8.9.15

भूतान बाईक ट्रीप - पूर्वातयारी - कागदोपत्री

मे २०१२ ला मी लंडन वरुन काम संपवून कायमचा मुंबईत परतलो. याच दरम्यान नाचऱ्याने सर्वांना भूतान बाईक ट्रीप बद्दल ई-मेल पाठवला होता. जे कोणी या ट्रीपसाठी इच्छुक असतील त्यांनी अभिजीतला लागणारी त्यांच्या बद्दल ची  सर्व माहिती मागवली होती. मी नाचऱ्याच्या परवानगीने हा ई-मेल अभिजीत राव आणि सिद्धेश शिरसाटला पाठवला. कारण मी आणि अभिजीत रावने पण या ट्रीप बद्दल बरेचदा चर्चा केल्या होत्या. रावने आणि मी बऱ्याच छोट्या मोठ्या बाईक ट्रीप एकत्र केल्या आहेत. लेह बाईक ट्रीप नंतर सिद्धेश व त्याची मैत्रीण उर्वशी मला बोलली होती कि अश्या बाईक ट्रीप वर त्यांना पण यायला आवडेल. उर्वाशीचे मला फार काही जास्त माहीत नव्हती, म्हणून मी तिच्या बद्दल पक्के धरले नव्हते.

नाचऱ्या बरोबर सिद्धेशने एक - दोन ट्रेक केले होते आणि राव बद्दल त्याला जास्त काही माहिती नव्हती. त्यामुळे तो थोडा चिन्तादायक होता. पण मला बाईक ट्रीपसाठी रावची संपूर्ण खात्री होती आणि मी त्याची सर्वस्वी जवाबदारी घायला तयार आहे असे सांगितले. नाचऱ्याला माझा स्वभाव माहिती आहे, मी जर अश्या प्रकारची भूमिका घेतो तर मी खात्री पूर्वकच घेतो, नाही तर मग घेतच नाही. त्यामुळे त्याने राव आणि सिद्धेशला  पण ट्रीपसाठी सामील करून घेतले.

पुढे कालांतराने सिद्धेश मला त्याची मैत्रीण उर्वशी पण या ट्रीप वर येण्यास फारच इच्छुक आहे असे पुन्हा सांगू लागला. तसे पहिले गेले तर आता ती माझी पण मैत्रीण झाली होती. मग मला तिचा पण फोन आला आणि तीला पण भूतान ट्रीप वर यायचे आहे म्हणून ती माझ्या कडे  विनवणी करू लागली. जून २०१२ मध्ये मी, सिद्धेश, उर्वशी आणि बाकीचे दुसरे काही मित्र मिळून गोवा परिसरातल्या सापांवर अभ्यास करण्यासाठी एकत्र काम केले होतो. तेव्हा पासून उर्वशी पण बाईक ट्रीपसाठी मस्त मुलगी आहे याची मला खात्री झाली होती. ती आणि ऐश्वर्या मिळून ट्रीप वर फारच धमाल करतील असे मला वाटत होते. मला तिच्या येण्या बद्दल काही हरकत नव्हती आणि मी जर तिच्या येण्या बद्दल बोललो असतो तर नाचरे ही काही बोलला नसता. पण तरी ही औपचारिकता म्हणून मी सिद्धेशलाच तिच्या बद्दल नाचरेला विचारायला सांगितले. नाचऱ्याने उर्वशी बद्दल माझ्याकडे चौकशी करून तिला येण्याची परवानगी दिलीच.

बर्याच जणांनी अभिजीत नाचरेला त्यांचे येण्याचे नक्की केले आणि काही नेहमी प्रमाणे १० वेळा सांगून पण नक्की करायचे बाकी होते. पहिल्या फळीत होकार देणाऱ्यान मध्ये अभ्या - मनाली, मी, अभिजित राव, सिद्धेश, अमेय म्हात्रे आणि त्या वेळेला त्याची होणारी बायको. ट्रीप होई पर्येंत ती त्याची बायको होणार होती. एवढ्यांनी नक्की केले होते. सिद्धेश त्याच्या बायकोला म्हणजे अनन्याला या ट्रीपसाठी तयार करत होता. ऐश्वर्या व आदित्य यांचे अजून नक्की ठरायचे होते. दीपाली व अमोल यांचे पण ठरायचे बाकी होते. या वेळेला जर अमोल नाही आला तर मग दीपालीला पण येता येणार नाही. त्या दोघांना जोडप्यानेच येण्याची परवानगी नाचऱ्या कडून होती. विधुलाचे पण अजून नक्की ठरायचे होते. कुलदीप, उन्मेष, पूनम, आशिष यांनी या ट्रीपसाठी नाही असे सांगितले. राजेशला यायचे होते पण त्याल आर्थिक तयारी करायची होती आणि मग तो नक्की काय ते सांगणार होता. अभ्याने येणार्या सर्व लोकांना फाइनल रूट आणि बाकी सर्व माहिती पाठवली. यात ट्रीपसाठी येणारा खर्च आणि वगैरे - वगैरे सर्व माहिती दिली होती.

नाचऱ्याने पाठवलेल्या रूट मध्ये सिक्कीम नव्हते घेतले. मी लगेच नाचऱ्याला फोन लावला आणि सिक्कीम आपण या ट्रीप मध्ये करत नाही आहोत या बद्दल विचार पूस केली. त्याने मला वेळे अभावी सिक्कीम - भूतान एकत्र करता येणार नाही आणि त्या बदली आपण फक्त भूतानच करत आहोत असे सांगितले. त्याने मला हे ही सांगितले कि मात्र आपण भूतान संपूर्ण आणि व्यवस्थित फिरणार आहोत. सिक्कीम मध्ये बघण्या सारखे तसे बरेच जास्त काही नाही आहे, असे नाचऱ्याने सांगितले. मग मी त्याला विचारले कि जर समज तरी पण आपण  सिक्कीम पटा - पट पाहायचे ठरवले तर किती दिवस जास्त लागतील? मग तो मला बोलला कि सिक्कीम मध्ये तसे फक्त जाताना डार्जीलिंग, पुढे गॅंगटॉक आणि नथुला पास हेच करावे आणि यासाठी सुधा किमान ४ - ५ दिवस तर लागणारच. नाचऱ्याच्या मते आपल्याला भूतानलाच कमीत कमी १५  दिवस लागणार आहे आणि मग ४ - ५  दिवस अजून सर्वांना सुट्ट्या मिळणार नाही. मग मी नाचऱ्याला सांगितले की ज्यांना सिक्कीम व भूतान दोन्ही करायचे असेल त्यांना दोन्ही करू दे आणि ज्यांना फक्त भूतान करायचे आहे ते फक्त भूतान करतील. नाचरे स्वता फक्त भूतानच करणार होता. मी त्याला सिक्कीमचा व भूतान दोन्हीचा पण प्लान करायला सांगितला. अभ्याने सर्वांना सिक्कीम व भूतान दोन्ही बद्दल पण विचारणा केली, पण त्यातून फक्त मी, राव व सिद्धेशच निघालो.

अभ्याने येणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या मीटिंगसाठी भेटायचे ठरवले. पण ज्या दिवशी त्याने सर्वांनी भेटायचे ठरवले त्या दिवशी मला फक्त २ - ३ तासांसाठीच वेळ होता कारण त्या दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. मी जास्त वेळ देऊ शकणार नव्हतो. मग मी नाचऱ्याला सांगितले की मी येईन तर फार थोड्या वेळेसाठी आणि मीटिंग ठेवणार असशील तर ती माझ्या घरा पासून फार लांब नको. जसे की ठाणे, दादरला येऊन जायला मला फार वेळ होईल. मग मी त्याला पवई किंवा ठाणे घोडबंदर वगैरे असे पर्याय सुचवले. कारण हि ठिकाणे ठाण्यातल्या लोकांना पण बरे पडतील आणि मला पण. शेवटी त्याला मी घोडबंदर जवळ एक मंदिर सुचवले आणि ते त्याने मान्य केले.

आम्ही ठरवल्या प्रमाणे घोडबंदरच्या मंदिरा कडे सर्वांनी भेटायचे ठरले, त्या प्रमाणे सारेच तिकडे ठरलेल्या वेळेत पोहोचले.  मी आधीच सांगितलेल्या प्रमाणे मिटिंगला उशिराने पोहोचलो. मी गेल्या - गेल्या लगेच मीटिंगला सुरवात झाली. मंदिराच्या आवारातच खाली मांडी घालून आम्ही बसलो आणि मिटिंग चालली होती. मीटिंगसाठी नाचरे दाम्पत्य, सिद्धेश, दीपाली, अमृता, बेंद्रे बंधू - भगिनी आणि त्यांची आई पण आली होती. बेंद्रे परिवाराला मिटिंग नंतर कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे होते, म्हणून ऐश्वर्या आज साडी नेसून आली होती. सर्व आज ऐश्वर्याची मजबूत टेर खेचत होतो. मी येण्या पुर्वी सर्व मंडळी भेटली होती आणि लांबूनच ऐश्वर्याला साडीत पाहताच मी तर थक्कच झालो आणि जोरात हसायला लागलो. मी हसलेला पाहून सर्वच पुन्हा हसू लागले. नाचऱ्याने मीटिंग मध्ये भूतानचा रूट सांगितला आणि सर्वांना भूतानचा नकाशा पण दिला. बाकीची सर्व चर्चा करून त्याने प्रथम तिकीट बुकिंगसाठी पैसे पाठवण्याचे सर्वांना आवाहन केले. त्याच मिटिंग मध्ये त्याने सर्वांना सांगितले कि मी, राव व सिद्धेश सिक्कीम व भूतान दोन्ही पण करणार आहोत, जर कोणाला दोन्ही करायचे असेल तर आमच्या बरोबर करू शकतात. हे हि त्याने जाहीर केले.

आता पर्येंत येणारे म्हणून जे होत त्यात पण बरीच मंडळी गळल्याचे ही कळले. अमोल चे येण्याचे अजून नक्की काही ठरत नव्हते. तर मग मी लगेच दीपालीला बोललो "या ट्रीप वर पण तुला माझ्या मागेच तुला बाईक वर बसावे लागणार वाटते". तेवढ्यात लगेच नाचऱ्याने घोटे दाम्पत्य एकत्रच पाहिजेत या ट्रीप वर. नाहीतर दीपालीला एकटीला येता येणार नाही असे बजावले. वरुन त्याने मला पण बजाऊन सांगितले की मला या ट्रीप वर अक्षता शिवाय यायला देत आहे हि मेहरबानी समज. पुढल्या ट्रीप वर अक्षता नसेल तर मग मला एकट्याला पण यायला देणार नाही, असो बाबा नाचऱ्याच्या पुढे आमचे कुठे चालते म्हणून मी लगेच गप्प बसलो. अमेय म्हात्रे आणि त्याची होणारी बायको पण वगळल्याचे कळाले. राजेश्चेही अजून नक्की ठरायचे होते.

बेंद्रे परिवाराला पुढे जायचे होते म्हणून ते निघाले आणि आम्ही बाकी सर्व चर्चा करत बसलो. या वेळी सुद्धा मी सराव बाईक ट्रिपचा मुद्दा काढला. लेहच्या वेळी आम्ही काही सराव ट्रीप केल्या नव्हत्या हा मुद्दा हि मी बाहेर चर्चे ला काढला. मात्र या वेळी अभ्याने सुद्धा माझी बाजू घेतली आणि सराव ट्रीप वर जास्त जोर दिला. भूतान बाईक ट्रीपच्या आधी किमान ४ - ५ सराव बाईक ट्रीप करू असे ठरले आणि आमची भूतान बाईक ट्रीपची पहिली मिटिंग बरखास्त केली. मंदिरातून निघालो आणि घोडबंदरा जवळ जाऊन सर्वांनी चहा घेतला. थोडा वेळ चहा बरोबर गप्प मारल्या आणि निघालो आप - आपल्या घरी.

अभ्याने भूतान बाईक ट्रीपची अजून राहिलेली सर्व पूर्व तयारी करू लागला आणि जून - जुलै मध्ये आमची पहिली सराव ट्रीप माळशेज घाटला असे ठरवले आणि सर्वांना कळवून टाकले.

7.9.15

भूतान बाईक ट्रीप - संकल्पना आणि उगम

एप्रिल - जून २०१०, मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी सौदी अरेबियाला गेलो होतो आणि तिकडेच मी आमची लेह बाईक ट्रीपचा ब्लॉग लिहीत असताना मनात विचार आला की या पुढची बाईक ट्रीप आता कोणती करायची. लगेच लेह ब्लॉग लिहायचा ठेवला बाजूला आणि इंटरनेट वर शोधायला लागलो. शोध मोहिमे तून मला काही ४ - ५ विविध परिसरातल्या बाईक ट्रीपच्या माहिती मिळाल्या. राजस्थान, केरला, कर्नाटका, तमिळ नाडू, ईशान्यपुर्व भारत आणि सिक्कीम - भूतान. या सर्वातून माझी प्रथम पसंती ईशान्यपुर्व भारत आणि सिक्कीम - भूतान कडेच गेली. ईशान्यपुर्व भारत बाईक ट्रीपसाठी बऱ्याच दिवसांची मोठी ट्रीप लागणार होती, जवळ - जवळ महिना तर कमीत - कमी लागणारच होता. सध्या सर्वांच्या नोकरीच्या परिस्थितीतून महिन्याराची तर नक्कीच सुट्टी मिळेणार नाही याची मला खात्री होती. त्यामुळे नाहीलाजास्तव मला माझ्या मनाला सिक्कीम - भूतान ट्रीप साठी तयार करावे लागले. वास्तविक अरुणाचल, आसाम, मेघालय हे ईशान्यपुर्वेचे राज फिरण्यासाठी अप्रतिम आहेत. सिक्कीम व भूतान पण त्याच परिसरात आहे आणि भूतान म्हणजे परदेशी ट्रीप. या सर्व मुद्यांवरून शेवटी माझ्या मनात सिक्कीम - भूतानला पुढची बाईक ट्रीप नक्की असे ठरलेमी सिक्कीम - भूतान ट्रीपचा प्लान, रूट वगैरे पाहायला लागलो. इंटरनेट वर बर्‍याच लोकनी या बाईक ट्रीप केल्या आहेत असे कळले आणि मग त्यांचे ब्लॉग वाणे चालू झाले. या सर्वांच्या रूचा वर - वर अभ्यास करू लागलो. याच इंटरनेट वरच्या भटकंतीच्या दरम्यान मला आमच्या ग्रुप साठी जवळ पास साजणारा रूट प्लान मिळाला आणि त्यात आमच्या पद्धतीचे अजून काही बदल करून मी हा वर - वरचा आराखडा रोहन चौधरी आणि अभिजीत नाचरेला पाठवला. खऱ्या अर्थाने माझ्या बाजूने भूतान बाईक ट्रीपची संकल्पना आणि सुरवात अशी झाली. बहुदा रोहन आणि अभी हि या बाईक ट्रीप बद्दल विचार करतच होते. पण माझ्या या ई-मेल ने तर पुढची ट्रीप भूतानचीच हे सर्वांच्या मनात कोरून ठेवले असेल असे मला वाटते. 

माझ्या ई-मेल वर रोहन आणि माझी बोला - बोली चालू झाली. बरेचदा आम्ही चॅट वर पण या विषयावर बोलू लागलो. पुढे मी अभिजीत राव आणि प्रशांत आचरेकरला पण या ट्रीप बद्दल कळवले. मे २०१० ला मी जेव्हा सौदी वरुन परत आलो तेव्हा अभिजीत नाचरे बरोबर या विषयावर चर्चा केली. पण येत्या वर्षांत अभ्याला काय ही ट्रीप जमणार नव्हती आणि अभ्या शिवाय आम्ही काय ही ट्रीप करणार नव्हतो. अभ्या तर आमचा मोरखा आहे आणि त्या शिवाय कुठलही मोठ एक्सपीडीशन मी तर नक्कीच नाही करणार. मग मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा नाचऱ्याला बोललो की ही ट्रीप जेव्हा तुला जमेल तेव्हा करू. 

