30.10.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- चौथा दिवस (दापोली ते गणपतीपुळे)

२१ मे २००६, आज अभिजित रावचा वाढदिवस. सकाळी उठलो प्रातविधी उरकून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. ऑलेक्सच्या परिवाराचा कालचा आश्चर्याचा अनुभव घेतल्यामुळे ते नाष्ट्याचा घाट घालतील याचा आधीच अंदाज मांडून आम्ही त्यांना नाष्टा करू नका असे सांगितले होते. त्यांच्या आम्हाला नाष्ट्याबद्दल फारच आग्रह चालू होता. आलेक्सच्या परिवाराचा या प्रेमाचा आम्ही चहा-बिस्किटा वर त्यांचे मन राखले आणि त्याच्या अंगणात सर्व परिवाराबरोबर एक फोटो काढला आणि त्यांचा निरोप घेतला. Alex and family, 5km outside of Dapoli वास्तविक ह्या परिवाराशी आमचा काय संबंध होता, काय नाते होते, कोण ऑलेक्स, कोण आम्ही, कोण कुठचे आणि कुठून आलेले. तरी हि माणुसकी, या धर्माचा वारसा जोपासणारी काही माणसे अजूनही आहेत याची जाणीव करून देणारा असा हा परिवार होता. ऑलेक्सच्या घरातून निघालो आणि दापोली-दाभोळ फाट्यावर नाष्ट्याला थांबलो. वास्तविक सर्वांना फार भूक लागली होती पण ऑलेक्सच्या परिवाराला त्रास नको म्हणून आम्ही संकोच बाळगत होतो. मस्त गरम-गरम मिसळ हाणत गप्पा टाकत होता. आज सर्वच मस्त मूड मध्ये होते. अभिजीतचा वाढदिवस होता ना, मूड मस्त असणार. अभिजीतला थोडावेळ फोना-फोनी करायची होती तो पर्येंत मी माझ्या बाईकचा तुटलेला आरसा नवीन बसवून आलो.

दापोली शहरातच दाभोळ, अंजनवेल, हेदवी, जयगड मार्गे गणपतीपुळे रस्त्याची विचारपूस करून घेतली कारण हा रस्ता मला फारसा लक्षात नव्हता. गेल्या २ दिवसान पेक्षा आज रावचा पाय बरा वाटत होता आणि वाढदिवसामुळे तो उत्साहात पण होता. आज त्याने बाईक चालवायचे पण ठरवले. थोडीशी त्याच्या पायाबद्दल विचारपूस करून सुजयने बाईकची चावी त्याच्याकडे दिली. आज राव आणि राजू एण्टाइसर वर आणि सुजय व मी विक्टर वर. पण रावला चढ-उतरायला आणि उठ बस करायला लागणारा वेळ मात्र तेवढाच होता. राव फक्त बाईक चालवण्या इतपतच बरा झाला होता. मुळात त्याचे दुखणे तेवढेच होते पण बाईक चालवायची दांगट इच्छाशक्ती मुळे त्याला त्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करायला सहज जमत होते.

आरामात मिसळ, पोहे, चहा, गप्पा, चहा असा नाष्टा उरकून १०.३०च्या दरम्यान आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दापोली ते दाभोळ अंतर सुमारे ३० किलो-मीटरचे आहे. आमच्या सारख्या टवाळखोर भटक्यांना एवढे अंतर पार करायला एक-दीड तास लागायचा. आम्ही आरामात रेंगाळत टंगळ-मंगळ करत चालायचो. मधेच काही फोटो काढण्यासारखे वाटले तर बराच वेळ थांबून फोटो काढायचो. मग मधेच ह्याची खेच त्याची खेच असे हि व्हायचे आणि त्यावरून मस्ती. अशा प्रकारे आमचा प्रवास चालायचा.


