात लगेच नाचऱ्याने घोटे दाम्पत्य एकत्रच पाहिजेत या ट्रीप वर. नाहीतर दीपालीला एकटीला येता येणार नाही असे बजावले. वरुन त्याने मला पण बजाऊन सांगितले की मला या ट्रीप वर अक्षता शिवाय यायला देत आहे हि मेहरबानी समज. पुढल्या ट्रीप वर अक्षता नसेल तर मग मला एकट्याला पण यायला देणार नाही, असो बाबा नाचऱ्याच्या पुढे आमचे कुठे चालते म्हणून मी लगेच गप्प बसलो. अमेय म्हात्रे आणि त्याची होणारी बायको पण वगळल्याचे कळाले. राजेश्चेही अजून नक्की ठरायचे होते.

बेंद्रे परिवाराला पुढे जायचे होते म्हणून ते निघाले आणि आम्ही बाकी सर्व चर्चा करत बसलो. या वेळी सुद्धा मी सराव बाईक ट्रिपचा मुद्दा काढला. लेहच्या वेळी आम्ही काही सराव ट्रीप केल्या नव्हत्या हा मुद्दा हि मी बाहेर चर्चे ला काढला. मात्र या वेळी अभ्याने सुद्धा माझी बाजू घेतली आणि सराव ट्रीप वर जास्त जोर दिला. भूतान बाईक ट्रीपच्या आधी किमान ४ - ५ सराव बाईक ट्रीप करू असे ठरले आणि आमची भूतान बाईक ट्रीपची पहिली मिटिंग बरखास्त केली. मंदिरातून निघालो आणि घोडबंदरा जवळ जाऊन सर्वांनी चहा घेतला. थोडा वेळ चहा बरोबर गप्प मारल्या आणि निघालो आप - आपल्या घरी.

अभ्याने भूतान बाईक ट्रीपची अजून राहिलेली सर्व पूर्व तयारी करू लागला आणि जून - जुलै मध्ये आमची पहिली सराव ट्रीप माळशेज घाटला असे ठरवले आणि सर्वांना कळवून टाकले.

No comments:

Post a Comment