आता भूतान ट्रीप तर लगेच होणार नव्हती म्हणून मग मी अभिजीत रावला आमची कोकण सागरी किल्ले राहिलेली बाईक ट्रीप करू असे बोललो आणि या मुळे अक्षताला पण बाईक ट्रीपची सवय होईल. मे - जून २०१० ला आम्ही आमची कोकण बाईक ट्रीप पूर्ण करून घेतली. १०११ मध्ये मला ऑफीसच्या कामासाठी एक वर्षासाठी लंडनला जावे लागले होते. लंडन मध्ये असताना मी या सर्वांशी संपर्कात होतोच. याच कालावधीत रोहन त्याच्या परिवारा बरोबर तो भूतानची टूर करून आला होतो. या नंतर कधी तरी मी नाचरेशी बोलताना एकदा त्याला विचारले की आपण कधी करणार रे आपली भूतान बाईक ट्रीप. त्या वेळी मला नाचरे बोलला कि करूया आपण भूतान बाईक ट्रीप येत्या वर्ष भरात. फक्त मी त्याला बोललो की मी लंडन मध्ये असताना प्लान करू नकोस. मला ट्रीप वर यायला फार अडचण होईल. तरी पण जर तू भूतान ट्रीप मी लंडन मध्ये असताना प्लान करशील तर मला किमान ४ - ५ महिने आधी सांग म्हणजे सुट्टी, विमानाची तिकिटे वगैरे यांची तयारी करायला वेळ पाहिजे. मग अभ्या ने मला गवाही दिली कि मी भारतात येत नाही तो पेर्येंत आपण भूतान बाईक ट्रीप नाही करणार.  

याचा दरम्यान नाचरे दाम्पत्यांना मुलगा झाला. आता मला वाटले की अजुन - ३  वर्ष तरी काय नाचरे बाईक ट्रीप प्लान नाही करणार. पण पुढे नाचऱ्याच्या हालचाली वरुन तो भूतान बाईक ट्रीप बहुदा १ - २ वर्षांत प्लान करतो आहे असे मला जाणवायला लागले होते. माझ्या मनात तर पूर्ण गोंधळ झाला होता. कि अभ्या भूतान बाईक ट्रीप करतो आहे कधी. मला या ट्रीप वर अक्षताला घेऊन जायचे होते. माझी फार इच्छा होती कि मी व अक्षताने भूतान बाईक ट्रीप एकत्र करायची. पण अभ्याच्या हालचाल पाहून काही कळायचे नाही, कधी वाटायचे कि तो आता १ - २ वर्षात ट्रीप करेल आणि कधी कधी वाटायचे कि त्याला ट्रीप साठी पुढे २ - ३ वर्ष तरी लागतील. एक तर मी लंडन मध्ये होतो आणि आता आम्हाला पण आयुषातली पुढची प्लॅनिंग चालू करायची होतो. पण या सर्व गोंधळात पुढे करायचे काय हा आमच्या पुढे गहन प्रश्न पडला होता. माझे सर्व प्राधान्य होते भूतान बाईक ट्रीप मी व अक्षताने एकत्र करावे. पण शेवटी आमचे प्राधान्य बदलावे लागले आणि आम्हाला पण आयुषातल्या पुढच्या प्लॅनिंग च्या दिशेने जावे लागले. पण तरी हि माझे मन मात्र भूतान बाईक ट्रीप मी व अक्षताने एकत्र करावी या दिशे कडे होते. असो, रीही मी अभ्याला सांगून ठेवले होते की जेव्हा त्याला योग्य वाटेल तेव्हा भूतान बाईक ट्रीपची प्लॅनिंग कर मी बाईक ट्रीपसाठी लंडन वरुन काय जगाच्या पाठी वरुन कुठून पण येईन आणि आयुष कुठे का असे ना मी तरी पण भूतान बाईक ट्रीप साठी नक्की येईन. मात्र आता अक्षता येईल याची मी खातरी नाही देऊ शकणार.

मार्च २०१२ मध्ये मी अक्षताच्या डोहाळे साठी लंडन वरुन मुंबईला आलो होतो. त्याच वेळेला माझ्या वाढदिवस होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नाचरे मला भेटायला आमच्या कांदिवलीच्या घरी आला होता. आता पर्येंतच्या माझ्या वाढदिवसा पैकीची सर्वात मौल्यवान भेट अभ्याने मला दिली. ती म्हणजे, आमच्या लेह बाईक ट्रिपचा मी जो ब्लॉग लिहिला होता ना त्याचे त्याने कलर प्रिंट कडून एक पुस्तक बनवले आणि ते त्याने मला वाढदिवसाची भेट म्हणून दिले. पुस्तक पाहून तर मी चकितच झालो कि मी एवढे लिहिले. मला तर खात्रीच होत नव्हती की मी एवढे लिहू शकतो आणि शकलो. पुस्तक रुपी ब्लॉग पाहून मला फारच आनंद झाला. असेच पुस्तक नाचऱ्याने रोहनच्या लेह सफरनामाच्या पण बनून त्याला दिले होते. पण नक्कीच रोहनच्या आणि माझ्या ब्लॉग ची काहीच तुलना नाही आहे. रोहनच्या लिखाण उच्च दर्जाचे आहे आणि माझे लिखाण फाटके आहे. त्या पुस्तकात नाचऱ्याने प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत माझ्या लेखनातल्या भरपूर चुका अक्षताने बारकाईने शोधून काढून दुरुस्त केल्या बद्दल तिचे सर्वात जास्त आभार मानले आहे. हे कार्य अध्यापही अक्षता कडून चालू आहे आणि वेळे अभावी आता अक्षताला जमत नाही म्हणून माझ्या आईची मदत होत आहे. या एक आनंदाच्या धक्या नंतर नाचऱ्याने मला अजुन एक सुखद धक्का दिला. तो म्हणजे की जू२०१३ मधे आपण भूतान बाईक ट्रीप करतो आहे आणि त्याने त्याची तयारी सुरू केली आहे. १०  मार्च २०१२ ला नाचऱ्याने माझे आणि घरचे वातावरण आनंदमय करून ठेवले होते. 

मी तर फारच खुश होतो की आता आमची दुसरी मोठी बाईक ट्रीप होणार आणि ते ही परदेशात. मी नाचऱ्याला सांगितले की त्याला माझी मदत कुठे लागेल तेथे आणि तेव्हा सांग. वास्तविक नाचऱ्याला प्लॅनिंग मध्ये आमची तशी जास्त मदत लागतच नाही. तो यात परिपूर्ण मुरलेला आहे. हीच आणि अश्या तऱ्हेने आमच्या भूतान बाईक ट्रीप ची सुरवात झाली.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - वीडियो


कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - नऊवा दिवस (देवरुख ते मुंबई)

१३ जून २०१०, गजर लावल्या प्रमाणे ४ वाजता आम्ही उठायचा प्रयेत्न केला पण थोडा पुढे-पुढे असे करत ४.३० - ५ वाजताच्या दरम्यान उठलो आणि प्रातविधी उरकून शेवटच्या निघायच्या तयारीला लागलो. ५.३० - ६ च्या दरम्यान उजाडण्याची चिन्हे दिसायला लागली, म्हणून मी दरवाजा तून बाहेर गेलो. बाहेर पाहतो तर मला पाउसाची पण मजबूत चिन्हे दिसत होती. किंबहुना काल रात्री नक्की पाऊस येऊन गेलेला असे जाणवले. आता पुढे जर जोराचा पाऊस लागला तर एवढ्या सर्व सामाना बरोबर आमची फार वाट लागणार हे मला जाणवत होते. म्हणून मी आमचे जरा समान कमी केले आणि देवरुखच्या घरीच ठेवले.

सर्व सामान बाईक वर लावले आणि त्यावर ताडपत्री पण बांधून घेतली. आम्ही ६.३० - ७ च्या दरम्यान देवरुख सोडले.  हळू - हळू मुंबईच्या दिशेने कूच करत होतो. संगमेश्वर पार करून धामणी मध्ये बाईकला पेट्रोल पाजले आणि आम्ही पण तिकडेच टपरी वर चहा बिस्किटाचा नाश्ता केला. आम्हाला पाऊसाच्या आधी जास्तीत-जास्त पुढे  जायचे होते. म्हणून नाश्त्यासाठी जास्त वेळ नाही घेतला. धामणी वरुन निघालो ते अरवली पर्येंत पण पोहोचलो नव्हतो आणि काळे ढग दाटून आले आणि जर पुढे जातो न जातो तर जो मजबूत पाऊस कोसळला. नशीबाने आम्ही त्यावेळेला आरवलीच्या चौकात होतो. त्या वेळेला एक चहाचे दुकान उघडे होते. लगेच त्यांच्या दारातच बाईक लावली आणि आम्ही शिरलो आत. बराच वेळ पाऊस कोसळत होता. तो पर्येंत आम्ही पुन्हा एकदा चहा घेतला आणि थोडा नाश्ता पण केला.

जसा पाऊस थोडा कमी झाला, तसे मी लगेच जाऊन बाईक वर लावलेले आमचे सर्व मोल्यवान सामान बागेत प्लास्टिक मध्ये ठेवले. या मोल्यवान बॅगा आम्ही पाठी वर लावल्या आणि मग स्वतावर बॅगा सहित पॉन्चो चढवला. आता तर मी आणि बाईक दोघे हि निळ्या ताडपत्रीने झाकल्या सारखे दिसत होतो. बाईक वरच्या सर्व सामानावर निळी ताडपत्री बांधली होती आणि माझा पॉन्चो पण निळ्या ताडपत्रीचाच होता. रस्त्या वर उभे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या कढे पाहत होते आणि मनात बोलत असावे की, काय वेडे आहेत हे,  एवढ्या पाऊसात अंगावर आणि बाईक वर ताडपत्री बांधून चालले आहेत. त्यांच्या हसण्याला आम्ही पण आमच्या हसण्याचा जोड देऊन पुढे हळू - हळू जात होतो. सावर्डयाच्या पुढे जाई पर्येंत जरा पाऊस होता आणि नंतर संपूर्ण बंद झाला. आता आम्हाला  या ताडपत्रीत गरम होऊ लागले होते. जरा रस्त्याच्या बाजूला थांबलो आणि पॉन्चो काढून घेतला. तसाच उभ्या उभ्या ने एक छोटासा ब्रेक झाला आणि पुढे निघालो. या परिसरा मधे जास्त पाऊस नव्हताच आणि पंडून पण गेला नव्हता त्यामुळे रस्ता बर्‍या पैकी सुका होता. याच संधीचा मी फायदा घेऊन थोडी बाईक पळवायला लागलो. ४० - ५० च्या  स्पीडने आता आमची चिपळूण गाठले.

पुन्हा एक छोटासा उभ्या - उभ्या चिपळूणात ब्रेक घेतला आणि पुढे निघालो आता जरा आभाळ मोकळे होऊन उन्ह पण यायला लागले होते. वातावरण मस्त झाले होते, हवेत जरा थंडावा आणि वरुन उन्ह. काय मस्त वाटत होते मला बाईक चालवायला त्या रस्त्या वरून. यातच आम्ही निसर्गाची वेग-वेगळे रूप पाहत परशुराम घाट चढू लागलो आणि पुढे खेडच्या दिशेने निघालो. घाट चढून लोटे, लावेल पार करत भरणा नाक्यावर आलो आणि आम्ही परत एक ब्रेक घेतला. आता बराच वेळ आमच्या वर पाऊसाने मेहेरबानी केली होती आणि त्यामुळेच आम्हाला जरा पटा - पट पुढे येता आले. भरणा नाक्या वरुन सुटलो आणि नातू नगर पार करून कशेडी घाटाच्या पायथ्या पर्येंत पोहोचलो. एवढ्या परत आम्हाला पाऊसाने गाठले. आता आमच्या जवळ - पास रस्त्याला कुठे हि शेड पण नव्हती. तसेच रस्त्याच्या बाजूला उभे राहू पॉन्चो घालून घेतले. या वेळेला पाऊस फार काय जास्त जोरात नव्हता. पण थोड्या सरी मध्ये मध्ये येत होत्या. हळू - हळू आम्ही या पाऊसाच्या सरीतून कशेडी घाट चढत होतो. जस - जसे घाट चढू लागलो तसे पाऊस कमी होत होता. घाट चडून वर गेल्यावर खिंडीत तर पाऊस अजिबातच नव्हता. पाऊस सरला म्हणून लगेच आम्ही महाडच्या दिशेने घाट उतरू लागलो.

कशेडी घाट उतरून पोलादपूरला आलो. घाटाच्या या बाजूला तर अजिबातच पाऊस नव्हता. या परिसरात तर पाऊस जराही आला नव्हता, त्या मुळे पुन्हा या संधीचा फायदा घेत आम्ही सुसाट सुटलो ते लगेच महाडला कामत कडे थांबलो. आता जरा भूख लागली म्हणून थोडेसे पोठ भरून घेतले आणि फ्रेश होऊन पुढे निघालो. महाड सोडले आणि गोरेगाव, माणगाव, कोलाड पार करून नागोठण्याला आलो. नागोठण्याला पण गोविंदा कामत कडे थांबलो. हे आमचे नेहमीचे थांबायचे ठिकाण आहे. फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि चहा घेऊन निघालो पुढे. आता या पुढचा रस्ता फार रहदारीचा असतो म्हणून जरा बाईक हळू - हळू जाऊदे असे म्हणत आम्ही पुढे चाललो होतो. पण आज आमच्या सुदैवाने आम्हाला या ठिकाणी फार जास्त ट्रॅफिक नाही लागले आणि सुसाट बाईक पळावत आम्ही वडखळ, कर्नाळा पार करून पळस्पे फाट्यावर आलो.

आता मात्र आम्ही दोघे पण फारच थकलो होतो. सकाळ पासून नुसती बाईक चालवत होतो आणि लवकर घरी पोहोचण्यासाठी नुसती पळ-पळ चालली होती. मुंबईच्या जवळ आल्यावर जरा बरे वाटले आता २ - ३ तासात घरी पोहोचू असे वाटले. पळस्पे फाट्यावर दत्त स्नॅक्स कढे मिसळ पाव खाऊन घेतली आणि मस्त गरम-गरम चहा मारला आणि घराकडे निघालो. २ एक तासात ऐरोली मार्गे पवई पार करून गोरेगाव महानंदाच्या जवळ आलो होतो. आता परत आभाळ गडगडायला लागले आणि पुन्हा जोराचा पाऊस कोसळायला चालू झाला. लगेच बस स्टॉपच्या जवळ बाईक लावली आणि बस स्टॉपच्या आडोश्याला उभे राहिलो. आता पॉन्चो बॅगेतून काढायचा आणि घालायचा दोघांनाही कंटाळा आला होता. वास्तविक आम्ही आता फारच थकलो होतो आणि घर पण तसे जवळ आले होते. साहजिकच आहे ना? एवढी बाईक चालवून आणि मागे बसून सुधा थकायला होणारच ना. अक्षताची तर हि पहिलीच मोठी बाईक ट्रिप होती. तरी पण ती ने फारच छान पेलली हि बाईक ट्रीप. थोड्या वेळाने पाऊसाची सर थोडी सरली आणि आम्ही परत बाईक वर स्वार होऊन घरी कांदिवलीला आलो.

अश्या प्रकारे आमच्या मनातली आणि आम्ही जशी करायची ठरवली होती तशी कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप २ भागात का होईना पण आम्ही पूर्ण केली. फक्त मला दुसऱ्या बाईक ट्रीप वर सुजय नसल्याचे फार वाईट वाटले. कालांतराने मला सुजय अक्षता होती म्हणून नाही आला हे मुळ कारण कळाल्यावर तर फारच वाईट वाटले. असो पण जर मला कोकण बाईक ट्रीप बद्दलच्या आठवणी विचारल्या तर सर्वात जास्त पहिली कोकण बाईक ट्रिपच जास्त आठवते. दुसरी बाईक ट्रीप आमचे उरलेले किल्ले पूर्ण करायचे म्हणून केली होती असे मला वाटते.

दुसऱ्या बाईक ट्रीप वरचे आमचे पहिला आणि शेवटचा दिवस फारच लांबचा होता. हेच दिवस पहिल्यांदा बाईक ट्रीप करणार्‍याला फारच कठीण जातात. पण अभिजीत रावच्या मते या बाईक ट्रीप वर अक्षताने कधीही प्रवासाचा त्रास होतो आहे असे चेहऱ्यावर सुद्धा दाखवले नाही. किंबहूना त्याच्या मते तर दुसरी बाईक ट्रीप सर्वात जास्त अक्षतानेच एंजॉय केली, कारण या संपूर्ण त्रासच्या बाईक ट्रीप वर आम्हाला कितीही त्रास झाला तरी अक्षता हसतच होती. वास्तविक हे अभीजीतचे मत खरे होते . अक्षताने हि बाईक ट्रीप फारच एंजॉय केली होती

ही होती माझी, अभिजित राव, सुजय, राजू, उन्मेष आणि अक्षताची कोकणातील सागरी किल्ले पाहण्यची  बाईक वरची भटकंती.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - आठवा दिवस (देवरुख आराम)

१२ जून २०१०, काल झालेल्या पळ-पळी मुळे आज सर्वच जरा थकले होते आणि आज तसे आमचा काय कुठेही जायचा प्लान नव्हता. आरामात सर्व १०.३० - ११ च्या दरम्यान उठलो. उन्नु सकाळीच जरा आमच्या आधी उठला होता. लगेच त्याने जाऊन बाहेरून सर्वांसाठी चहा घेऊन आला. फ्रेश होऊन आम्ही आरामात चहा घेत बसलो. आता पर्येंतच्या बाईक ट्रीपच्या गप्पा चालल्या होत्या आणि आता पुढचे कसे जायचे याची पण चर्चा करू लागलो.