दाभोळ जेट्टी गाठली आणि कळाले कि ट्रॉलर बिघडला आहे. पण नावे ने पैलतीरी घेऊन जात होते. आम्हाला प्रश्न पडला नावेत बाईक घेतील का? विचारपूस केल्या वर कळले कि बाईक पण नावेतून नेत आहे पैलतीरी. जीवात जीव आला हे ऐकून, नाही तर मजबूत फिरून जावे लागले असते. नाव येई पर्येंत आम्ही तिकडेच रन-रन त्या ऊनात बसलो होतो सावली पण नव्हती. बाईक वर काय सावली असते काय असे म्हणत एकमेकांना शिव्या घालत होतो, पण बाईक वरती ऊनाचा त्रास जरा कमी होतो कारण वारा लागत असतो म्हणा किंवा बाईक चालवायला आवडते म्हणून या त्रास कडे लक्ष जात नसावे म्हणूया ना. पण नुसते ऊनात बसायचे म्हंटले कि कंटाळा यायचा.One bike in... एवढ्यात नाव जेट्टीला लागली, नाव पाहून आम्हाला वाटले बाईक जातील काय या छोट्याश्या नावेत. कारण अजून पर्येंतच्या आमच्या प्रवासातली हि सर्वात छोटी नाव होती. पण लोकल लोकांना मानले पाहिजे. सर्वात पहेली माणसे बसवली दाबून आणि मग बाईक चढवल्या. नाव फारच लहान होती. नावेचा मध्य भाग, जो मोठा भाग असतो तो जेम-तेम बाईकचे पुढे चाक ते मागचे चाक राहील येवढाच होता. पाण्याला पण भरती होती. नाव फारच हलत होती आणि नावाडी पण फार नव्हते. एका नावढ्याच्या मदतीने मी आणि सुजयने आमच्या बाईक चढवल्या आणि मग रावला पण चढवले.Both the bikes in the boat!रावला एका बाजूला बसवून आम्ही बाईक पकडून उभे राहिलो. आमच्या मनात फारच धाक-धुक लागून राहिली होती. जर बाईक खाडीत पडली तर आणि वगैरे-वगैरे. या धाक-धुकी मुळे आमचे लक्ष बाजूला असलेल्या निसर्गाकडे जाताच नव्हते. वास्तविक दाभोळची खाडी फारच निसर्गरम्य आहे. निळे, हिरवे पाणी आणि तीरावर नारळाच्या बागा. काय छान नैसर्गिक प्रदेश होता तो आणि आम्ही नाकोत्या चिंतेत होतो. चिंतेतून डोके बाहेर निसर्गत काढले आणि निसर्गाचा आनंद लुटायला लागलो. पैलतीरावर अंजनवेलला पोहोचलो, बाईक काढल्या आणि रस्त्याला लागलो. अंजनवेल गावालाच लागून टेकडी वर गोपाळगड आहे. रान-रनत्या ऊनामुळे आणि रावला पण चढायला जमणार नाही या कारणास्तव गोपाळगडावर जायचे कि नाही या वर चर्चा सुरु झाली माझ्यात आणि राव मध्ये. नाही म्हंटले  तरी अर्ध्या-पाउण तासाचे तरी चढण होते. मी पेपर मध्ये वाचले होते आणि गिरीमित्र संमेलनाच्या वेळेला पण ऐकले होते कि गोपाळगड हा आता खाजगी मालमत्ता म्हणून एक मुसलमान परिवाराकडे आहे, त्यांची खानदानी मालमत्ता म्हणून. जर गड पाहायचा असेल तर या परिवाराची परवानगी घ्यावी लागते. शेवटी या सर्व कारणास्तव बहुमत गड नाही पाहायचा या दिशेला पडले. वास्तविक माझीच सर्वात जास्त गड पाहण्याची इच्छा होती. माझ्या एक काकांचे अंजनवेल हे गाव आहे आणि त्यांचे घर पण आहे या गावात हे मला माहित होते. गड केव्हा तरी पुन्हा पाहू असे म्हणत आम्ही पुढे गुहागरच्या दिशेने निघालो. अंजनवेलच्या पठारावर एनरॉलचा प्रकल्प वसलेला आहे. काय मस्त रस्ता होता एनरॉल पासून गुहागर पर्येंत कोकणातल्या राष्ट्रीय महामार्गासारखा वाटत होता.

गुहागर पार करून वेळणेश्वर मार्गे आम्ही हेदवी गाठले. हेदवी गावात शिरताच काही घरांच्या बाहेर "येथे घरगुती शाकाहारी जेवण मिळेल" अश्या पाट्या दिसल्या. ३ वाजले होते भूख फार रान-रणायला लागली होती. पहिले मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि मग निवंत जेवण असे ठरले. मंदिर बंद होत होते असे कळले, पटा-पट हेदवीच्या दश-भूजा गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या आवारात फोटो काढले आणि निघालो जेवायला. हेदवी गणेश मंदिराच्या जवळ बहुतांश ब्राम्हण घरांची वस्ती आहे. जेवणाची पाटी लावणारी घर बरीचशी यातलीच होती. घुसलो आम्ही या पैकी एका घरात. पाने मांडे पर्येंत आम्ही हात पाय धुऊन आराम करत बसलो त्यांच्या पडवीत. त्यांनी पडवीतच बस्कुरे अंथरून पाने मांडली. मस्त घरगुती भाटूरड्यांचे जेवण चालले होते. बटाट्याची भाजी, गरम-गरम पोळ्या, सोलकढी.....मधेच त्यांनी आम्हाला विचारले "हापूस आंब्याचा रस वाटी पाहिजे का? १० रुपये वाटी". आम्ही कसले नाही सांगतोय मस्त मी, राव आणि राजूने तर मस्त दोन-दोन वाट्या हंडल्या. सुजय मात्र एकाच वाटीवर समाधान पावला. अहाहा! पोट भरून जेवलो आणि पानावरून उठलो. थोडा वेळ आराम केला आणि त्यांनाच विचारून घेतले जयगड कडे जायचा रस्ता. त्यांनी जवळच तवसाळेला नवीन जेट्टी झाल्याचे सांगितले आणि ट्रॉलर चे टायमिंग पण सांगितले. पटा-पट आवरले आणि निघालो तवसाळेच्या दिशेने.

५ चा ट्रॉलर होता म्हणून जरा बाईक जोरात हाकत होतो. सुजय माझी विक्टर चालवत होता आणि मी मागे. सुजयला जरा बाईक पळवायची परवानगी दिली तर तो रेमटवायला लागला. रस्ता खराब होता सुजय जराही इकडे-तिकडे पाहत नव्हता नुसती बाईक रेमटवत होता. एकदा-दोनदा तर त्याने खड्यात आपटले पण. तवसाळे जेट्टी ला जाणारा रस्ता मातीचा होता आणि मी सुजयला सांगत होतो जरा सांभाळून चालव वगैरे-वगैरे पण सुजय काय ऐकणार का. सुजयने बाईक अशी रेमटवली कि आम्ही बराच वेळ आधी येऊन पोहोचलो. ट्रॉलर येई पर्येंत आम्ही फोटो काढले आणि टाईम पास करत होतो. ट्रॉलर आल्यावर एक जीप आणि कार होती तिला पहिले जाऊ दिले आणि मग आम्ही चढलो. ट्रॉलरने पैलतीरी सोडल्यावर आता मी सुजय कडून बाईक घेतली चालवायला. जयगड बंदरच्या फाट्यावर थांबलो ब्रेंक साठी. आज अंधार पडायच्या आत आम्ही जयगड पाहून होईल असे काय वाटत नव्हते म्हणून सकाळी पहायचे असे आमच्या डोक्यात चालले होते. पण येवढ्यात सुजय बोलला जयगड बंदर आहे ना सुक्य माश्याचा तिकडे पण वास असणार. सुजयला जो हरणे मध्ये त्रास झाला त्यामुळे आम्ही जयगड किल्ला पहायचे पण रद्द करावे लागले आणि चौफे मार्गे गणपतीपुळेच्या दिशेने निघालो.