प्लान प्रमाणे आज देवरुखला राहायचे आणि उद्या पहाटे लवकर ४ - ५ च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने प्रवास करायचे होते. पण राव व उन्मेषला पुण्याला जायचे होते आणि अपर्यायाने राजुला पण त्यांच्या बरोबर जावे लागणार होते. कारण राजूसाठी जर ते पनवेल पर्येंत येउन मग पुण्याला जाणार त्यापेक्षा ते सर्व पुण्याला जाऊन मग राजू एकटा मुंबईला येईल असे ठरले. आम्ही तर मुंबईलाच जाणार होतो आणि पुण्यामार्गे आम्हाला फार वळसा पडला असता.

शेवटी या वेळी परत आमच्या गेल्या बाईक ट्रीप प्रमाणेच झाले. राव, राजू व उन्मेष पुण्याला जाणार आणि मी व अक्षता मुंबईला असे दोन वेगळ्या मार्गाने जायचे ठरले. देवरुख ते पुणे हे अंतर सुमारे २६० किलोमीटर आहे आणि त्यासाठी जास्त वेळ नाही लागणार होत्या त्यांना. एकदा आंबा घाट चढला कि मग मलकापूर ते पुणे हा रस्ता सरळ आणि फार चांगला आहे. या मुळे राव ने मला सांगितले की ते सर्व आजचं निघून जातील.  म्हणजे मग उध्या पर्येंत राजुला पण घरी जाता येई आणि उन्मेष पण पुण्यातून पुढे सोलापूरला निघू शकतो. रावने मला विचारले की मी व अक्षता एकटे मुंबईला जाण्यास काही अडचण आहे का. वास्तविक माझी कसली हरकत असणार, जो काही प्लान आता ठरला आहे तो सर्वांच्या सोईचा आहे. मग मी कशाला हरकत करणार. आमच्या नवीन परतीच्या प्लान वर आता सर्वांची न हरकतीचा शिक्का मर्तब झाला एकदाचा.

या सर्व चर्चेत जेवायची वेळ झाली म्हणून आता आम्ही सर्व प्रथम जेवून घेऊ असे ठरले. सर्व जेवायला बाहेरच गेलो रावच्या ठरलेल्या हॉटेल मध्ये. जेवून आल्या वर पुण्याला जाणारे सर्व निघायच्या तयारीला लागले. राव, उन्मेष आणि राजूने त्यांचे सर्व सामानाची बांधा-बांध केली आणि लागले निघायच्या शेवटच्या तयारीला. सर्व तयारी आवरून ते २ - २.३० च्या दरम्यान झाले बाईकवर स्वार आणि निघाले पुण्याच्या दिशेने माझा व अक्षताचा निरोप घेऊन. त्यांना आम्ही टाटा बाय बाय केले आणि जरा आराम करून घेऊ असे म्हणत आडवे झालो. मस्त संध्याकाळी आरामात उठलो आणि मग आमच्या निघण्याच्या तयारी ला लागलो. मी राव बरोबर फोना-फोनी करून त्यांची खुशाली विचारून घेतली आणि आम्ही पण बाहेरच जेवायला गेलो. रावनेच दाखवलेल्या शाकाहारी खानावळीतच गेलो. आरामात गप्पा मारत जेवण जेवत होतो. बरेच दिवसांनी मी व अक्षता एकटेच होतो. जेवण उरकून घरी आलो. आमच्या देवरूखच्या घरचे शेजारी राहाटे काका - काकींना भेटायला गेलो. देवरुखला गेलो कि मग आम्ही त्यांना भेटतोच आमचे आणि त्यांचे बरेच चांगले संबंध आहे. त्यांचा बरोबर पण थोडा वेळ गप्पा-गोष्टी झाली आणि मग घरी येउन शेवटची तयारी करू लागलो.

आज संध्याकाळ पासूनच जरा वातावरण फार बदलेले होते. आज उन्ह पण जरा कमीच होते. आता तर ढग पण दाटून आले होते. पाऊसाची चिन्हे दिसायला लागली होती. उद्या आम्ही निघताना जास्त पाऊस लागेल असे वाटत होते आणि जर लागलाच तर मग आमची पंचायीत होणार होती. जर जास्तच जोराचा पाऊस लागला आणि मुंबई पर्येंत जाता नाही आले तर आपण मध्येच कुठे तरी राहू असे मी अक्षताला सांगितले. बहुदा महाड किंवा नागोठणे असे कुठे तरी राहू. काही झाले तरी आपण आरामात हळू - हळूच जाऊ असे पण मी अक्षताला सांगून तिचे सांत्वन करू लागलो. अक्षताचे सांत्वन झाल्यावर मग मी आईला पण फोन लावून तिचे पण सांत्वन करून घेतले. सर्वांन बरोबर फोना - फोनी करून घेतली आणि त्यातून कळाले की राव आणि कंपनी पुण्याच्या जवळ पोहोचले आहेत. आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे होते म्हणून राव बरोबरची गप्पा - गोष्टी लवकर आवरली आणि त्या सर्वांची सुखारुप्ता कळली आणि मग आम्ही झोपी गेलो.

4.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - सातवा दिवस (वेंगुर्ला - गोवा - देवरुख)

११ जून २०१०, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर ६.३० च्या दरम्यान आम्ही उठलो. सर्व प्रातविधी उरकून हॉटेलच्या बाहेर पडलो आणि वेंगुर्ला बंदर पाहायला गेलो. येतानाच कुठे तरी नाश्ता करून येऊ असे ठरले. सकाळच्या मस्त शांत वातावरणातून आम्ही वेंगुर्ला बाजारातून पुढे बंदरा पर्येंत गेलो. आज मस्त वाटत, समुद्राला पण भारती आली होती. बंदरा वर आमच्या शिवाय तसे कोणी नव्हते. मस्त आरामात आम्ही सकाळच्या वेळेत समुद्र आणि परिसराचे फोटो काढून घेतले. समुद्राला मजबूत लाटा उसळल्या होत्या. बराच वेळ खडकांना आपटणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होतो. थोडे या परीसरातले आणि लाटांचे फोटो व वीडियो काढून घेतले आणि मग बंदरा जवळच असलेल्या टेकडावर चढून सागरेश्वर बंगल्या जवळ गेलो. थोडी इकडे पण फोटोग्राफी करून बंगल्या वरुन दिसणार्‍या समुद्राचा नजारा पाहू लागलो. मन भरून समुद्राला पाहून घेतले आणि मग आलो खाली. खाली येऊन बाईक घेतल्या आणि परत बाजारात आलो. बाजारातच बाईक लावून  तिथल्याच एका लोकल हॉटेल मध्ये नाश्ता केला.



मस्त गरम गरम नाश्ता पटकन हांडला आणि जरा दिवसाच्या वेळी बाजारात फेर-फटका मारू असे माझे मत होते. पण राजुला मात्र रूम वर जाऊन प्रातविधी अजून उरकायचे होते. म्हणून ते सर्व परत हॉटेल वर गेले आणि मी व अक्षता बाजारात पायीच फिरू लागलो. चालताना मध्येच मला एक तांब्या पितळेचे दुकान वजा कारखाना दिसला आणि मी लगेच आत शिरलो. वास्तविक मला फक्त एका मस्त मोठ्या घंगाळाची किंमत विचारायची होती. त्यांनी सांगितले कि तुम्हाला ४ - ५ हजारांच्या जवळ पास पडेल. मस्त जाड काठचे घंगाळ बनवून मिले. त्याच बरोबर मी मात्र संपूर्ण दुकान न्याहाळून पाहात होतो. तेवढ्यात मला त्यांच्या कपाटात पितळेची वजनाची मापे दिसली. ते पाहिल्यावर मला कसले राहवते. मी त्या दुकान वाल्यांना ती सर्व मापे कपाटाच्या बाहेर काढायला सांगितली आणि किंमत विचारून घेतली. मला हि दुर्मिळ मापे मिळाली याचा झालेला आनंद पाहून त्या दुकान वाल्याने लगेच १२०० रुपये सांगितले. मला कुठली हि अशी दुर्मिळ गोष्ट आवडली कि मग मी किंमत बघत नाही. मी लगेच ती सर्व मापे सांगितलेल्या किंमतीला घायला तयार झालो. पण पाहतो तर त्यात एक माप कमी होते मग मात्र मी त्यांना जरा पैशे कमी करा अस सांगितले. पण ते काही केल्या कमी करेनाच वरुन तेच मला सांगायला लागले की त्याची खरी किंमत २००० ते २५०० आहे. तरी पण मी त्यांच्या कडे ते मापे १००० मध्ये मागायला लागलो. तरीही ते काही केल्या ऐकेनाच आणि मी पण ऐकेना. शेवटी ते ११०० ला द्याला  तयार झाले आणि शेवटी मी पण घ्ययला तयार झालो. बरीच दुर्मिळ वस्तू मिळाली आणि हे घेण्यात बराच वेळ गेला म्हणून आम्ही पुढे अजुन वेंगुर्ला मार्केट न फिरता मापे घेऊन हॉटेल वर गेलो. 

हॉटेल वर येऊन मी मापे राव आणि राजुला दाखवली, त्यांनी तर मला वेड्यातच काढले. त्यांच्या मते मी हा कसला वेडे पणा केला. ११०० रुपयांना ४-५ लहान मोठी पितळेची भांडी आणली होती. माझी थोडावेळ त्यांनी टेर खेचून आम्ही सर्व आता निघायच्या तयारीला लागलो. सर्व सामान भरून आम्ही बाईकला लावायला लागलो. एवढ्यात अभी तिकडे आला, त्याच्या मदतीने हॉटेलवाल्यांचे पैशे चुकते केला आणि थोडेशे पैशे मी त्याच्या पण हातावर टेकवले. अभीची परिस्थिती पण तशी बेताचीच आणि त्यातून त्याच्या ५ वर्षांचा मुलाला डोळ्याचा कॅन्सर झाला होता. हे मला आई कडून या पूर्वीच कळले होते. मुलाच्या आजारपणावर त्याच्या फार खर्च होत होता, हे ही मला कळले होते. या सर्व खर्चा मुळे त्याची फार अडचण होत होते हे पण मला माहीत होते. म्हणूनच मी त्याला थोडेशे पैशे माझ्या ऐपती प्रमाणे फूल ना फुलाच्या पाकळी प्रमाणे देऊ केले. प्रथम तो घेइनाच पण नंतर माझ्या फार आग्रहा वरू शेवटी घेतले.

अभिलाच पुढे वेंगुर्ल्या वरुन वेतोबाच्या मंदिराकाडे आणि तिथून पुढे रेड्डीच्या गणपती करून मग तेरेकोळला काशे जायचे हे विचारून घेतले. अभीचा निरोप घेऊन निघालो पुढे त्याने सांगितलेल्या मार्गाने. अभीने सांगितल्या प्रमाणे आम्ही मोचेमाड करून १२ किलोमीटरचे अंतर आरामात अर्ध्या तासात पार करून शिरोडा आरवलीत वेतोबाच्या मंदिरा जवळ आलो. मंदिरात कसल्या तरी उत्सवाची तयारी चालू होती आणि बाहेरच्या बाजूला बऱ्याच गाड्या होत्या. आता उन्ह पण डोक्यावर आले होते, म्हणून आम्ही बाईक रस्त्याला लागून एका मोठ्या झाडाच्या सावलीत लावल्या. आम्हाला मंदिरात उत्सवा मुळे गर्दी असेल याची फार भीती होती. माझे तर ठरले होते कि फार गर्दी असेल तर मी काय आत देवळात येणार नाही. राव, उन्मेष व राजू चे पण तसेच मत होते आणि नेहमी प्रमाणे फक्त अक्षताचे काहीही चालेल असे मत होते. मग काय तिला काहीही चालेल म्हणजे एका मानाने देवळात जायचे होते असे हि होते ना. त्यामुळे आता आत जाऊन तर पाहू किती गर्दी आहे आणि मग पुढचा निर्णय घेऊ असे ठरले. पण आत गेल्या वर फार काही गर्दी नव्हती. पटापट वेतोबाचे दर्शन घेतले आणि लगेच बाहेर बाईक कडे आलो. देवळात मिळालेला केळ्यांचा प्रसाद आम्ही बाईक कडे खात गप्पा मारत बसलो. एवढ्यात आमच्या  मुंबईच्या बाईक पाहून एक तरुण जोडपे आमच्या जवळ आले आणि आमच्याशी गप्पा गोष्टी करायला लागले. चर्चेअंती आम्हाला ते ठाण्याचे असल्याचे कळाले. मग तो आमची चौकशी करायला लागला. आम्ही मुंबईत कुठले आणि वगैरे- वगैरे. मग मी कांदिवलीचा हे सांगताच तो म्हणाला कि त्याचा एका चुलत भाऊ पण असाच बाईक वरुन भरपूर भटकंती करतो आणि त्याच्या बरोबर तो मुलगा पण फिरला आहे. म्हणूनच त्या मुलाला आमच्या कडे पाहून बोलावेसे वाटले असेल. वास्तविक सम आवडीची अनोळखी लोक पण पटकन मिसळतात. पुढे चर्चेअंती त्याच्या कांदिवलीच्या भावाकडे बुलेट आणि त्याचे नाव संजू असे कळले. त्याने त्याच्या भावाचे नाव संजू सांगताच मी त्याला विचारले की तो संस्कृतचा पंडित आहे का? आणि त्याचा कांदिवली मध्ये क्लास आहे का? त्याने हो असे सांगताच मी ओळखतो त्याला असे सांगितले. लगेच मी रावला सुंजू कोण याची आठवण करून दिली. आमच्या लेह बाईक ट्रीप ची सराव ट्रीप राजमचीच्या वेळेला संजू बुलेट घेऊन आला होता. आमची आणि त्याची ओळख याच ट्रीपवर झाली होती. संजू अभिजीत नाचरेचा सारपास ट्रेकचा मित्र आहे.

बराच वेळ संजूच्या भावाशी आमच्या गप्पा झाल्या आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो. लगेच ७-८ किलोमीटरच अंतर पार करून रेड्डीच्या गणपती मंदिरा पाशी आलो. आता उन्ह डोक्यावर आले होते. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मंदिराच्या जवळच समुद्र किनारा दिसतो. समुद्र किनारा पाहिल्यावर आम्ही कसले थांबणार. समुद्र किनाऱ्या जवळचा आणि आजू-बाजूला एक फेर फटका मारला आणि थोडा वेळ तिकडेच झाडा जवळ बसलो. आम्हाला रेड्डी जवळ सर्वत्र लाल व काळी माती वजा वाळू दिसली आणि हाच रंग समुद्राच्या पाण्यात पण मिसळेला दिसला. प्रथम दर्शनी आम्हाला हि निसर्गची किमया वाटली पण नंतर पुढे तेरेकोल कडे जाताना याचे मूळ कारण कळाले. ही सर्व निसर्गाची किमया नसून माणसाचा हव्व्यास होता हे कळाले. माणसाचा हव्व्यास काय हे तुम्हाला पुढे कळेलच. आता आमच्या पुढच्या ट्रीपची चर्चा इकडेच उभ्याने करू लागलो. आमच्या प्लान नुसार अजून आम्हाला यशवंतगड पाहून मग पुढे तेरेकोल किल्ला पाहायचा होता आणि मग सावंतवाडी मार्गे कुठल्या ही परिस्थितीत देवरुख गाठायचे होते. २००७ च्या गणपती मध्ये मी पिंगे कानांच्या बरोबर वेंगुर्ल्याला आलो होतो.  तेव्हा काकांनी मला वेतोबा आणि रेड्डीचा गणपती दाखवले होते. त्या वेळेला मी रस्त्यात यशवंतगड पाहिला होता. बाकींच्या किल्ल्यांन प्रमाणेच या पण किल्ल्याची दूरावस्ता झाली आहे. किल्ल्याचे काहीच आवषेश राहीले नाहीत. किंभवना या किल्ल्या वर तर फार जास्त दाट झाडी मला पहायला मिळाली. शेवटी सर्व मत ठरवून आम्ही यशवंतगड न पाहता सरळ तेरेकोलचा किल्ला पहायचा असे ठरवले. थोडेसे रेड्डीच्या किनाऱ्याचे फोटो काढले आणि निघलो पुढे तेरेकोलच्या दिशेने.

माणसाचा हवव्यास काय हे मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो. रेड्डी सोडल्यावर लगेच पुढे रस्त्याला आणि रस्त्या बाजूला तीच काळी व लाल माती दिसू लागली. आता रस्त्याला बरेच डम्पर पण दिसू लागले. जस-जसे पुढे जाऊन लागलो तसे लाल-काळ्या मातीचे व दम्परचे प्रमाण पण वाढले आणि जरा पुढे गेलो तर सर्व भुगर्भ पोखरून खणण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. अरेच्या इकडे माइनिंग चालू होते. आता माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांचा उलघडा लागला. समुद्राचे पाणी निसर्गाच्या किमयाने नाही तर माणसाच्या हलकट हव्व्यासा मुळे प्रदूषित झाले  होते. आम्ही या सर्व गोष्टी मनातच ठेऊन तसेच पुढे निघालो. आता मातीचा रंग परत बदलेला दिसायला लागला. आता सर्व परिसर पण वेगळा दिसु लगला होता. तेरेकोल पासून एक-दोन किलोमीटर आधी पासूनच पुरूष व स्त्रिया यांचे कपड्यांची पद्धत गोव्याच्या ख्रिचन सारखी दिसू लागले होती. आम्हाला या वरूनच जाणवायला लागले कि अचानक आम्ही गोव्यात आलो होतो. गावातच तेरेकोल किल्ल्याचा रस्ता विचारून घेतला.  किल्ल्याच्या जवळ जाऊन पोहोचलो. बाहेरूनच किल्ला फार मस्त दिसत होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनार पट्टीतला महाराजांच्या सर्व किल्ल्यान पैकी सर्वांत चांगला राहिलेला किल्ला हाच आहे असे मला वाटले. हा किल्ला एका खाजगी कंपनीला आता हॉटेल म्हणून चालवायला दिला आहे.  माझ्या मते म्हणूनच किल्ला चांगला राहिला आहे. त्यांनी हा किल्ला फारच चांगला जोपासला आहे. किल्ल्याला जराही राकट पण राहिला नाही आहे आता, त्यांनी सर्वत्र किल्ल्याची डागडूगी करून नवीन पद्धतीने रांग रंगोटी करून थोडेसे किल्ला रुपी हॉटेल चे स्वरूप आणले आहे.

आम्ही बाईक हॉटेल रूपी किल्ल्याच्या बाहेरच लावल्या आणि किल्ल्याच्या आत शिरलो. हा किल्ला सर्वांना पाहायला मिळतो. हॉटेलचे सर्व भाग पर्यटकांसाठी मोकळे नाही आहे, पण किल्ल्याचा काही भाग मात्र नक्कीच पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आता मध्य भागी एक मोठे चर्च आहे. आम्ही चर्चच्या भोवती आणि किल्ल्याच्या तटबंदी वरू फेरा मारला आणि हॉटेलच्या गच्चीवरच्या रेस्तोरंट मध्ये जाऊन बसलो. हॉटेलच्या या बाजूने समुद्र किनारा मस्त दिसत होता. फारच गरम होऊ लागले म्हणून सर्वांनी थंडा मागवला. थंडा येई पर्येंत मी व राव फोटोग्राफी करू लागलो. मस्त राजेशाही पद्धतीने थंडा आम्ही गटकात होतो. आमच्या कोकण सागरी किल्ले ट्रीपच्या प्लान नुसार या किल्ल्या पासून परतीचा प्रवास ठरला होता. कारण मराठा राज्याचा कोकणातला हा शेवटचा किल्ला. १७०० च्या शतकात हा किल्ला मराठा राज्याचा होता. मग १८१९ मध्ये या किल्लावर पोर्तुगजांनी ताबा घेतला ते १९६१ पर्येंत त्यांच्याच कडे होता. म्हणूनच आता या किल्ल्या मध्ये चर्च आहे आणि किल्लाला सुद्धा पोर्तुगीज साम्राज्याची छाप दिसून येते. खऱ्या अर्थाने आमची कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप संपन्न झाली याचा सर्वांना आनंद होता. त्याच आनंदाच्या भरात आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला. 

किल्ल्या वरुन परत गावाकडे येताना मध्ये खाडी काठी मस्त घरगुती हॉटेल दिसले. सर्वांना आता भूख पण लागली होती म्हणून तिकडेच जेवायला थांबलो. जेवणाची घरगुती सोय होते असे कळाल्यावर लगेच ऑर्डर पण दिली. लोकल खाडीच्या माश्याचे कालवण ते ही गूवन पद्धती नुसार आणि भात हे आमचे जेवण ठरले. अक्षता माश्याचा रस्सा फक्त खाते म्हणून काय हरकत नव्हती. गर्मी मुळे आम्ही परत इकडे पण थंडा मागवला. या घर रूपी हॉटेलचा परिसर बर्‍या पैकी थंड होता. बहुदा त्याचे कारण असे की घरा भोवती भरपूर दाट झाडांची सावली होती आणि हे घर पण खाडीच्या बाजूला लागून एका छोट्याश्या टेकाडावर होते. जेवण येई पर्येंत मस्त आराम करत सर्व दिशेला आडवे पडलो होतो.

जेवण आले आणि मग काय लगेच ताडकन उठलो. गरम - गरम घरगुती जेवणावर तुटून पडलो. ते गोवन  पद्धतीचे जेवण फारच मस्त होते. जेवण फस्त केले आणि परत सर्व अर्धा तास भर आराम करत आडवे पडलो. रावने तर एक मस्त डुलकी काढून घेतली. थोडेसे उन्ह सरल्या वर आम्ही पुढे निघालो. तेरेकोल गावतच रावने एका दारूच्या दुकाना जवळ बाईक थांबवली. त्याच्या मागे आम्ही पण थांबलो आणि त्याच्या मागो-मग आम्ही सर्व पण दारूच्या दुकानात शिरलो. रावने त्याच्या भाऊ वेवेकसाठी म्हणून २ विवेकच्या आवडीच्या बाटल्या विकत घेतल्या. इकडेच आम्ही सावंतवाडीला जाणारा रस्ता पण विचारून घेतला आणि निघलो आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीपच्या परतीच्या प्रवासाला. आता तसे सर्वच आनंदात होतो पण मी हा सर्वांचा आनंद "आज कुठल्या ही परिस्थितीत आपल्याला देवरुख गाठायचे आहे" या आरोळीने फार जास्त वेळ टिकून दिला नाही.

तेरेकोल करून सुटलो ते मध्ये कुठेहि न थांबता आरोंदा मार्गे थेट सावंतवाडी गाठली. सावंतवादीच्या शहराच्या चौकात पहिला ब्रेक घेतला. या आरोंद्याच्या  रस्त्याला जरा जास्तच अवजड रहदारी होती. सावंतवादीच्या शहराच्या चौकाच्या बाजूलाच सावंतवाडीची प्रसिद्ध असलेली लाकडी खेळणांच्या दुकान दिसले, मग काय आम्ही घुसलो. थोडा वेळ तिकडे टाइम पास करत आराम करून घेतला. वास्तविक काही आवडले असते तर मग घेतले पण असते. पण मला तिकडे तसे काही विशेष आवडले नाही. किमती पण कायच्या काय होत्या. शेवटी आता जास्त वेळ टाइम पास नको म्हणून मग झालो बाईक वर स्वार. चौकातून निघालो आणि गोवा-मुंबई महामार्गाला लागलो. जरा पुढे गेलो असू आणि रस्त्याला लागूनच रावने एका हॉटेल जवळ बाईक थांबवली आणि म्हणाला चहा पिऊया. चहा बरोबर आम्ही थोडेसे हांडले पण, काय माहीत पुढे खायला थांबू की नाही. कारण दिवसा उजेडी जास्तीच - जास्त रस्ता कापायचा होता आणि देवरुख अजुन १७५ किलोमीटर लांब होते.

चहा नाश्त्या बरोबर पटा - पट फ्रेश होऊन घेतले आणि लगेच बाईक वर स्वार होऊन निघालो देवरुखच्या दिशेने. सावंतवाडी शहराच्या जवळ जरा जास्त गाड्या होत्या, मात्र जरा पुढे गेल्यावर रहदारी कमी झाली होती, त्यामुळे आम्ही आता जरा सुसाट सुटलो होतो. आज तर मी पण बाईक पळवायला लागलो होतो. किंबहुना आज तर मी सर्वात पुढे होतो. सावंतवाडी वरुन सुटलो ते दीड-एक तासात कुडाळ, कसाल आणि कणकवली पार करून पुढे गेलो. कणकवली वरुन १०-१२ किलोमीटर पुढे मी एका गावाकडे बाईक थांबवायला सांगितल्या. आता सुर्य मावळयच्या आत एक छोटासा ब्रेक घेऊ असे बोललो. सर्व तयार झाले. राजू व उन्मेष ने जाऊन बाजूलाच असलेल्या दुकानातून थंडा  घेऊन आला. थंडा पीत आणि गप्पा मारत रिलॅक्स होत होतो. उन्मेष तर मला बोलला "काय मामा आज बाईक मस्त पळवत आहेस". या बाईक ट्रीपवर माझे व अक्षताचे सर्व सामान आम्ही बाईकच्या दोन्ही बाजूला बांधले होते. यामुळे मी आता पर्येंत बाईक जरा हळूच चालवत होतो. पण इतके दिवस या पद्धतीत बाईक चालवून मला आता सवय झाली होती, त्यमुळे मी आज जर बाईक पळवत होतो. 

थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही निघालो पुढे. आता सुर्य पण मावळला होता. त्यामुळे संपूर्ण अंधार पडायच्या आत जास्तीत-जास्त रस्ता कापायचा आम्ही प्रयेत्न करत होतो. नाही म्हंटले तर अजुन देवरुख १००-११० किलोमीटर होते. आता परत सर्व सुसाट सुटलो. अंधार पडे पर्येंत आम्ही बर्‍या पैकी बाईक पळवून आलो होतो. जसा ठप्प अंधार झाला तसा सर्वात पहिला मी हळू झालो आणि मागाहून मग सर्व हळू झाले. वास्तविक माझी हि सवयच आहे. अंधार पडला की मी बाईक वर बर्‍या पैकी हळू होतो. मी अक्षताला बोललो पण आता राव मला शिव्या घालेल बघ "रात आंधळा, साला !! अंधार पडला कि झाला हळू". पुढे जेव्हा आम्ही राजापूर जवळ थांबलो तेव्हा तो तसेच मला बोलला. परत एक-दीड तासांची बाईक चालवून आम्ही राजापुरच्या पुढे मध्येच रस्त्याला लागून थांबलो. आता जरा अक्षताला थकवा जाणवायला लागला होता. आजू-बाजूला काहीच नव्हते आणि त्यात चीट्ट अंधारात आम्ही बाईक रस्त्याच्या बाजूला इंडिकेटर चालू ठेवून उभे होतो. आज आम्ही वेळेत देवरुखात पोहोचू असे वाटत नव्हते आणि तो पर्येंत देवरुखात हॉटेल पण बंद होणार. त्यामुळे आम्ही हातखांब्याला जेवायला थांबूया असे ठरवले.

जास्त वेळ न थांबता परत आम्ही बाईक वर स्वार झालो आणि निघालो पुढे. रात्रीच्या वेळी मुंबई - गोवा हाइवे वर आम्ही जरा सावध पणे हळू-हळू बाईक चालवत होतो. पुन्हा दीड-दोन तासांची बाईक चालवून आम्ही हातखांब्याला हॉटेल अलंकारला थांबलो. आता रात्रीचे ११ वाजले होते आणि जर आम्ही हॉटेल वर बसून जेवलो तर अजुन एक तास भर जाईल असे म्हणून आम्ही इकडून जेवण पार्सल घेऊ असे ठरले. कारण आता देवरुख फक्त ३५ एक किलोमीटर वर होते. तासा भरत घरी पोहोचू आणि मग निवांत जेऊ. राजू आणि उन्मेष ने पटकन पार्सल ऑर्डर केली आणि ऑर्डर जरा लवकर देण्यास सांगितली. आम्ही सर्व तो पर्येंत फ्रेश होऊन घेतले. लगेच ऑर्डर आली आणि ती घेऊन सर्व निघालो. पांगेरी मार्गे आम्ही तासा भरात देवरुखला पोहोचलो होतो. आजचा आमचा दिवस जरा जास्त मोठा झाला होता. आता मात्र सर्व जरा थकले होते. सर्वांनी पटा - पट फ्रेश होऊन घेतले आणि तो पर्येंत अक्षताने जेवणाची तयारी केली. १२.३० च्या दरम्यान जेवण करून घेतले आणि सर्वच आराम करत गप्पा मारत बसलो. सर्व फार थकलो होतो तरी पण बाईक ट्रिप पूर्ण झाल्याच्या आनंद पण सर्वंच्या थकलेल्या चेहऱ्यावर झळकत होता. बाईक ट्रीपच्या सर्व आठवणींची उजळणी करत आम्ही सर्व १.३० च्या दरम्यान झोपी गेलो.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - सहावा दिवस (मालवण ते वेंगुर्ला)

१० जून २०१०, सकाळी उठलो आणि सर्व प्रार्तविधी उरकून पुढे निघायच्या तयारीला लागलो. तसे आजही आम्ही सकाळी आरामातच उठलो होतो. रावची तब्येत अजून थोडीशी नरम गरम होतीच, पण आता आमच्या कडे काही पर्याय पण नव्हता. आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पुढे जायचे होतेच आणि प्रशांत व हेमंतला पण मुंबईला जायचे होते. आज आम्ही घरीच चहा व बिस्किटांचा नाश्ता केला आणि सर्व सामान बाईकवर लावायला लागलो. सर्वांनी आम्हाला सामान लावायला मदत केली. प्रशांत व हेमंत चा निरोप घेऊन ११च्या दरम्यान आम्ही मालवणातले आचरेकारांचे घर सोडले.

एक तासभाराची आरामात बाईक चालवून आम्ही परूळ्याच्या काही किलोमीटर आली कडे पोहोचलो. एवढ्या राजुला लक्षात आले की तो त्याचा फोन प्रशांतच्या घरी विसरला आहे. मग काय आमची सर्वांना फोना-फोनी चालू झाली. राजूचा फोन वाजताच होता. प्रशांत व हेमंत या आचरेकर बंधूनी पण त्यांचे घर सोडले होते आणि कुडाळच्या रस्त्याला लागले होते. आता करायचे काय हा विचार चालला होता, यातूनच अचानक राजुला लक्षात आले की त्याने फोन निघताना घराच्या बाहेर जिन्याच्या जवळच कठड्यावर शेवटचा ठेवलेला असे आठवले. फोन बद्दलची हि त्याची शेवटचे आठवण होती. मग आता काय करायचे, परत मागे गेल्या शिवाय काही पर्याय तर नव्हताच. उन्मेष व राजू परत मागे जाऊन फोन घेऊन येतील आणि तो पर्येंत आम्ही परुळ्यात जाऊन त्यांची वाट पाहू असे ठरले आणि आम्ही आप-आपल्या मार्गाला निघालो.

मी, अभिजित आणि अक्षता परुळ्यात पोहोचलो आणि भोगवे-निवतीच्या फाट्यावर थांबलो. फाट्यावर एक छोटेसे हॉटेल पाहून आमची तिकडेच पथारी पसरली. सर्वप्रथम गर्म्या मुळे एक-एक मॅंगोला मारला आणि मग काय मिळेल ते खायला मागवायचे त्याचा विचार करायला लागलो. बर्याच आरामात आमचे काय खायला मागवायचे याचा विचार चालला होते. कारण आम्ही हा विचार करे पर्येंत उन्मेष व राजू मालवणात पोहोचले होते. राजूला जे वाटत होते, फोन तिकडेच होता. फोन घेऊन ते आता निघाले आहेत असे त्यांनी सांगितले. फोने ठेवला आणि माझ्या व राव मध्ये चर्चा चालू झाल्या, की आज उन्मेष ने बाईक मजबूत पळवली असणार, नाहीतर एवढ्या पटकन १७-१८ किलोमीटर कसे जाणार. आता उन्मेषला बरेच दिवस आमच्या बरोबर झाले होते आणि आमच्या बरोबर त्याला बाईक पळवायला मिळाली नव्हती. त्याला बाईक हळू चालवणे अजिबात आवडत नाही. तसा तो काय रावडी बाईक चालवणारा नाही आहे, पण आमच्यात त्यातल्या-त्यात उन्मेषच जर जास्त बाईक पळवतो. आमच्या सर्वांच्य स्वभावामध्ये बाईक सुसाट रावडी सारखे पळवणे तसे जरा कमीच आहे. आज राजूच्या फोनच्या निमित्ताने उन्मेष सुटला होता. वास्तविक आम्हीच आज त्याला आता काय ती बाईक पळवच असे सांगितले होते. याचे कारण जर तो फोन कोणाच्या हातात लागला असता तर मग मिळाला नसता आणि मग फोन गेला असता. जो पर्येंत तो फोन वाजत होता म्हणजे तो पर्येंत फोन साबुत होता. अजून कोणाच्या हात पडला नव्हता, याची आम्हाला जाणीव झाली होती. या कामासाठी उन्मेष फारच योग्य व्यक्ती होता असे मला व रावला माहिती होते महणूनच राजुला उन्मेष बरोबरच पाठवले होते.