Tavsale jetty

अंधार पडायच्या आत आम्हाला गणपतीपुळे गाठायचे होते. आता मी पण जरा बाईक रेमटवत होतो आणि आता सुजय मला सांगत होता बघ तू बाईक खड्यात टाकलीस आणि आता बघ कशी चालावलीस आणि आता बघ तू कशी पळवतो आहेस वगैरे-वगैरे. सुरवातीला मी त्याचे ऐकून घेत होतो कारण तवसाळेच्या वेळेला मी त्याला बोललो होतो ना म्हणून. किबहुना त्यामुळे आता तो मला मुदामून बोलून दाखवत होता. बराच वेळ सारखी त्याची बड-बड चालूच होती आणि थोड्या वेळाने माझे जे डोके फिरले. मी बाईक अचानक रस्त्याच्या  बाजूला थांबवली. पटा-पट राव ने बाईक माझ्या बाजूला थांबवताच, मी सुजयला बोललो उतर आणि राजूला सांगितले तू इधर आजा. सुजयने डोक्याची भाजी करून टाकली. थोडा वेळ ठीक होते सारखीच तीच-तीच बड-बड. थोडीशी बाचा-बाची झाली आणि राजू माझ्या बरोबर बसला आणि सुजय रावच्या पाठी. या वेळेला मात्र सुजयला हा घाव जरा जास्त लागला असावा असे वाटले, कारण चौफे फाट्यावर पोहचलो आणि ब्रेंक साठी थांबलो असताना सुजयने अनपेक्षित असे वागणे दाखवले. सुजयने मुंबईला आमचा नाक्यावरचा मित्र पावतीला फोन लावून गणपतीपुळ्या वरून मुंबई साठी रात्रीच्या बसचे तिकीट काढायला सांगितले आणि आम्हाला बोलला मी चललो मुंबईला. ह्या सुजयच्या वागण्यामुळे आता रावचे टाळके सरकले. हे काय वागणे झाले काय आणि वगैरे-वगैरे. यावेळेला सुजय पण पेटला होता. मग मी आणि राजू पण कधी नव्हे तर बोलला सुजयला. वास्तविक सुजय आणि राजू या ट्रीपवर फक्त रत्नागिरी पर्येंतच येणार होते. उद्या तसे हि आपण रत्नागिरीला जाणार आहोतच आणि तिकडे तुमच्या ट्रीपचा शेवट होणारच आहे, मग आत कशाला नाटक करतो आहे असे सुजयला आप-आपल्या परीने सर्वांनी समजावण्याचा प्रयेत्न केला. पण सुजय आज काहीही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता. आता राव आणि मी पण पेटलो. रावने तर कानपडत मारेन अशीच सुरवात केली तर आणि माझ्या कडे सुजयच्या बाबाचा नंबर होता, मी सुजयला बोललो तुझ्या बाबांशी बोलतो आणि त्यांनी परवानगी दिली तर मग तू खुशाल जा, तुला कुठून जायचे असेल तिकडन. आता मात्र सुजायचा सूर जरा नरम झाला आणि ठरल्या प्रमाणे रत्नागिरी वरून जायचे ठरले.

Ganpati Pule Mandir
या राड्यात राजू मात्र आता आमच्या बरोबर पुढे ट्रीपला येणार असे ठरले. राजूला बाईक ट्रीप आवडली होती. मग सुजयला अजून थोडे शांत केला आणि निघालो गणपतीपुळ्याला. या सर्व राड्यात अंधार पडला. या ट्रीप वरचा आमचा पहिला नाइट ड्राइव होता. आरामात सांभाळत आम्ही गणपतीपुळे गाठले. सर्वात पहिले राहाण्याची काय सोय होते का पाहायला लागलो. मंदिराची धर्मशाळा वगैरे काही आहे का पाहायला लागलो. असे काही नसल्याचे कळाले आणि भक्त निवास पण फुल आहे. मग आम्ही मंदिराच्या अंगणात झोपलो तर चालेल का असे विचारले. त्यांची नाहरकत घेऊन आम्ही जेवायला निघालो. बांबु हट मधे शिरलो. आम्ही एका टेबल वर जाऊन बसलो. आमच्या बाजूच्या टेबल वर अगोदर पासून एक फॅमिली बसली होती. त्यानी आमच्या कडे पहिले आणि टेबल बदलून लांब बसले. ४ दिवस बाइक वर ते ही आंघोळ न करता आणि मे महिन्याचे दिवस. आमच्या वासने बहुदा पळून गेले असतील असे आमच्या मधे हस्या पिकायला लागल्या. राजू, सुजय आणि रावच्या इंग्लीश गप्पा ऐकून त्याना प्रश्न पडला असावा. हे बर्‍या पैकी चांगले इंग्लीश बोलणारी माणसे पण राहणीमान का येवढे घाणेरडे. असो आम्हाला काय फरक पडतो. जेवण उरकून मंदिराकडे आलो. मंदिर बंद झाले होते आम्ही परत एकदा शिपायांची परवानगी घेतली आणि आमचे सामान मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळाना लागून लावले आणि राजू गिटार घेऊन बीच वर गेला. पाठोपाठ आम्ही पण गेलो. मस्त बीच वर वाळूत बसून हेड लाईटच्या प्रकाशात तासभर राजू गिटार वाजवत होता आणि आम्ही गाणी म्हणत होतो. तासाभराच्या मैफिली नंतर श्रम परिहार झाला आणि परत मंदिराकडे आलो. दीपस्तंभाला लागूनच अंथरून पसरली आणि झोपलो.