आमच्या सर्व विचार आणि चर्चांमध्ये एका तासाच्या आत राजू व उन्मेष मालवण वरुन फोन घेऊन परत आले. राजूला मॅंगोला पियायचा नव्हता कारण तो मालवण वरून येताना उन्मेषच्या मागे बसून त्याला पियायचे ते तो घेऊन पितच येत होता. उन्मेषला तर काहीच पियायचे नव्हते. मग त्यांच्या बरोबर उन्मेषच्या बाईक चालवण्याच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मग निघालो भोगव्याच्या दिशेने. परुळे ते भोगवे हे ७-८ किलोमीटरचे अंतर आरामात मध्ये-मध्ये विचारत विचारत अर्ध्या तासात पार केले. भोगवे बीच हा बर्‍या पैकी प्रसिध आहे. भोगवे गावातून बीच वर जाण्याचा रस्ता विचारला आणि गेलो बीचच्या दिशेने. बीच गावा पासून जरा बाहेर आहे आणि दुपारची उन्हाची वेळ होती म्हणून बीचच्या आजु-बाजूला पण कोणी दिसत नव्हते. बीचच्या जवळ असलेल्या दोन हॉटेलच्या मधून एक छोटासा रस्ता बीच कडे जातो. त्या दोन पैकी एका हॉटेल मध्ये हाच का भोगवे बीच असे विचारून घेतले आणि बीच वर गेलो. मस्त बीच होता पण उन्हा मुळे सर्वांना चटके लागत होते. थोड्याच वेळात बीच वरची फोटोग्राफी करून घेतली आणि परत त्या दोन पैकी एका हॉटेल मध्ये येऊन बसलो. उन्हाच्या त्या चटक्यातून आता हॉटेलच्या सावली मध्ये जरा बरे वाटत होते. हॉटेल मध्ये तोंड धुवून आणि थोडेसे हाणून घेतले. मस्त थोडा वेळ हॉटेलच्या सावलीत आराम करून घेतला आणि मग निघालो निवती किल्ल्याच्या दिशेने. किल्ला एका छोट्या टेकडीवर आहे आणि किल्ल्या पर्येंत रस्ता झला असून बाईक वर पर्येंत जाते असे कळाले.

भोगव्यातून निघालो आणि ५-६ किलोमीटर वर असलेल्या निवती गावातून निवती किल्ल्या वर गेलो. किल्ल्याच्या जवळ जीत पर्येंत रस्ता आहे तीत पर्येंत बाईक घेऊन गेलो आणि बाईक लावल्या एका बाजूला. त्याच्या पुढे जराशी एक तटबंदी चढून किल्ल्यावर आलो. किल्ल्याच्या थोड्याश्या राहिलेल्या तटबंदी वर आता फक्त एखाद दुसराच बुरूज साबुत आहे. किल्ल्याच्या पठारावर पण छोटीशी झाडी सोडली तर एकही इमारतीचे अवशेष आता दिसत नाही. पण आम्हाला मात्र या किल्ल्याच्या पठारावर सर्वत्र कचरा दिसला. प्रत्येक झाडा-झुडपाच्या बुंध्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या. एक-दोन नाही तर शेकडो होत्या. हे पाहून आमची टाळकीच सरकली. हा एवढा आधुनिक कचरा कश्या मुळे हे काही केल्या कळेच ना. शिवाजी महाराजांच्या काळात प्लास्टिक नव्हते एवडे तर नक्की, मग आता हा कचरा कुठून आला हा प्रश्न माझ्या मनात पडला. प्रथम दर्शनी गडावर येणाऱ्या पर्यटकांनी, गड प्रेमींनी किंवा शिव प्रेमींनी हा कचरा केला असावा असे वाटले. अजून पुढे गेलो आणि अजून जास्त कचरा दिसला म्हणून कसली तरी पिकनिक किंवा सहल वाल्यांनी हा कचरा केला असावा असे हि आम्हाला वाटले. पण पुढे गड पाहात फिरत असताना मध्येच आम्हाला ड्रम, बॅरल आणि लाकडाचे बांधकाम दिसले. हे सर्व समान पण सर्वत्र मोडकळीच्या अवस्थेत पसरलेले दिसले. हे पाहून माझे व रावचे मजबूत डोके फिरले होते आणि तेवढ्यातच समोरून २ लहान मुले येत असलेली दिसली. मी व रावने त्यांना या सर्व प्रकारच्या कचऱ्या बद्दल आमच्या मनात असलेले सर्व प्रश्न विचारले. अभिजित राव ने त्याच्या हाताच्या घडीच्या मधून त्या मुलांचे आणि आमचे संभाषण रेकॉर्ड करून घेत. त्या मुलां कडून मिळालेली माहिती तर फारच धक्कादायक होती. हा कचरा एका खाजगी टी. वि. वाहिनीच्या एका मालिकेचे चित्रीकरणाच्या वेळी केला होता. यू.टी.वी. बिंदास वाहिनीचा दादागिरी नावाची मालिकेचे चित्रीकरण तब्बल ४० एक दिवस झाले होते. त्या मुलांच्या सांगण्या वरून यांनी केलेला हा सर्व उपद्व्याप आहे. उपद्व्याप कसला हि तर गडाची आणि निसर्गाची नासधूस आहे आणि ते पण एका जवाबदार टी. वि. वाहिनी कडून. हे ऐकून तर माझे टाळके फारच जास्त सरकले होते त्यांच्या वर. आता मुंबईत गेल्यावर हे आपण उघडकीस आणायचे असे मी व रावने ठरवले. आमच्या लेह बाईक ट्रीप वर आइ.बी.एन. लोकमत ची पत्रकार साधनाला हि माहिती द्याची हे ठरले.

हे पहा त्या कचऱ्याचे फोटो…

 
 
 


त्या पोरांना धन्यवाद म्हणत त्यांचा निरोप घेतला आणि राहिलेला किल्ला फिरायला लागलो. समुद्राच्या बाजूच्या तटबंदिवर जाऊन समुद्र किनाऱ्याची फोटोग्राफी करू लागलो. रावला आकाशात एक घार आमच्या  डोक्यावर गिरक्या मारत असल्याची दिसली. लगेच त्याने माझ्या कॅमेऱ्याला दुसरी लेन्स लावली आणि त्या घारीचे फोटो टिपायचा प्रयत्न करू लागला. घारीचे दोने चार फोटो टिपले आणि आता जास्त वेळ उन्हात नको असे म्हणत आम्ही किल्ल्याच्या एक छोटासा फेर-फटका मारून बाईक पाशी आलो. माझे मन किल्ल्यावर पहिलेलाया कचऱ्याने फारच चल-बिचल झाले होते. बाईक काढल्या आणि थेट परुळ्याच्या फाट्यावर आलो. निवतीच्या या कचऱ्या बद्दल तिकडे कोणाला तर विचारू असे माझ्या मनात होते. शेवटी हा निवातीचा कचरा माझ्या डोक्यात फारच झाला आणि मी तिकडे हॉटेलच्या बाहेर उभा असलेल्या एका इसमाला विचारले. त्या गावकऱ्याला पण या सर्व कचऱ्या बद्दल चांगलीच माहिती होती. पण तिथली ग्रामपंचायत काहीच करत नाही अशी अजून एक धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली. थोडावेळ त्या इसमाशी कचऱ्या विषयी चर्चा झाली. त्यांच्या कडून निवती ग्रामपंचायतीचा पत्ता घेतला आणि जरा मन शांत करून आणि हॉटेल मध्ये शिरलो.

हॉटेल मध्ये चहा आणि मोनॅकोची बिस्कीटे हांडली. आज चहा, बिस्कीटान बरोबर आम्हाच्या कडे गरम-गरम निवतीचा कचरा पण होता. चर्चंती सर्वांचे मन जरा शांत झाले आणि निघालो पुढे वेंगुर्ल्याच्या दिशेने. अंधार  पडायच्या आत आम्हाला वेंगुर्ला गाठायचे होते. परुळे ते वेंगुर्ला हे अंतर सुमारे ३० किलोमीटर आहे.  आम्ही मस्त मावळणार्‍या सूर्याच्या कीरणाच्या सोबतीने फोटोग्राफी करत सुमारे २ एक तासांनी वेंगुर्ल्याच्या मुख्य बाजार पेठेच्या २ किलोमीटर अलीकडच्या टेकडीवर थांबलो. जवळ-जवळ मावळलेल्या सूर्याचे व सागरेश्वराचे मस्त दृष्या दिसत होते. आता काय आम्ही वेंगुर्ल्याच्या जवळच आलो आहोत म्हणून आम्ही बराच वेळ तिकडे थांबलो होतो.  तिकडेच मस्त आराम करत आणि फोटोग्राफी करत रिलॅक्स झालो. थोड्या वेळाने वेंगुर्ला बाजार पेठेच्या चौकातून मी माझ्या मावशीच्या मिस्टरांना म्हणजे पिंगे काकांना फोन लाऊन त्यांच्या ओळखीचा अभी याचा फोन नंबर घेतला. कारण आजची रात्र आम्हाला वेंगुर्ल्यात काढायची होती. अभी हा वेंगुर्ल्यातील स्थाईक इसम आहे. त्याच्या ओळखीने आम्हाला कुठे तरी हॉटेल किंवा लॉज मध्ये नक्की राहायला मिळेल. मी पिंगे काकांन कडून अभीचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन लावला आणि आमची राहण्याची कुठल्या तरी हॉटेल किंवा लॉज मध्ये सोय कर असे सांगितले. त्याने मला त्याच्या ओळखीचे एक हॉटेल सांगितले आणि तिकडे जा तुम्ही मी येतो मागवून. बाजारपेठेच्या मागच्या बाजूने आम्ही त्या हॉटेलला पोहोचलो आणि मागो माग अभी पण आला. त्याने आमच्या साठी २ रूमची सोय करून दिली आणि १२०० रुपये भाडे ठरवले.

बराच वेळ मी अभीशी गप्पा मारत बसलो. मला २००८ मध्ये ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता तेव्हा मला  डॉक्टरांनी विश्रांती आणि हवा पाणी बदला साठी कुठे तरी बाहेर जा असे सांगितले होते.  डॉक्टर माझ्या पिंगे काकांचे मित्र आणि वेंगुर्ल्यातलेच आहेत. त्यांना माहिती होते कि पिंगे काकांचे वेंगुर्ल्यात घर आहे, मग काय त्यांनी ठरवले कि आपल्या वेंगुर्ल्याला घेऊन जा याला. त्यावेळेला काकांनी मला २ आठवडे वेंगुर्लात राहायला आणले होतो. तेव्हा अभी दररोज दिवसातून किमान २-३ वेळा काकांच्या घरी यायचा. अभी हा स्वभावाने फारच खोडकर व मिश्किल. तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा सर्वांचे मनोरंजन करून जायचा. यामुळे अभी हा मजबूत मिश्किल आणि हस्या माय वकती आहे याची मला पहिल्या पासून माहिती होती. आज पण तो आमच्या बरोबर मस्त गप्पा-टप्पा आणि मज्जा मस्ती असाल मालवणी पद्धतीने करत होता. आभिला कुठे तरी काम साठी जायचे होते म्हणून तो निघाला. आम्ही वेंगुर्ल्यात चांगले जेवण कुठे मिळेल हे त्याला विचारून घेतले आणि त्याला निरोप दिला.

सर्वांनी आंघोळ वगरै करून अभीने सांगितलेल्या हॉटेल मध्ये म्हणजे बाजार पेठे जवळच गेलो. आम्हा सर्वांचे आवरून जेवायला हॉटेल वर जायला जरा उशीरच झाला होता आणि त्यामुळे हॉटेल मध्ये बर्‍या पैकी जेवण संपले होते. सर्व प्रथम तर त्यांनी जेवणाची ऑर्डर घेण्यास तयारी दाखवली नाही. मग आमच्या थोड्या आग्रहास्तव आणि आम्हाला अभीने तुमचे हॉटेल वेंगुर्ल्यतले सर्वात प्रसिद्ध हॉटेल आहे असे सांगून इकडे पाठवले आहे असे हि सांगितले. मी तर त्यांना बोललो आता जे तुम्ही जेवायला देऊ शकतात ते द्या, माशे, चिकन, मटण आणि काही शकाहारी पण चालेल. मग आमच्या येवढ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला आता फक्त चिकन आणि शाकाहारी देण्यास तयार झाले. मात्र हे हि जेवण ते आम्हाला बनवून देणार होते त्यामुळे जेवण यायला वेळ लागणार असे हि त्यांनी सांगितले. आम्हाला कसली घाई होती, हरकत नाही असे बोलून आम्ही जरा बाजारात फेर-फटका मारुन येतो असे त्यांना सांगितले. हॉटेलच्या बाहेर पडलो आणि पहातोतर सर्वत्र सामसूम बाजार संपूर्ण बंद झाला होता आणि रस्त्याला पण फारसे कोणी नव्हते, काही बेवडे आणि कुत्रे-मांजरीन शिवाय. मग काय परत फिरलो हॉटेल कडे आणि जेवण यायची आतुरतेने वाट पाहत व गप्पा मारत बसलो. आजही रावची तब्बेत जास्त काही चांगली नव्हती आणि अक्षता तर मौसाहार खातच नाही. तसा आज माझा ही शकाहारी जेवणाचा मूड होता. म्हणून आम्ही शाकाहारी जेवण मागवले आणि राजूने मात्र चिकन ऑर्डर केली. बराच वेळाने जेवण आले, पण जेवण मात्र मस्तच होते. छान गरम-गरम घरगुती जेवण मिळाले आणि तेही बरेच दिवसांनी शाहाकारी जेवण. जरा बरे वाटत होते. जेवण उरकले आणि परत हॉटेल वर आलो. आज २ रूम होत्या म्हणून, मी व अक्षता एका रूम मध्ये आणि राव, राजू व उन्मेष एका रूम मध्ये. उद्या आमचा दिवस फार मोठा आणि मजबूत पळा-पळीचा आहे याची सर्वांना मी जाणीव करून दिली आणि जो काय आराम करायचा आहे तो आजच करून घेऊया असे सांगितले. त्यामुळे आज जास्त उपद्व्याप न करता आम्ही आप-आपल्या रूम मध्ये गेलो. बर्‍याच दिवसांनी मला टी. वी. पाहायला मिळाला म्हणून मी थोडा वेळ टी. वी. बघत राहिलो मात्र अक्षता झोपी गेली आणि मग थोड्या वेळानी मी पण झोपलो. 

2.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - पाचवा दिवस (मालवण आणि जवळ पास)

०९ जून २०१०, कालच्या माझ्या आणि रावच्या मच-मची मुळे आम्ही बरेच उशिरा झोपलो होतो. त्यामुळे आज आम्ही दोघेच सर्वात उशिरा उठलो. बाकी सर्व ९-१०च्या दरम्यान उठले. पण मी आणि राव आरामात ११-११.३०च्या दरम्यान उठलो आणि आता आम्ही दोघेच मस्त रेंगाळत बसलो होतो. आज आमचे तसे जास्त फिरायचे काही ठरले नव्हते. फक्त मालवण (सिंधुदुर्ग) किल्ला, मालवण मधले जयंत साळगावकरांचे सोन्याच्या गणपतीचे मंदिर आणि मग तारकर्ली. या आजच्या भटकंती साठी सुद्धा आम्ही बरेच उशिरा उठलो होतो. पण आता कालच्या मच-मची मुळे आज माझा फार काय मूड नव्हता कोणाला धावपळ करायला लावायला. त्यातून सर्वात महत्वाचे म्हणजे आज रावची पण जरा तब्येत बरी नव्हती. रावने आधीच सांगितले की आज जवळ पासच्या भटकंतीला तो येणार नाही. कालचा थकवा सर्वांचा आज बाहेर पडत होता.