21.10.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - तिसरा दिवस (हरिहरेश्वर ते दापोली)

२० मे २००५, सकाळी हॉटेल वाल्यांच्या तयारीच्या आवाजाने आम्ही उठलो. आमचा सर्व संसार आवरला आणि हॉटेलच्या बेसिन मध्ये तोंड धुतले. हॉटेल चालू होई पर्येंत आम्ही आमचे प्रातविधी उरकायला गेलो. आता मात्र रावची परीक्षा होती. कारण सार्वजनिक शौचालयात कमोड संडास नसतात ना. मी रावच्या वेदना समजू शकत होते पण काय करणार सर्व त्याच्या वेदना सावरू शकत पण नव्हतो. संडासा मधली बस ऊठ  आणि त्या बरोबरच्या वेदना त्यालाच सहन कराव्या लागणार होत्या. मी त्याला शौचालया पर्येंत घेऊन गेलो. प्रातविधी आवरले आणि आलो बाहेर. बऱ्याच वेळाने राव बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता कुठून तरी युद्धा वरून परत आल्या सारखा. पण मानले पाहिजे रावला एवढ्या अनुकूल परीस्थित पण जिद्द राखून होता.

प्रत्येकाने आप-आपले प्रातविधी आटपले आणि नाष्ट्याला हॉटेल मध्ये परत आलो . मस्त गरम-गरम नाष्टा केला आणि हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. हरिहरेश्वर पासून ५ किलो मीटर वर बागमांडला जेट्टी गाठली. जेट्टी वर होडी लागलीच होती. पटकन सुजयला पळत पाठवले बाईक चढवायच्या चौकशीला. कधी नव्हे तर आज सुजयने नखरे न करता ऐकले. वास्तविक सुजयला पण परिस्थितीचे गांभीर्य जाणतो, तसा सुजय आमचा शहाणा आहे पण बरेचदा मुद्दामून नाटक करतो. बाईक चढवून आम्ही होडीत बसलो आणि पैलतीरी बाणकोटच्या धक्क्याला उतरलो. बाईक बाहेर काढल्या आणि समोरच एस.टी.डी चे बूथ दिसले. प्रत्येकाने आप-आपल्या घरी ठरवले होते कि दिवसातून एकदा तरी फोन करायचा आणि काळाच्या करामती मधे आम्ही सर्वच विसरून गेलो. कोणी आप-आपल्या घरी फोन केले नव्हते म्हणून सर्वांच्याच घरी काळजीचे वातावरण होते आणि आमच्या सर्वांच्या पालकांनी एकमेकांना फोना-फोनी करून वातावरण अजून गंभीर करून ठेवले होते. मी जसा घरी फोन लावला तोच समोरून नुसती बडबड सुरु झाली. मग आईची समजूत घालून ठेवला फोन. माझ्या पाठोपाठ सुजय आणि रावची पण तीच अवस्था. मग पुन्हा घरी फोन करून बजावले कि काही कारणास्तव जर एक दिवस फोन आला नाही तर जग डोक्यावर घ्यायची गरज नाही. अजून पर्येंत आमच्या आक्सिडेंटचा किस्सा घरी सांगितला नव्हता. या सर्व राड्यात रावला नाहीलाजास्तव आमची करामत त्याच्या घरी सांगावी लागली. मी आणि सुजय तर हे घरी सांगूच शकत नव्हतो. नाहीतर आम्हाला तातडीचे घरी बोलावले असते नाहीतर अजून काहीतर मच-मच केली असती.