मग काय ज्यांना आज जे करायचे आहे ते त्यांनी करून घ्या असे ठरले. मी मात्र कोणी येवो किंवा नको येवो मी ठरल्या प्रमाणे सर्व पाहणार होतो. माझ्या पाठो-पाठ मग अक्षता पण तयार झाली आणि मग हळू-हळू राजू, राव व सर्वच तयार झाले. मग आता जर सर्वांनी जायचे तर मग आता सर्वांना लगेच तयार व्हायला मी सांगितले. बाकी सर्व तयार होई पर्येंत मी व प्रशांत मालवण मार्केट मध्ये पुढे गेलो. मागाहून सर्व तयार होऊन मार्केट मध्ये आम्हाला भेटले. रावला बरे वाटत नव्हते म्हणून तो घरीच आराम करत राहिला. मला काजू घ्यायचे होते ते आम्ही मार्केट मध्ये असलेल्या झांटे यांच्या दुकानात जाऊन घेतले. मग सर्व मिळून मालवण मधली फेमस वडा उसळ आणि मिसळ खायला दयानंद हॉटेल मध्ये घुसलो. मस्त गरम-गरम वडा उसळ आणि मिसळ बरोबर बऱ्याच गप्पा-टप्पा चालू होत्या. पोट पूजा उरकून आम्ही मार्केट मध्ये एक फेर-फटका मारला आणि मालवण किल्ला पाहाण्या बद्दल चौकशी करायला गेलो. मालवण बंदर गाठले आणि आमच्या साठी एक धक्कादायक बातमी कळली. ३१ मे नंतर सिंधुदुर्ग किल्ल्याकडे घेऊन जाणाऱ्या बोटी बंद झाल्या आहेत. सरकारी नियमा नुसार या बोटी बंद होतात. यामुळे आता आम्हाला हा किल्ला पाहायला मिळणार नाही हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागले. किल्ला तर आतून पाहायला मिळणार नाही म्हणून आम्ही बंदरावरूनच किल्ल्याची आणि बंदराच्या परिसरातली फोटोग्राफी करून घेतली. वास्तविक आमच्या या सागरी किल्ले भाग दुसऱ्या ट्रीपचा हा सर्वात महत्वाचा किल्ला होता. किंबहुना संपूर्ण सागरी किल्ल्यातला हा किल्ला महत्वाचा आहे. हा किल्ला पहिल्या शिवाय सागरी किल्ले ट्रीप संपन्न होऊच शकत नाही. पण काय करणार आम्हाला हे हि वास्तव स्वीकारावे लागत होते.




थोडा वेळ मालवण बंदरावरच टंगळ-मंगळ करून मग प्रशांतच्या घरी आलो. आता पुढे काय याचा विचार करायला लागलो. आमच्या यादीतले सर्वात महत्वाचे ठिकाण निघून गेले आणि राहिले होते तारकर्ली व साळगावकर यांचे सुवर्ण गणेश मंदिर. गणपतीचे मंदिर प्रशांतच्या घरा पासून जवळच होते. तारकर्ली परिसर मालवण पासून अंदाजे ७-८ किलोमीटर वर आहे. प्रशांत आणि हेमंतच्या मते तारकर्ली परिसरात पण आता काय पाहायला मिळणार नाही. जसे किल्ल्याला जाणार्‍या बोटी ३१ मे नंतर बंद होतात त्याप्रमाणे तारकर्लीच्या पण बऱ्याच गोष्टी बंद असण्याची शक्यता असू शकते. मग राव, हेमंत आणि आमच्यात एक मत झाले. तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहायला पुढे परत मालवणात येऊ असे ठरले. शिवाय प्रशांतचे घर मालवणात आहेच परत कधीही ३-४ दिवसांची सुट्टी घेऊन येऊ शकतो. अश्या पद्धतीने आम्ही आमच्या मनाचे सांत्वन करून घेतले. मग आता उरलेल्या अर्ध दिवस करायचे काय? प्रशांतच्या घरा जवळच चेवला बीच आहे तिकडे जाऊन मस्ती करू असे ठरले आणि संध्याकाळी साळगावकरांच्या गणपती मंदिराला पण जाऊ.

अजून बऱ्याच जणांच्या अंघोळ बाकी होत्या. उन्मेश, प्रशांत, हेमंत आणि राजू चेवला बीच वरून आल्यावर मग आंघोळ करणार होते. मला बीच फार काय आवडत नाही म्हणून मी बीच वर न जाण्याची इच्छा दर्शवली आणि ती मान्य पण झाली. पण माझ्या न जाण्या मुळे अक्षातला बीच वर जाण्याच्या मूड असून सुद्धा नाही जाता आले. मी अक्षातला बोललो की तुला जर जायचे असेल तर मग मी येईन मात्र मी पाण्यात नाही उतरणार. मग ती मला बोलली पाण्यात नाही जायचे तर मग बीच वर कसली मज्जा, जाऊदे मग आपण घरीच बसू. या मुळे मी, अक्षता आणि राव घरीच बसलो आराम करत.


राजू, उण्मेष, प्रशांत आणि  हेमंत बीच वरुन येई पर्येंत आम्ही आमच्या आंघोळ्या आटोपल्या. मागाहून मग ते सर्व जण आल्यावर त्यांनी हि त्यांच्या आंघोळ्या उरकून घेतल्या. आज अभिजित रावला जेवणाचा पण मूड नव्हता.  गेल्या २ दिवसांच्या पळ-पळी मुळे रावची तब्येत जरा जास्तच खालावली होती आणि त्या मुळे आज अभिजित पूर्ण पणे आराम करणार असे ठरले. आम्ही सर्व परत अतिथि बांबू हॉटेल मध्ये जेवायला गेलो. आज मात्र मी काही तरी नवीन चव पाहायची म्हणून मोहोरी मटण ताट सांगितले आणि प्रत्येकाने आप-आपली ऑर्डर सांगितली. आज आमचे मस्त आरामात जेवण चालले होते. दररोजच्या धावपळी तून आज आमचे मस्त रिलॅक्स चालले होते. मोहोरी मटण आणि चिकन व माश्याची मेजवानी हांडली आणि परत घरी येऊन आराम करत बसलो. थोडा वेळ गप्पा-टप्पा   चालल्या आणि मग दीड-दोन तासांची सर्वांनी पथारी पसरली.

उठून सर्व फ्रेश झालो आणि ठरल्या प्रमाणे जयंत साळगावकर यांच्या मालवणातला सोन्याचा गणपतीचे मंदिर पाहायला निघायच्या तयारीला लागलो. आता पण राव घरीच आराम करणार होता, तुम्ही गणपती बघून या असे त्याने सांगितले. प्रशांत व हेमंत ने तर हा गणपती कैकदा पाहिला आहे त्यामुळे तेही येणार नव्हते. मग काय मी-अक्षता आणि राजू-उंमेंश असे चौघेच गणपती पाहायला गेलो. प्रशांतच्या घरा पासून बऱ्या पैकी जवळच मंदिर आहे. रस्त्यात येणार्‍या जाणाऱ्यांना मंदिराच्या रस्ता विचारत आम्ही मंदिरा पाशी पोहोचलो. बाईक मंदिराच्या आवारातच लावल्या आणि घुसलो दर्शनाला. मस्त मंदिर आहे ते आणि गणपतीची मूर्ती पण. फारच मस्त वाटत होते. मी त्यांना विचारले की फोटो काढू शकतो का त्यानी सांगितले हा. मग काय मी सुटलोच, मस्त गणपतीच्या मूर्तीचे फोटो कडून घेतले आणि आलो बाहेर. थोडा वेळ तिकडेच मूर्ती कडे न्याहाळत बसलो मन भरून सोन्याच्या गणपतीचे रूप न्याहाळून घेतले आणि आलो परत प्रशांतच्या घरी.

उद्या आमचा, पुढे गोव्या कडे जायचा प्लान होता आणि प्रशांत व हेमंतची पण परत मुंबईला जायची एस.टीची तिकिटे होती. सर्वांनी मस्त २ दिवस प्रशांतच्या घरी पथारी पसरली होती आणि आता त्या सर्व सामानाची बांधा- बांद करायची होती. प्रशांत व हेमंतची एस. टी उद्या संध्याकाळी कुडाळ वरुन होती, म्हणून आम्ही त्यांना तुम्ही आमच्या बरोबरच चला आणि आम्ही तुम्हाला कुडाळला सोडून मग वेंगुर्ल्याला जातो असे सांगितले. जेणेकरून त्यांना पण निवतीचा किल्ला फिरायला मिळेल. पण प्रशांत व हेमंत काही या पर्यायाला तयार नव्हते. सर्वांनी त्यांना थोडे-थोडे करून समजावून पहिले पण ते काही केल्या ऐकेना. शेवटी मग सकाळी उठून आम्ही आमच्या मार्गाला लागणार आणि ते दुपारी कुडाळसाठी निघणार असे ठरले. प्रशांत व हेमंत आम्ही मालवणात येणार  म्हणून त्या वेळेला आमच्यासाठी आले आणि आमच्या बरोबर मज्जा करायला होते हेच आमच्या सर्वांसाठी फार लागून राहीले होते. आम्हाला सुरवातीला असे वाटले होते कि ते एक दिवस आमच्या बरोबर फिरतील. पण असे काही झाली नाही ते तर सर्वच वेळ आमच्या बरोबर होते.

सर्व उद्याची निघायची कामे केली आणि नेहमी प्रमाणे ठरलेल्या हॉटेल अतिथि बांबू मध्ये जेवायला गेलो. सर्व मस्त गप्पा-टप्पा टाकत जेवण चालले होते. आता मात्र सर्वांचा थोडासा मूड खालावलेला होता. कारण गेले २-३ दिवस आम्ही सर्वांनी मिळून फार मस्ती आणि मज्जा केली होती. आता उद्या आम्ही विभागलो जाणार होतो. जेवण उरकले आणि घरी येऊन परत गप्पा टाकत बसलो आणि मग झोपी गेलो.

1.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - चौथा दिवस (मालवण - आचरा - कुणकेश्वर - मालवण)

०८ जून २०१०, सकाळी मस्त आरामात १०च्या दरम्यान आम्ही उठलो. बराच वेळ आरामात इकडे-तिकडे रेंगाळत होतो. कालच्या थकव्या मुळे सर्वच जरा सुस्तावलो होतो. जरा आरामात टंगळ-मंगळ करत आमचा चहा नाश्ता असे चालले होते. १२च्या दरम्यान मग मी सर्वांना चला आता भटकंती करायला असे म्हणत सर्वांचे सूत्र हलवायला लागलो. मला दुसरा काही पर्यायच नव्हता, आज सगळेच आरामात काम करत होते. काल देवगड नंतर अंधार पडल्या मुळे, देवगड ते मालवणच्या दरम्यानची मधली सर्व स्थळे पहायची सोडली होती. आज काही करून ती राहिलेली स्थळे आम्हाला पहायची होतीच. सर्वांचे आवरून आम्ही १.३० च्या दरम्यान मालवण हून परत मागच्या बाजूला आचऱ्याच्या दिशेने निघालो. आचरे हे प्रशांत व हेमंत आचरेकर यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या ग्रामदेवाला जायचे होते आणि त्याच रस्त्यावर भगवंतगड व भरतगड पण आहे. आम्हाला भगवंतगड व भरतगड पाहून पुढे कुणकेश्वरला पण जायचे होते. आज आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायच्या होत्या आणि ते ही अर्ध्या दिवसात. आजचा अर्धा दिवस आम्ही वाया घालवलेला होतो. यामुळे आज जरा माझी चीड-चीड आणि पळ-पळ चालू होती. मी आज सर्वांवर थोडासा रागावलो होतो.

याच रागाच्या भरात आम्ही २ च्या दरम्यान मालवण सोडले आणि लागलो आचऱ्याच्या रस्त्याला. मालवण शहरातून २-३ किलोमीटरच गेलो असू आणि डाव्या बाजुला समुद्राच्या निळ्या भोर पाण्याने आम्हाला दर्शन दिले आणि माझा संपूर्ण राग या निसर्गाच्या रंगात विलीन होऊन मी शांत झालो. आता मी परत मस्त निसर्गाचा, बाईक चालवण्याचा आणि फोटोग्राफीचा आनंद लुटायला लागलो होतो. मी हे निसर्ग रम्य दृश्य मनभरून पाहायला थांबलो. एक-दोन फोटो पण काढून घेतले आणि निघालो पुढे. मस्त आरामात आनंद लुटत आम्ही आचऱ्यात आलो. सर्वप्रथम सर्वांना फार भूख लागली होती. नाश्ता पण तसा काय पोठ भरून केला नव्हता. जरासा चहा-बिस्कीट वगैरे असाच होता. जास्त उशिरा कोकणात जेवण मिळत नाही हा आमच्या कालचा अनुभव होता. अजून पुढे जास्त उशीर झाला तर मग जेवण मिळण्याची शक्यता कमी होणार. या विचाराने आम्ही सर्वांत पहिले जे हॉटेल दिसले त्या हॉटेल मध्ये घुसायचे असे ठरले. लगेच पुढे एक हॉटेल दिसले, हॉटेल कसले ते रस्त्याला लागून एक छोटेसे खोकटेच होते. पण माश्याचा जेवणाचा मस्त बाहेर रस्त्या पर्येंत वास येत होता. किंबहुना याच माश्याच्या वासाने आम्ही या हॉटेलच्या जवळ थांबलो.

आम्ही बाईक हॉटेलच्या बाहेर लावल्या पण हॉटेल मध्ये आधी पासून एक फॅमिली बसलेली होती आणि त्यांचे आवरण्याची वाट पाहत बाहेरच बाईक जवळ बसलो. त्यांचे उरकायलाच आले होते. त्यांचे आवरले आणि मग आम्ही घुसलो. पटा-पट जेवण्याच्या ऑर्डर सुरु झाल्या. माझे ठरल्या प्रमाणे मासे थाळी. कोणी मटण तर कोंबडी अश्या ऑर्डर झाल्या. अक्षता, हेमंत व प्रशांत शाकाहारी थाळी. हेमंत आणि प्रशांतला ग्रामदेवाला जायचे होते म्हणून त्यांचा आज शाकाहारीचा बेत केला. जेवण येई पर्येंत आम्ही थंडा मागवला. आज जरा जास्तच उकडत होते. घामाच्या नुसत्या धारा वाहत होत्या आणि गरमा पण सहन होत नव्हता. त्यातून आज हवा पण पडली होती. हॉटेलच्या खोकट्यात तर फारच जास्त गरम होत होते. म्हणून जेवण येई पर्येंत मी, राव व राजू हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर थंडा पीत उभे राहिलो.

जेवण आले आणि सर्व तुटून पडलो, फारच भुकेलेलो होतो आणि त्यातून जेवण पण यायला बराच वेळ लागला होता. मी आज सुरमई वर ताव मारत होतो. सुरमई, मटण, कोंबडी याची एक-मेकान मध्ये देवाण-घेवाण करत आम्ही जेवण उरकले. जेवणा नंतर मस्त एक-एक ग्लास थंड सोळकडी पण झाली आणि निघालो आचरेकरांच्या ग्रामदेवळात जायला.

देऊळ हॉटेल च्या जवळच १ एक किलोमीटर वर होते. देवळाच्या बाहेर बाईक लावल्या आणि देवळाच्या आवारात शिरलो. देऊळ फारच मस्त होते जुन्या काळातले लाकडी खांबांचे सभामंडप आणि प्रशस्त आवार. आम्ही देवळाच्या सभामंडपाच्या बाहेर चपला काढायला लागलो. तेवढ्यात हेमंतने आम्हाला मौसाहार घेतला आहेत म्हणून तुम्ही देवळात नाही येऊ शकत असे सांगितले. मी हेमंतला बोललो की मला चालते, मी मासे खाऊन देवळात जातो. मला हे सर्व चालते. मी असा विचार नाही करत. पण हेमंत मला बोलला की त्यांना आणि त्यांच्या देवाला असे चालत नाही. मग आता मी काय बोलणार या विषयावर, हा प्रत्येकाच्या भावनांचा भाग आहे. मी हेमंत व प्रशांतला बोललो अरे मासे खायच्या आधी तरी सांगायचे होते ना मग मौसाहार घेतला नसता. एवढा काय मी माश्यांसाठी वेडा तर नक्कीच नाही आहे. मग काय त्या गावच्या रूदीच्या आणि त्या गावच्या माणसांच्या भावनेचा आम्ही मान राखून मौसाहार घेतलेली सर्व माणसे मंदिराच्या आवारातच एका बाजूला उभे राहिलो. बाहेरूनच मंदिराच्या सौंदर्य पाहून घेतले. वास्तविक मी अश्या कुठल्याही गोष्टींवर जराही विश्वास ठेवत नाही मला देवाच्या दर्शनाची जर इच्छा झाली, तर मग मी कुठल्याही असस्थेत असो मी दर्शन घेतो. मी या पुर्वी पण कैकदा मौसाहार करून किंवा अंघोळ सुद्धा न करून देवळात देवाचे दर्शन घेतले आहे आणि ते पण अष्टविनायक, मार्लेश्वर सारख्या प्रसिद्ध देवस्थानाला. माझ्या कुठलाही प्रवासात किंवा भटकंतीत अशी प्रसिद्ध देवस्थाने रस्त्यात लागली तर आवर्जून मी भेट देतो. पण या वेळेला मी हेमंतशी जास्त हुज्जत न घालता मुकाट्याने गप्प बसलो. कारण मला आपल्या मित्राच्या आणि त्यांच्या परिवारच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. अश्या बाबतीत माझे मत जरा जास्तच कठोर असते, हे मला परिपूर्ण ठाऊक आहे आणि या मुळे मला वाद उठवायचा नव्हता.म्हणूनच मी या विषया वर माझे कठोर मत मांडले नाही.