या सर्व राड्यात आम्ही रत्नागिरी जिल्हा गाठल्याचे विसरलो होते. आता आमची पुढचे ठिकाण होते बाणकोटचा किल्ला. गावात विचारले कि किल्ला कुठे आहे. बाणकोट किल्ला हा गावाच्या पाठी मागे डोंगरावर आहे असे कळाले. सुजय आज लीडरच्या रोल मध्ये आला होता. म्हणून तो पुढे आणि मागून मी. आम्ही किल्याकडे जाणारी घाटी चढायला लागलो. डांबरी रस्ता संपला आणि लाल मातीचा कोकणातला रस्ता चढत होते. बराच वेळ चढल्यावर देखील किल्याचा काही नामो-निशाण दिसेना, म्हणून मधेच एक घर दिसले तिकडे चौकशी करूया या विचाराने मी पुढे असलेल्या सुजयला मी जोरात ओरडून थांब सांगितले. तेवढ्यात राजू सुजयच्या बाईक वरून उतरला. सुजयने बाईक चालवत पुढे नेली. मला वाटले कि सुजय उतारावर बाईक उभी करायला जमणार नव्हते म्हणून त्याने बाईक पुढे नेली. पण पाहतो तर तो राजूला तिकडेच सोडून पुढे तसाच निघून गेला. मला जेव्हा हे जाणवले तेव्हा माझे असले टाळके सरकले आणि मी आई........, आई.........., .......... ........., ..........,..........., धो....., अशा असतील नसतील आणि त्या वेळी ज्या आठवल्या त्या शिव्या माझ्या कर्कश आवाजातून दिल्या, कि बाजूला ५० फुटावर असलेल्या घरातून वय वर्ष ५ ते ५० पर्यंतची असतील नसतील ती मंडळी बाहेर आली. त्यांना वाटले कि काय झाले बाहेर राडा वगैरे नाहीना. त्यांना काय माहित होते आम्हाच्या मध्ये असे नेहमीच चालते. सुजय तर पार पुढे निघून गेला होता, मी जे काही मंत्र उच्चार केला होते त्याच्या पलीकडे पोहोचला होता. एवढ्यात घोषणा देऊन घरातली माणसे जागी केली मग त्याचा परीपूर्ण वापर नको का करायला. मी त्यांना किल्ल्या कडे जाण्याचा मार्ग विचारायला गेलो. मे चा महिना आणि कोकणातील उन्हाळा. फार घामाघूम होत होते. सुजय येई पर्येंत त्याच्या अंगणात पडवीवर पाणी पीत बसलो चर्चा करीत बसलो. आम्ही कुठून आलो, कुठे जाणार आणि ते कुठले वगैरे-वगैरे. तेही मुंबईचे आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीत आले होते गावी असे कळाले. थोड्या वेळाने सुजय किल्ल्या पर्येंत जाऊन आला. दुसर्याच्या घरात होते म्हणून मी त्याची थोड्या सौम्य भाषेत कान उघडणी केली.

आम्हाचे ४ जणांचे सर्व वजनदार समान त्याच्या घरात ठेवले आणि गेलो किल्ला फिरायला. रस्ता असे पर्येंत आणि बाईक नेऊ शकतो तो पर्येंत बाईक नेल्या. बाईक लावून थोडेसे चालल्यावरच किल्ल्याचा दरवाजा आला. रावला किल्ला पाहायला जमेल का हे आधीच गावात विचारून घेतले होते. पण रावला चालायला फार त्रास होत होता. बरेचदा आधारासाठी आमच्या पैकी त्याच्या बरोबर कोणी तरी असायचे. किल्ला फार मोठा नव्हताच. वास्तविक हा तर टेहाळणी किल्ला होता. फक्त ४ बुरुज आणि तटबंदि.या किल्ल्यावरून हरिहरेश्वर किनार पट्टीचा परिसर फार सुरेख दिसत होता. मुळात या किल्याच मूळ उधिष्ट हेच असाव, त्या परिसरातील देखरेख करण्यासाठी. अभिजीतला तिकडे एक वीडीओ क्लिप काढावीशी वाटली आणि ती त्याने काढली पण. सांगितले ना भाडखाव जिद्दीचा आहे. पण खरोखर समुद्र किनारा सुंदर दिसत होता. किल्ला छोटा असल्या कारणास्तव फार वेळ लागलाच नाही पाहायला. एक फेरा मारला आणि आलो बाहेर. बाईक घेऊन गेलो त्या घरी समान घ्यायला. पुन्हा एकदा सूखलेला घसा ओला करून घेतला आणि त्याला मंडळींचा निरोप घेऊन सुटलो पुढच्या प्रवासाला.



बाणकोट किल्ल्याचे टेकाड उतरलो आणि रस्त्याला लागलो. बाजूला एक छोटेसे दुकान पाहून थांबलो. फारच गर्मी होती आणि असणारच मे महिन्याचे दिवस होते. वरून ते ही कोकणातले, म्हणजे घामाच्या धारा. थोडी विश्रांती घेऊ आणि थंड पेय पण पिऊ असे वाटले. सुजयला पहिल्या दिवसा पासून रावने सोडा युक्त पेयासाठी मनाई केली होती. पण सुजय कसला ऐकतोय, झाली राव आणि सुजायची सुरवात. मग वरती घडलेला किस्सा पण आला मध्ये. पुन्हा एकदा सुजयने राव आणि माझ्याकडून शिव्या खाऊन घेतल्या आणि रावच्या ताकिदि प्रमाणे मॅंगोला डोसून पुढे मंडणगडाच्या दिशेने निघालो. मध्ये कुठेहि न थांबता २५ किलोमीटरचे अंतर आम्ही एका तासात गाठले. डोक्यावर ऊन रन-रनत होते आणि सकाळचा नाश्ता कुठल्या कुठे निघून गेला होता. पोटात पण भूक रन-रनायला लागली होती. मग मंडणगडावर जायच्या रस्त्याबद्दल चौकशी करून घेतली आणि एक मत करून एस.टी.स्टॅडच्या जवळच्या हॉटेल मध्ये शिरलो.

आज तर आमची मेजवानी होती. सुजयला मस्त बिर्यानी खायची हुक्की आली होती. आज सुजयला एवढ्या शिव्या घातल्या मग आता त्याला नाराज करणे अशक्य झाले आणि बिर्याणी खाण्यात विशेष काही दुष्परिणाम दिसत नव्हता. मस्त गप्पा-टप्पा टाकत प्रत्येकी एक-एक बिर्याणी हाणली. सुजय आणि राजुला एक कमी पडली म्हणून त्यांनी अजून एक मागवली आणि अर्धी-अर्धी हाणली. तो पर्येंत मी आणि रावने आराम करून घेतला. जेवण झाल्यावर सर्वांनी गप्पा टाकत अजुन थोडा वेळ आराम केला आणि गड पाहायला निघालो. मंडणगड शहराला लागूनच डोंगरावरती किल्ला आहे, किंबहुना असे म्हणायला पाहिजे की मंडणगड शहर किल्ल्याच्या बाजूला वसलेले आहे...असो. हॉटेलच्या बाहेर किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याची चौकशी केली आणि कळाले गडावर जायला नवीन मातीचा रस्ता झाला आहे. अजुन रस्ता बनवण्याचे काम चालू आहे पण बाइक जाऊ शकते. मग काय लागलो त्या रस्त्याला.


जस-जसे वरती चढत होतो तस-तसा रस्ता खडतर होत होता आणि चढण पण फार होते. मधे एक घर दिसले आणि पोरे फिरत होती. सुजयला या ठिकाणी बाइक चढवायला फार त्रास होत होता. राव आणि सुजयने घराकडे थांबायचे ठरवले आणि मला व राजुला पुढे जा असे सांगितले. आमच्या कडचे सर्व समान त्यांच्या कडे ठेवले आणि निघालो पुढे गड पाहायला. समान नसल्यामुळे या रस्त्यावर बाइक चढायला फार त्रास होत नव्हता. एवढे चढण होते की एकदा-दोनदा बाइकचे पुढचे चाक वर झाल्यासारखे पण वाटे. त्यामुळे धडपडल्या सारखे झाले. मग मी आणि राजूने पुढे सरकून आमचे वजन पुढे टाकायचे ठरवले. मी थोडासा टाकिवर आलो आणि राजू मला चिटकून बसला. अशा पस्थितीत कसा-बसा रस्ता होता तिथ पर्येंत आलो, या पुढे बाइक चालवणे अशक्य होते. थोडासा प्रयेत्न केला पण कशाला नको तिकडे धाडस असे म्हणून सोडला विषय. आधीच आमचे एक आक्सिडेंट झाले होते ते काय पुरे नव्हते का? एका बाजूला बाइक लावली आणि निघालो पायी गड पाहायला. चार ढेंगा चाललो आणि गडाचे पठार आले, तसा एकदम मोठा गड नव्हता. एक पाण्याचे तळे आणि मंदिर सोडले तर गडाचे अस्थित्व काहीच नव्हते. जरा आजूबाजूला फेर-फटका मारला आणि मंदिराच्या सावलीत जाऊन बसलो. फारच ऊन होते आणि घामाने माखलो होतो, पाणी पिऊन थोडा वेळ आराम करत तिथेच बसलो. सावलीत जरा बरे वाटत होतो आणि मस्त वारा पण सुटला होता. म्हणून अजुन थोडा वेळ आराम करून घेतला. अधून-मधून एखाद-दुसरा फोटो पण काढून घेतले. छान रिलॅक्स झाल्यावर निघालो गड उतरायला.

बाइक घेऊन पुन्हा त्याच प्रकारे वजन सांभाळत निघालो. आता मात्र फारच जास्त त्रास होत होता. एक तर उतरण आणि ते ही मातीचा खडतर रस्ता. मी आणि राजू बाइक वरचा आमचा तोल कसा-बसा सांभाळून खाली येत होतो. एकदा-दोनदा आम्ही माती खाता-खाता वाचलो पण. सुजय आणि रावच्या जवळ आलो आणि पाहतो तर दोघेही सर्व समान घेऊन रस्त्याच्या मधे ऊनात उभे होते. त्यांनी आम्हाला जसे पाहिले, तसे लगेच या! असे हातवारे करू लागले आणि मजबूत शिव्या घालायला लागले. हरामखोर.....कुठे होतात...किती वेळ लावलात आणि वगैरे-वगैरे. मनसोक्त शिव्या देऊन, सर्व भडास काढली आणि मग सर्व हकिकत सांगितली. मंडणगड या परिसरात जमिनीत एक विशिष्ट प्रकारच्या मुंग्या आहेत. मुंग्या कसल्या लाल मुंगळे होते ते. कुठल्या ही सावलीत राहायची नौबत नव्हती, असे तिकडच्या आदिवासी पोरांनी सांगितले. म्हणून सुजय आणि अभिजीत ऊनात येऊन उभे होते. जसे मी आणि राजू गड पाहायला निघालो तेव्हाच सावलीत यांना मुंग्या चावायला लागल्या होत्या आणि जवळ-जवळ एक तास भर त्यांना ऊनात उभे राहायची शिक्षा झाली होती. अरे..रे..बिचारे....म्हणूनच खवसले होते माझ्यावर आणि साहजिक आहे. त्या आदिवासी मुलं कडून कळले की त्यांच्या घरात पण हे लोक जमिनीवर नाही झोपत. ४ एक फुटा वरती कापडाचा पाळणा करून झोपतात. तरी ही त्या पोरांच्या अंगावर मुंग्या चावल्याचे निशाण दिसत होते. हा वेगळा निराळा असा अनुभव मिळाला आम्हाला या ट्रीप वर. आम्हाला म्हणजे विशेष करून सुजय आणि अभिजीत रावला. मंडणगडाचा, मुंग्यांचा आणि त्या आदिवासी पोरांचा आम्ही निरोप घेऊन खाली मंडणगड शहरात आलो.