असो, प्रशांत व हेमंत देवाचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्हा सर्वांना प्रसाद वाटला. प्रसाद फस्त करून निघालो भगवंतगडाच्या दिशेने. मंदिराच्या बाहेरच काही लोकां कडून भगवंतगड व भरतगडा कडे कसे जायचे आणि या गडा बद्दलची अजून काही जास्त माहिती करून घेतली. यातूनच कळाले की भरतगड आता काही पाहण्या लायक राहिला नाही आहे. एक तर हा गड म्हणजे आता फक्त एकाच बुरूज राहिला आहे आणि बाकी सर्व ढासळलेले आहे. या गावकऱ्यांच्या सूचनेचा आदर राखून आम्ही भरतगड नाही पाहायचा असा चर्चांती निर्णय घेतला. दोने दिवसान पूर्वीच आम्हाला आंबोळगडचा परी-पूर्ण अनुभव आला होताच. मग आता आमची स्वारी निघाली भगवंतगडा कडे. आचऱ्यातून डोंगरा कडे जाणार्‍या रस्त्याला लागलो आणि प्रत्येक चौकात भगवंतगडा कडे रस्ता विचारत गेलो. भगवंतगड गावात गेलो आणि गडाकडे जाणारा रस्ता विचारला. हा गड सागरी किनाऱ्या जवळ नाही आहे, डोंगरावर आहे. हा गड आचरा खाडी वर निघा राखण्यासाठी डोंगरावर बांधला आहे. गड पाहण्यासाठी छोटासा ट्रेक करावा लागणार होता. गावकऱ्यांनी रस्त्यला बाईक लावा आणि शाळेच्या  मागच्या बाजूने एक पाय वाट गडा कडे जाते असे सांगितले. गावकऱ्यांच्या सांगण्या प्रमाणे आम्ही केले. रस्त्याला बाईक लावल्या आणि शाळेच्या आवारात जरा मस्ती करत होतो. सर्व मिळून मस्त रावची टेर खेचत होतो. शाळेच्या भिंतीन वर सुविचार लिहिले होते त्यावरून सर्व रावची टेर खेचत होतो. शाळेच्या मागच्या बाजूने ट्रेक करायला लागलो. १५-२० मिनिटांचा छोटासा ट्रेक केला आणि गडाच्या मोडलेल्या दरवाज्या जवळ आलो. एवद्या गर्मीत, या छोट्याश्या ट्रेक ने सर्वांचा घामटा काढला. काढणार नाहीतर काय एक तर मे महिन्यातली कोकणातली गर्मी आणि त्यातून सर्वांची धावपळीची सवयच मोडली आहे सध्या. त्यातून दुपारची वेळ.

गडाच्या माथ्यावर एक छोटेसे मंदिर आहे. आजूबाजूला भली मोठी झाडी आहे. मंदिराच्या समोरच एक भरपूर मोठे झाड होते. त्या झडाच्या सावलीत आम्ही बराच वेळ आराम करून घेतला आणि गप्पा टप्पा टाकत बसलो. जस-जसे ज्याचा आराम होत-होता तस-तसे तो उठून फोटोग्राफी करून घेत होतो. मी पण माझी गडा वरची आणि गडा वरुन दिसणार्‍या आचरा खाडी च्या निसर्गाची फोटोग्राफी करून घेतली. या ठिकाणी मला प्रशांत आणि रावने नवीन नाव ठेवले "इच्छा धारी नाग". मी बाईक वर उनाचा आणि धुळीचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर आणि तोंडावर फडका लावायचो. तो फडका मी या ट्रेक वरून ते आराम करे पर्येंत काढलाच नव्हता. सर्वांनी माझी पोट भरून चेष्टा करून घेतली. किंबहूना माझे फोटो पण काढून घेतले, माझी आठवण म्हणून सर्वांनी.




सर्व आवरून गड उतरायला लागलो. पटा-पट जास्त मस्ती न करता गड उतरलो. पण शाळेकडे आल्यावर मात्र पुन्हा मस्ती सुरु झाली. आता सर्वांचा मस्तीचा मूड तयार झाला होता. विशेष करून प्रशांत, मी आणि हेमंत शाळे बाहेरचे सुविचार वाचून रावची टेर खेचत होतो. शाळे कडून पण खाली उतरलो आणि बाईक काढून परत आचऱ्यात येउन कुणकेश्वराच्या रस्त्याला लागलो. ५-५.३० च्या दरम्यान आम्ही मिटबावच्या चौकात होतो. तिकडे चौकातच कुणकेश्वरचा रस्ता विचारून घेतला आणि त्या रस्त्याने गेलो. कुणकेश्वर हे तळ कोकणातले बर्‍यापैकी मोठे देवस्थान आहे. मंदिराच्या बाहेर बरेच मोठे मैदान गाड्या उभ्या करायला आहे. रस्त्याच्या दुषी कडे हॉटेल व दुकाने आहेत. सर्वांना चहा पीहायची तलप आली होती. म्हणून मंदिरात जायच्या आधी चहा व थंड एका हॉटेल मध्ये बसून पिऊन घेतली. चहा उरकला आणि मंदिराच्या आवारात आलो. पण तिकडे पाहतो तर फारच गर्दी होती. प्रशांत व हेमंतने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बाकी आम्ही सर्व बाहेरच मंदिराच्या कठवड्यावर बसून संध्याकाळची सूर्याची किरणे पडणाऱ्या कुणकेश्वराच्या मंदिराचे सौंदर्य न्याहाळत बसलो. मंदिराला लागूनच मस्त लांब लचक बीच आहे आणि बरीच माणसे तिकडे पण होती. कुणकेश्वराचे मंदिराचा आकार बराच उंच आहे आणि निराळ्या घडणीचे हे मंदिर आहे. प्रशांत व हेमंत कुणकेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि मग आम्ही सर्व मिळून बीच वर गेलो.




बीच भलताच लांब-लचक आहे. आम्ही गर्दी पासून बर्‍या पैकी लांब पर्येंत गप्पा-टप्पा मस्त मज्जा-मस्ती  करत चालू लागलो. चालत चालत आम्ही मंदिरा पासून बरेच लांब आलो आहे असे जाणवले, म्हणून मग परत मागे फिरलो. बरेच चालून झाले होते म्हणून आता थकलो होतो. हळू हळू चालत आम्ही मंदिराच्या जवळ येऊन बीच वरची फोटोग्राफी करू लागलो. अक्षाताला समुद्राच्या पाण्यात जाऊन भिजायचे होते, मस्ती करायची होती आणि खेळायचे पण होते. पण मला जरा ही समुद्राच्या पाण्यात भिजायला आवडत नाही. किंबहूना मला समुद्र, बीच, त्यावरची वाळू तसे काय फार आवडत नाही आणि समुद्राचे पाणी तर अजिबातच नाही. जरासे पाण्यात पाय भिजवण्या पर्येंत कधी तरी मूड असेल तर जातो. मग मी अक्षाताच्या आग्रहास्तव तिच्या इच्छे खातर तिच्या बरोबर थोडावेळ पाण्यात पाय भिजवले. नंतर तिला तू एकटी खेळत रहा पाण्यात असे सांगून मी पाण्याच्या बाहेर येऊन बसलो. मग राव, राजू, हेमंत आणि प्रशांत पण येऊन बसले. बिचारी अक्षता एकटीच पाण्यात खेळात होती. थोड्या वेळाने तिचे मन भरले किंवा एकटीला पाण्यात खेळायला कंटाळा आला असेल म्हणून म्हणाना ती पाण्याच्या बाहेर आली आणि आमच्यात येऊन बसली. आता तिचे मन भरले की ती एकटी पाण्यात खेळून कंटाळली हे तीलाच ठाऊक. नक्कीच ती एकटी कंटाळली असणार असे मला वाटते.

बराच वेळ बीचवर बसून सूर्याला निरोप दिला आणि निघालो बीच वरून. परत त्याच हॉटेल जवळ आलो आणि प्रशांताला आता भजी खायचा मूड आला. याने सर्वांना भजी खाण्यासाठी प्रवृत केले. मग काय घुसलो सर्व परत त्याच हॉटेल मध्ये. कांदा भाजी ऑर्डर केल्या. ऑर्डर येई पर्येंत प्रशांत बसल्या बसल्या फोटोग्राफी करू लागला. आता सर्वांचा मस्त मूड होता, सर्वच फार आनंदी होते. गरम-गरम कांदा भजी वर तुटून पडलो. थोडा वेळ तिकडे मस्ती करत चहा मारला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. आता अंधार पडायला आला होता. म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही लगेच सुटलो. मध्ये कुठेही न थांबता एक-दीड तासांनी आम्ही मालवणात होतो. आरामात अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन घेतले आणि ९-९.३०च्या दरम्यान जेवायला परत समोरच्या हॉटेल अतिथी बांबू मध्येच गेलो. आता मी कोलंबी थाळी मागवली आणि बाकी सर्वांनी आप-आपल्या ऑर्डर केल्या. आज सकाळच्या ऐवजी आम्ही दुपारी निघून सुद्धा पटा-पट सर्व उरकल्या मुळे जरा थकलो होतो. जेवण उरकून प्रशंतच्या घरी आलो आणि गप्पा टाकत बसलो. गप्पा कसल्या आमच्या चर्चा चालू झाल्या होत्या. मी आणि राव जरा चर्चातून वादाच्या मूड मध्ये घुसलो. हे पाहून अक्षताने लगेच पळ काढला आणि ती झोपी गेली. आज सकाळच्या आरामात व रेंगाळत झालेल्या आमच्या कामा मुळे मी जरा वैतागलो होतो. त्यामुळे राव व माझ्यात बराच वाद झाला. त्याचे आणि माझे मत आप-आपल्या जागेवर बरोबर होते. माझे मत होते की सर्वांनी अगदी लवकर नाही उठले तरी चालेल पण जरा ठरलेल्या वेळेत उठायला पाहिजे आणि जेवढे लवकर होईल तेवडे लवकर बाहेर पडले पाहिजे. तेणे करून मग आरामात फिरता येते आणि संध्याकाळी मज्जा आराम पण करता येतो. रावच्या मते सर्वांना जास्त धावपळ, दग-दग आता जमात नाही आणि ती कशाला करायची. या सर्व विषयावर आमची रात्री ३ वाजे पर्येंत चर्चा वजा वाद चालू होता आणि मग शेवटी शांत गप्पा झाल्या. शेवट पर्येंत मी आणि रावच जागे होतो, एक-एक करून सर्व झोपी गेले आणि मग आम्ही पण. 

11.5.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - तिसरा दिवस (कशेळी ते मालवण)

०७ जून २०१०, सकाळी आम्ही लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी आवरून घेतले. आज अंघोळीला सुट्टी होती. सर्व सामान भरले आणि बाईकला लावायला लागलो. एवढ्यात मंदिराचे दुसरे सेवेकरी आमच्या कडे आले आणि त्यांनी अमेय साळवी कोण असे विचारले. मग मी पुढे सरसावलो आणि त्यांच्याशी चर्चा करु लागलो. त्यांनी मला विचारले कि तुम्ही फक्त १०० रुपयेच भरले आणि तुम्ही एकूण ५ व्यक्ती आहात. इकडे राहण्याचे प्रत्येकी १०० रुपये घेतले जातात. त्यांच्या अश्या बोलण्या मुळे मी व राव जरा वैतागलो. मी त्यांना सांगितले की आम्हाला भागवतांनी जेवढे पैसे सांगितले तेवडेच पैसे आम्ही त्यांना दिले. त्यांनी जर आम्हाला ५०० रुपये सांगितले असते तर तेवढे दिले असते. या सर्व चर्चेत राव थोडासा जास्त वैतागला आणि मला बोलला देत्यांना वरचे ४०० रुपये. राव वैतागलेला पाहून मग मात्र ते आम्हाला बोलले राहू दे आता ठीक आहे. भागवतांना माहिती नव्हते दरात बदल झाला आहे. आता आम्ही थोड्याश्या वैतागलेल्या मूड मध्येच होतो. पण आम्ही कालच धर्मशाळेत नाश्त्या साठी सांगितले होते. म्हणून हलकासा नाश्ता केला आणि त्यांचे कालचे जेवणाचे व आता नाश्त्याचे पैशे दिले. सर्व सामान बाईक वर लावून निघालो पुढच्या दिशेने.



आमचा पुढच्या टप्पा होता येशवंतगड. कशेळी ते
येशवंतगड हे अंतर सुमारे २० एक किलोमीटर आहे. तासा भरात आम्ही येशवंतगड गाठला. येशवंतगड गावाकडे जातानाच मध्ये आम्हाला डाव्या बाजूला गडाची तटबंदी दिसली. हाच येशवंतगड असावा असे वाटले म्हणून थांबलो. रस्त्या वरुन माळरानात बाईक घातल्या आणि गडाच्या बाजूला झाडाखाली बाईकस लावल्या. गडाच्या एका बुरुजावर येशवंतगड अशी पाटी दिसली आणि खात्री झाली कि हाच आहे येशवंतगड . आता गडाचा दरवाजा कुठल्या बाजूने आहे त्याचा सोधा सुरु झाला. एक-दोन गावचे लोक गडाच्या बाहेर येताना दिसले आणि गडाचा दरवाजा कळला. आम्ही गडाच्या आत शिरलो आणि लगेच एक मंदिर लागले. मंदिराच्या जवळ सर्वच आराम करत बसलो. थोडी मस्ती झाली आणि मग फोटो काढत गड फिरायला लागलो. बुरुजाच्या बाजूने जाणारी वाट पकडली. तसे गडावर पाहायला काहीच नाही आहे. आम्ही नुसते फिरत होतो. गड फिरत असताना मध्येच मला लक्षात आले की मी माझ्या बाईकची चावी बाईक वरच ठेवली आहे. जरासा मी टेन्शन मध्ये आलो होतो पण मग सर्व मला भरपूर शिव्या घालू लागले. त्यात मात्र माझे टेन्शन निघून गेले. या चावी मुळे आम्हाला गड पटा-पट पाहायला लागला. गड तसा बर्या पैकी लांब लचक होता. पण फार दाट झाडी वाढल्या होत्या आणि तसे काही पाहण्या सारखे विशेष नव्हते. बराचश्या पडक्या भिंतीचे अवशेष होते. लगेच काही इकड तिकडचे फोटो काढले आणि आम्ही गडाच्या बाहेर आलो. पळत बाईक जवळ गेलो आणि पाहतो तर चावी तशीच होती. आता पुन्हा सर्वांनी मला एकदा शिव्या घालून घेतले.




पाणी वगैरे पिऊन घेतले आणि सुटलो पुढच्या गडाकडे. आमच्या पुढच्या गड होता आंबोळगड. येशवंतगड वरुन आंबोळगड जवळच आहे, सुमारे १० किलोमीटरच. सकाळचा नाश्ता करून सुद्धा आता सर्वांना परत भुका लागल्या. पहिला गड फिरूया आणि मग नाश्ता करूया असे ठरले. आंबोळगडा च्या जवळ आलो तसे समुद्राचे दर्शन झाले. आता उन पण डोकवायला लागले होते. सकाळच्या वेळी आंबोळ गावात शिरलो तर गावातल्या लोकांची वरदळ चालू होती. आम्ही तिकडच्या काही लोकांना आंबोळगडचा रस्ता विचारला. त्यांनी समोरच असलेल्या देवळाच्या बाजूला एक ५-६ गुंत्यांची व १०-१२ फूट उंचीचा मोडकळलेला चौथरा दाखवला. वास्तविक सध्या आंबोळगड असे काही राहीले नाही आहे. फक्त एक ५-६ गुणत्यांचा व १० -१२ फूट उंचीचा मोडकळलेला चौथराचा राहिला आहे आणि मध्या भागी प्रचंड मोठे वडाच्या झाडाचे जंगल झाले होते. आम्ही बाईक देवळाच्या बाजूला लावल्या. एके काळी आंबोळगड म्हणून ओळखला जाणारा आणि आता जमीन दोस्त होऊन फक्त चौथरा रलेल्या गडाला एक प्रदक्षिणा मारली व परत बाईक जवळ आलो. आज त्या देवळात कसले तरी कार्यक्रम होते. आंबोळगड मध्ये आल्या पासून देवळातल्या कर्णाच्या आवाजाने आमचे डोके दुखायला लागले होते. जोकाय गड पाहायला मिळाला त्याने आधीच फार निराशा झाली होती.