संध्याकाळ होण्याच्या आत आम्हाला हरणे बंदर गाठायचे होते, म्हणून जास्त वेळ न लावता एक-एक मँगोला गट्कला आणि सुटलो दापोलीच्या दिशेने. आक्सिडेंट मुळे बाइक वरुन चढ उतर करायला त्रास होयचा म्हणून बाइक वर बसल्या-बसल्या फोटो काढून घायचो आणि फारच गरज वाटली तर करामत करून उतरायचो. आरामात एक-दीड तासात आम्ही दापोली शहर गाठले. शहरात आल्याबरोबर सुजयला ऊत आला. दापोली हे बर्‍यापैकी मोठे शहर आहे. अलिबाग नंतर 3 दिवसांनी मोठ्या शहरात आल्या बरोबर सुजय सुटला होता. शहरात बाइक वेडी-वाकडी चालवणे हा तर सुजयचा हात खंडच. ३दिवस अरुंद रस्ते आणि ते ही कोकणातले वेडेवाकडे, सुजय एकदम कोंबडी होऊन बाइक चालवत होता. शहरात आल्या-आल्या शेर झाला आणि आपले रंग दाखवायला लागला. इकडन-तिकडन, ह्याच्या मधून-त्याच्या मधून, ह्याला दाब-त्याला दाब असे करत सुजय चालला होता आणि एवढ्यात सुजय एका मुलीला ठोकता-ठोकता वाचला. तसा सुजय कसला ठोकतोय त्याला अशा पद्धतीने बाईक चालवायची फार सराव आहे. पण हे पाहून आता रावचे टाळके सरकले. आज सुजयचा दिवसच फार खराब होता. रावने मला बाइक सुजयच्या जवळ घ्यायला सांगितली आणि मी तसे करताच. रावने सुजयच्या हेल्मेट वर जी जोरात टापली मारली आणि भो.....अशी सलकावून शिवी घालत सुजय विचित्र प्रकारे बाइक चालवत असल्या मुळे त्याला बड-बडायला सुरवात केली. लगेच आम्ही बाइक बाजूला थांबवली आणि आमच्या व सुजय मधे जी बाचा-बाची सुरू झाली. मी मात्र आता काही जास्त बोललो नाही. माझा सुजयला बोलायचा कोटा सकाळी संपला होता. तरी एक-दोनदा मधे बोललोच. भर शहरात रस्त्यावर एवढी मच-मच पाहून आजुबाजूचे लोक पण पाहायला लागले. मग जरा आम्ही आवरते घेतले. थोडीशी मांडवली करून निघालो हरणे बंदराच्या दिशेने. दापोली ते हरणे हे अंतर सुमारे १८ किलो मीटर आहे. पटापट हे अंतर कापून आम्ही हरणे एस.टी स्टॅंड गाठले. हरणे बंदर आणि सुवर्णदुर्गा बद्दल चौकशी करून त्या दिशेने निघालो. एस.टी स्टॅंड पासून हे अंतर २-३ किलो मीटर आहे. जस-जसे हरणे बंदराच्या जवळ जायला लागलो.तस-तसे सुक्या माशांचा फार वास यायला लागला आणि अचानक सुवर्णदुर्गाचे दर्शन झाले. बंदरावर तर मासळीचा फारच जास्त वास येत होता. सुजयला तर 2 मिनिटे पण उभे राहता येत नव्हते. या वास मुळे सुजयला तर उलटी झाल्यासारखे होत होते. तो बाइक वरुन उतरला पण नाही आणि राजुला घेऊन तसेच परत हरणे एस.टी स्टॅंड कडे गेला.  मी आणि राव बंदरावरूनच सुवर्णदुर्गाला मनसोक्त पाहत होतो आणि फोटो काढत होतो. हा किल्ला संपूर्ण पणे पाण्यात आहे. किल्ल्याकडे जाण्यास एकाही बोटीची सोय नाही आहे. जर हा किल्ला पाहायचा असेल तर खाजगीरित्या मच्छीमारांना घेऊन त्यांच्या बोटीतून जाऊ शकतो. पण पर्याय त्या वेळेला आमच्या कडे उपलब्ध नव्हता. वेळे अभावी पण आणि आर्थिकदृष्ट्या आम्हाला परवडणार नव्हते. सुवर्णदुर्गाला मनात आणि कॅमेऱ्यात भरून आम्ही त्याचा निरोप घेतला आणि हरणे एस.टी स्टॅंड जवळ आलो.