आंबोळगड वरुन निघालो पुढे. रस्त्यात छोटेसे गावठी हॉटेल यशोदा दिसले. आम्ही लगेच बाईक थांबवल्या आणि घुस्लो आत. मस्त सर्वांनी मिसळ-पाव, वडा मिसळ मागवले. खरे तर तिकडे दुसरे काही नव्हतेच, हेच मिळत होते. बराच वेळ आम्ही तिकडे टाइम पास करत बसलो. या ब्लॉगसाठी म्हणून नाश्ता करताना फोटो पण काढत होतो. बराच वेळ गप्पा झाल्या आणि पुन्हा बाईक वर स्वार होऊन आता लागलो जैतापुरच्या मार्गाला. जैतापुरच्या पुलावर आलो आणि मस्त निसर्गाचे दर्शन झाले. त्यामुळे आज फोटोग्राफी साठी मस्त दिवस होता आणि आम्ही पण उत्साहाने भरून वाहत होतो. जैतापुरच्या पूला वरून सुटलो ते अधून-मधून आम्ही बरेचदा बाईक थांबवून फोटो काढत होतो. जयतापुर वरुन विजयदुर्गा कडे जाणारा रस्ता तर फारच मस्त होता. आजू-बाजूचे लाल मातीचे व चीऱ्याचे माळरान होते. पुढे तर बराचसा सरळ रस्ता होता. मला तर आम्ही कोकणात बाईक चालवत आहे असे वाटतच नव्हते. कुठे तरी अमेरिकेत किव्हा ऑस्टेलियात सरळ लांब लचक रस्त्याने चाललो आहोत असे वाटत होते. जस-जसे आम्ही विजयदुर्गा च्या दिशेने जवळ चाललो होतो, तसे आता लाल मातीचा रस्त कमी झाला होत. आता एका बाजूला समुद्राचे पाणी लागले होते. आम्ही छोटेसे उतरण उतरून पठारा वरुन समुद्र सपाटीला आलो होतो फोटो काढावेसे वाटले म्हणून थांबलो. आज वातावरण मस्तच वाटत होते आणि आम्हला पण त्यामुळे जरा उत्साह येत होता. गरम तर होत होतेच, पण आकाशात पावसाळ्या पूर्वीचे तुरळत ढग आले होते.










विजयदुर्ग खाडीचा पुल पार केला आणि मस्त २ एक तासांच्या व जवळ-जवळ ५० एक किलोमीटरची बाईक चालवून आम्ही विजयदूर्ग जवळ पोहोचलो. पण हा विजयदुर्गचा रस्ता फारच मस्त होता. या रस्त्यावर बाईक चालवायला फार मज्जा आली. विजयदुर्ग बंदरावर पोहोचलो आणि विजयदूर्ग किल्ल्याचे संपूर्ण दर्शन घडले. आज फोटोग्राफी करायचा माझा फारच मूड होत होता, म्हणून मी सारखे थांबून फोटो काढत होतो. विजयदुर्ग बंदरा वरच आम्ही बाईक थांबवून फोटो काढायला लागलो. विजयदूर्ग किल्ल्याच्या बाहेरच दुपारच्या उन्हाच्या माऱ्या मुळे एका हॉटेल जवळ बाईक लावल्या आणि शिरलो आत हॉटेल मध्ये.





सर्व प्रथम मँगोला मागवला आणि आप-आपला गळा ओला करून घेतला होता. या हॉटेल वल्यांना आमच्या बाईक व त्यावरच्या सामना कडे लक्ष ठेवा असे सांगून निघालो विजयदुर्ग पाहायला. विजयदुर्ग किल्ला फारच मोठा आहे. आमच्या आता पर्येंतच्या सागरी किल्ले भटकंती मधला जंजिरा पेक्षाही बराच मोठा आहे. संपूर्ण किल्ला आणि त्याची तटबंदी सर्वच चांगल्या अवस्थेत अजूनही साबुद आहे. मी व राव किल्ल्याच्या बाहेरूनच फोटो काढत सुटलो. किल्ला पाहता-पाहता मी, अक्षता व राजू आणि राव व उन्मेश असे विभागले गेलो. विजयदुर्ग या किल्ल्याला बरेचशे पर्येटक भेट देतात पण अश्या ठिकाणी सार्वजनिक शौच्यालय पण नाही आहे. पुरूष मंडळी काय कुठेही मुत्र विसर्जन करू शकतात, पण स्त्रियांचे काय? असो! जर एवढी समज अपल्या समाजातल्या त्या वर्गाला असती तर आज आपला देश प्रगत देशान मध्ये गणला असता. अश्या आमच्या चर्चा झाल्या आणि अक्षतासाठी मुत्र विसर्जन करण्यासाठी जागा शोधायला लागलो. तट बंदीचा एक आडोसा पाहून दुशीकडे मी व राजू पाहारा देत अक्षताने आपल काम उरकून घेतले.














सर्व किल्ला पाहून आम्ही एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसलेल्या राव व उम्नेश पाशी आलो. आता आम्ही पण थकलो होतो त्या उन्हात गड फिरून. रावने आम्हाला मस्त गार पाणी (त्याच्या नवीन बाटलीतले) दिले व थोडासा उरलेला मँगोला पण दिला. जरा वेळ आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या सावलीत आराम करून घेतला. तिकडे मस्त हवा पण येत होती. जरा बरे वाटले आणि निघालो विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेर.









बाईक लावलेल्या हॉटेल जवळ आलो आणि हॉटेलच्या बाहेरूनच पाण्याच्या थंड बाटल्या वा मँगोला मागवला . थोडा-थोडा मँगोला प्यालो आणि निघलो पुढे देवगडच्या दिशेने. ३. ३० वाजले म्हणून मध्ये कुठेही न थांबता आम्ही एका तासात ३० किलोमीटर अंतर पार करून देवगड शहर गाठले. तिकडे कळाले की देवगड किल्ला शहरा पासून ३-४ किलोमीटर बाहेर समुद्राच्या जवळ आहे. पण आता सर्वांना फार भूक लागली होती विशेष करून राजुला. मग सर्व मत करून आम्ही हॉटेल शोधायला लागलो. बरीच शी जेवणाची हॉटेल आता बंद झाली होती. मग परत शोधत-शोधत देवगड सहराच्या एक किलोमीटर मागे आलो. एक हॉटेल उघडे दिसले पण तिकडे हि जेवण नव्हते मिळणार, फक्त नाश्ताच मिळणार होता. मग काय भुका तर फारच लागल्या होत्या. पटा-पट नाश्ता ऑर्डर केला. या हॉटेल मधे पाव-भाजी, इडली सांबार अश्यच गोष्टी मिळत होत्या. किमान मिसळ वगैर तरी मिळाले असते तर बरे वाटले असते. मग काय करणार आम्ही पण पाव-भाजी, इडली सांबार असाच नाश्ता मागवला. आज जरा आमची तंगड तोड जास्त झाली होतो आणि उन्हाच्या मार्या मुळे सर्व फारच थकले होते. नाश्ता येई पर्येंत सर्वांनी तोंडावर पाणी मारुन फ्रेश होऊन घेतले. आता मात्र सर्व सुस्तावले पण होते, नाश्ता येई पर्येंत आम्ही रेंगाळत आराम करून घेतला. नाश्ता यायला पण फारच वेळ लागला होता.

नाश्ता उरकून मस्त गरम गरम चहा मारला आणि तरतरी आणून सर्व देवगड किल्ल्याच्या दिशेने निघालो. देवगड किल्ला छोट्याश्या टेकडाच्या पठाराला तटबंदी करून बनवलेला किल्ला आहे. देवगड किल्ल्याच्या पठारा वर बाईक जाते आणि किल्ल्याच्या आत पर्येंत. आम्ही किल्ल्याच्या आत शिरलो तिथे लागूनच असलेल्या तटबंदीच्या समोर ओळीने बाईक लावल्या. सामान तसेच बाईक वर ठेवले आणि किल्ल्याच्या आत असलेल्या एकमेव मंदिरात गेलो. देवाचे दर्शन घेतले आणि सर्व बाजूने किल्ला फिरायला लागलो. समुद्राच्या बाजूच्या तटबंदी जवळ आम्ही गेलो. समुद्राच्या दिशेने काळे ढग दाटून येताना आम्हाला दिसु लागले होते. ढगाच्या आतून मावळणाऱ्या सूर्याचे किरण बाहेर डोकावत होते. पाहायला हा नजारा फारच मस्त वाटत होता. राव या नजाऱ्याचे फार फोटो काढत होता. मी एखाद-दुसरा फोटो कडून घेतला. मस्त शांत वातावरण झाले होते. उन ढगा आड गेले होते. पण आता पुढे जोरचा पाऊस कोसळणार याची मला शक्यता वाटतच होती. तसे मी रावला बोलून सुद्धा दाखवले.






आम्ही सर्व बाईक पर्येंत आलो आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. इतक्यात मजदूत जोरचा वारा सुटला आणि पावसाचे थोडे-थोडे शिंतोडे पडायला लागले. आता तर एक मोठी सर नक्कीच येऊन जाणार याची आम्हाला खात्री पटली कारण सर्वत्र वारा आणि ढगाने अंधार केला होता. माझ्या कडे एक टारपोलिन होते ते मी काढले. मी व रावने आमच्या बाईक वर लावलेले सर्व सामान जेम-तेम टारपोलिनने झाकून घेतले. हे काम होते न होते एवद्यात जोरची सर आली आणि आम्ही आमच्या सगळ्या कॅमेरच्या आणि बाकी सर्व छोट्या बॅगा घेऊन मंदिराकाडे पळालो. एक छोटीसीच सर आली आणि वारा पण जोरात सुटला होता. हे टारपोलिन फार वेळ बाईक वरचे सामान पाउसा पासून वाचवू शकणार नव्हते हे आम्हाला जाणवले. मी, राव, राजू व उन्मेश थोडासा पाऊस सरला म्हणून बाईक कडे पळत गेलो. बारीक पावसात बाईक वर लावलेले सर्व सामान काढले आणि घेऊन मंदिराच्या अंगणात ठेवले. आता परत मजबूत जोरचा पाऊस कोसळायला लागला. बराच जोरात पाऊस पडत होता. मंदिराचे अंगण फारच छोटे होते आणि त्यात आमचे सामान व बाकी सर्व माणसे पण उभी होती. बराच वारा सुटला होता म्हणून बर्या पैकी पावसाचे पाणी अंगणात येत होते. मी आमचे सर्व सामान टारपोलिन ने झाकून घेतले.

अर्ध तास भर मजबूत पाऊस पडला आणि मग पूर्ण पणे थांबला. या सर्व करामतीती आम्ही थोडेसे भिजालो पण होतो. आता एक-एक करून बाकीची सर्व माणसे पाऊस थांबला म्हणून मंदिरातून बाहेर पडायला लागली. जरा अंगणात जागा झाली म्हणून आम्ही सर्व आमच्या सामानाची जमवा जमवी करू लागलो आणि सामान व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. आमचे वर-वरचे थोडेसे सामान भीजले होते पण आतले सर्व सामान प्लास्टिक पिशव्यात होते म्हणून व्यवस्थित होते. अजूनही पावसाचे लक्षण दिसत होते आणि आम्हाला अजून ५० एक किलोमीटर जायचे होते. आता काही वेळात अंधार पण होणार होता. आम्ही सर्व आमचे सामान पटा- पट बाईक वर परत लावले आणि आमच्या कडे असलेल्या टारपोलिन ने सामान बांधून घेतले . पाऊस थोडा रिमझिमत होताच व अंधार पण पडायला लागला होता. आज कुठल्या ही परिस्तितित आम्हाला मालवण गाठायचे होते. मालवण मधे आमचा मित्र प्रशांत आचरेकारचे घर आहे आणि तो व त्याचा मोठा भाऊ हेमंत आज मालवण मध्ये दाखल झालेले होते. रावने प्रशांतला कळवले की आम्ही देवगडला आहोत आणि पावसाने आम्हाला जकडले आहे. म्हणून मालवणात पोहोचायला जरा वेळ होईल, किंभव्ना रात्र होईल. प्रशांतशी सविस्तर फोना-फोनी केली आणि निघालो मालवणच्या दिशेने.

आता संपूर्ण अंधार पडला होता. देवगड शहरातून आलो त्याच रस्त्याला लागलो आणि मग उजवी कडे वळलो मालवणच्या दिशेने. आम्ही जरा आरामात चाललो होतो, याची बरीच कारण होती. पाऊस पडून गेल्या मुळे रस्ता ओला होता, अंधार पडला होता, बारीक पाऊसा मुळे हेल्मेटच्या काचेवरचे पाणी अंधारात त्रास देत होते. या सर्व कारणानं मुळे कमी दिसत होते. आम्ही हळू-हळू ३० किलोमीटरचा प्रवास केला होता न होता तेवढ्यात परत एकदा मजबूत जोराचा पाऊस आला. सुदैवाने आम्हाला समोरच एस.टी ची शेड दिसली. बरीचशी दुसरी माणसे पण इकडेच थांबली होती. आम्ही आमच्या बाईक वरचे सामान बर्यापैकी प्लास्टिक मधे झाकून घेतले होते. मागास सारखे बाईक वरचे सर्व सामान एस. टी शेड मधे घेऊन घुसलो. आता मात्र बराच जोरात पाऊस कोसळत होता. जवळ-जवळ पाऊण एक तास शेड मधे बसलो होतो, पाऊस एकदाचा कधी जातोय याची वाट पाहात होतो. या कालावधीत राव व प्रशांत मध्ये बरेचदा फोना-फोनी झाली. जास्त उशीर झाला तर आम्हाला मालवण मधे जेवायला मिळणार नव्हते असे त्याचे सांगणे होते. त्याने आम्हाला १० पर्येंत कसेही करून या असे सांगितले. आम्ही त्याला बोललो बघतो कसे काय जमतेते आणि पाऊसा वर अवलंबून होते आणि पाऊस जायची वाट पाहत बसलो होतो.

पाऊस थांबल्या बरोबर आम्ही पटा-पट बाईकवर सामान लावले आणि सुटलो . शेवटचे २० किलोमीटरचे अंतर आम्ही कसे बसे बारीक पावसातून हळू-हळू एका तासात पार केला. जेम-तेम आम्ही १० वाजायच्या १० मिनिटे असताना प्रशांतच्या घरी पोहोचलो. प्रशांतने आम्ही ५ जण येणार याची हॉटेल वाल्यांना आधीच अंदाज दिला होता. हॉटेल अथिति बांबू हे प्रशंतच्या घरा समोरच होते. बाईक घराकडेच लावल्या आणि तसेच हॉटेल मधे शिरलो. सर्वांनी आप-आपपल्या ऑर्डर प्रशांतला सांगितल्या मी मात्र मालवणात आलो म्हणून माश्या शिवाय काय सांगणार. किती थकलो तरी मला माश्याच्या जेवणाची फार भूख् लागली होती. प्रशांतने आमच्या साठी पापले थाळी सांगितली. आम्ही फ्रेश होऊन घेतले आणि लगेच जेवणाला आलो. मस्त गरम गरम जेवण सर्वांनी सुरवात केली आणि गप्पा मारत आरामात जेवणाचा आस्वाद घेत होतो.

जेवण उरकून सर्व परत प्रशांतच्या घरी आलो. आता मात्र सर्वांना सुस्ती आली होती आणि येणारच सर्वच फार थकलो होतो. आमचे बाईकवरचे सामान पण काढायला आणि प्रशंतच्या घरी पहिल्या मजल्यावर न्याहला सुद्धा कंटाळा आला होता. मी व रावने कसे बसे सर्व सामान काढले आणि प्रशांत व हेमंत सहित सर्वांनी सामान वर न्याहायला मदत केली. सामान ठेवले, फेश झालो आणि कपडे बदलून बराच वेळ रिलॅक्स गप्पा मारत बसलो. प्रशांत आणि हेमंतला आमच्या आता पर्येंत ट्रीपच्या गोष्टी सांगायला लागलो. प्रशंतचे मालवणचे घर बरेच मोठे आहे. प्रशांतने मला व अक्षताला एक स्वतंत्र खोली दिली. अक्षता आज मात्र फारच थकली होती. म्हणून तिला निवांत झोपवले आणि मी, राव, राजू, प्रशांत, हेमंत व उन्मेश बराच वेळ गप्पा-टप्पा मारत दिवस भराच्या प्रवासाचा त्राण घालवू लागलो. जवळ पास १२ पर्येंत गप्पा चालल्या आणि मग सर्व झोपी गेलो.