सुजय आणि राजू एस.टी स्टॅंडच्या समोरच उभे होते. सुजयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सुजय कोकणस्थ मराठा असल्याचे कळाले होते, माश्याच्या वासने उलटी होते. कोकणातल्या मराठ्याला किमान पानावर वासा करता तरी मासा लागतो आणि हा वासा ने उलटी करतो. अरे रे रे...वास्तविक आमचे आज रात्र काढण्याचे ठिकाण हरणे होते. पण सुजयच्या या परिस्थिती मुळे आणि तसे पाहायला गेले तर हरणे पण फार राहण्यासारखे ठिकाण वाटत नव्हते. म्हणून आम्ही दापोलीत राहायचे ठरवले. दापोली बर्‍यापैकी मोठे शहर असल्या कारणास्तव रस्त्यावर कुठेही राहायला मिळणे कठीण वाटत होते. म्हणून दापोलीच्या आधी कुठे तरी मंदिर किंवा शाळा पाहु असे एकमत झाले आणि दापोलीच्या दिशेने निघालो. जस-जसे दापोली जवळ यायला लागले तसे आम्ही मंदिर-शाळा पाहायला लागलो, पण काही दिसेचना. दापोलीच्या ५ किलोमीटर आधी माझ्या बाईकचा टायर पंचर झाला. आता काळोख पडत होता, अजुन राहण्याची ही काहीच सोय नव्हती. सुजयला पुढे दापोली शहरात पंचर काढणारा पाहायला सांगितले आणि जर तो यायला तयार झाला तर येताना घेऊन ये असेही बजावले. अशा पळापळीच्या कामासाठी सुजय मस्त कामाला येतो, किंबहुना त्याची हि आवडती कामे आहे. फक्त कधी कधी मात्र एकदम विचित्र वागतो. तो पर्येंत आजूबाजूला राहाण्यासारखे काही दिसते का असे पाहायला लागलो. एवढ्यात सुजय पंचरवाला घेउनच आला. भलताच पटा-पट होता. पंचरवाल्याने टायर काढून, सुजय परत घेऊन गेला त्याला. आता रावला बाईकच्या जवळ सर्व सामानाची रखवाली करायला बसवले आणि मी व राजू राहायची सोय पाहायला निघालो. रस्त्याला काळोख असल्या कारणास्तव मी हेडलॅंप लावून चाललो होतो. जरा पुढे गेलो आणि रस्त्या लागत असलेल्या टपरी कडून एक इसम आमच्या जवळ आला आणि बोलला "वॉट हॅपन सर" दापोली पासून ५ किलोमीटर अलीकडे अस्लीखीत इंग्लीश शब्द कानावर पडले हे ऐकून मी आणि राजू तीन ताड उडालो. मग आम्ही त्यांना सर्व हकिकत सांगायला लागलो. बाइक पंचर झाली आहे, मित्र पंचर काढायला टायर घेऊन गेला आहे, रात्र काढायला मंदिर, शाळा, अंगण मिळेल का वगैरे-वगैरे, आम्ही प्रवासी आहोत. चर्चेअंती तो इसम गोव्याचा आहे असे कळले आणि कामानिमित्त दापोली मधे राहतो. आम्ही प्रवासी आहोत हे त्याला माझ्या हेडलॅंप मुळे कळाले, कारण गोव्यात बरेच प्रवासी पाहिलेले होते त्याने. बर्याच चर्चा करून त्यांनी आम्हाला त्यांच्या अंगणात झोपा असे काबुल केले. हे ऐकून जीवात जीव आला. मग आम्ही त्यांच्या बरोबर बाइक कडे आलो. बराच वेळ रावला सामनापाशी बसवून ठेवले होते. त्याने बसल्या बसल्या ट्रायपॉट नसल्या कारणास्तव हेल्मेण्ट मधे कॅमरा ठेवून नाईटशॉट फोटो काढत होता. त्याने काढलेला तो हा फोटो. एवढ्यात सुजय पंचर काढून घेऊन आला. मग एकमेकांची ओळख परेड झाली. त्यात कळले की त्या इसमचे नाव ऑलेक्स आहे. ऑलेक्स हा मुळात गोव्याचा आणि कामानिमित्त दापोलीत येऊन परिवारासाहित राहत होता. टायर लावून सुजय परत पंचर वाल्याला सोडायला गेला आणि ऑलेक्स आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.

ऑलेक्स ने त्याच्या घरच्या सर्व मंडळी बरोबर ओळख करून दिली आणि फ्रेश व्हायला सांगितले. एक-एक करून सर्व फ्रेश झालो आणि त्यांनी आम्हाला घरात बोलावून चहा दिला. जसे ओळखीचे पाहुणे घरी आल्यावर आपण जसे आदरतिथ्य करतो ना तसे ते आम्हाचे आदरतिथ्य करत होते. आम्हाला चहा बरोबर बिस्कीट आणि फरसाण पण दिले होते. वरुन खा-खा असे आग्रह पण चालला होता. हा परिवार वेगळाच होता, आमची त्यांची काय ओळख. थोड्या गप्पा मारत बसलो आणि मी सुजयला जेवणाची सोय पाहायला पाठवले. सुजय आणि राजू जाऊन कुठून तरी झणझणीत भुर्जी पाव घेऊन आले. ऑलेक्स ने आपण सर्व एकत्र जेऊ असे आम्हाला सांगितले. त्यांचे पण जेवण तयार झाले. पाने मांडली आणि घरात जाऊन पाहतो तर आमच्यासाठी पण पाने होती. भात, आमटी, भाजी, लोणचे, पापड आणि सर्वात आश्चर्याचा धक्का देणारा होते म्हणजे कुरवड्या आणि फेण्या तळल्या होत्या. त्यांना सांगितले आम्ही भुर्जी पाव आणला आहे. पण ते काही केल्या ऐकेना. ते बोलले ठेवा भुर्जी पाव आपण सर्व मिळून खाऊ हे. आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हते. सर्वांनी सोबत जेवण आवरले आणि बाहेर अंगणात आलो. ऑलेक्स बरोबर अंगणात शतपावली घालत गप्पा मारत बसलो. ऑलेक्सच्या पोरांनी आमच्यासाठी चटई, रजई, चादरी आणि उश्या आणून टाकल्या. आम्ही त्यांना बोललो अंथरून नको आम्ही आमचे अंथरून आणले आहे. तरी काही केल्या ते एकेनाच . थोडावेळ ऑलेक्स परिवाराबरोबर गप्पा मारल्या आणि मस्त अंगणात झोपी गेलो.