6.11.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सातवा दिवस (देवरुख ते पन्हाळा)

२४ मे २००५, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. रावने मला पुन्हा एकदा पुढच्या ट्रीप बद्दल विचार कर असा प्रश्न टाकला. पण माझे मत आता ही तसेच होते काही निराळे नव्हते. खरोखर मी एकटा पुढच्या ट्रीपसाठी तयार नव्हतो. शेवटी रावने पण नागी टाकली. तयार होऊन देवरुखच्या नाक्यावर आम्ही नाष्ट्यासाठी आलो. नाष्टा करताना पण रावचे बर्‍याच मार्गाने माझे मन वळवायचा प्रयेत्न चालला होता. पण या वेळेला त्याचे काहीच चालले नाही. नाष्टा उरकून १०.३० च्या दरम्यान आम्ही देवरुख सोडले.

On Vishalgad
सारखरपा पार केले आणि आंबा घाट चढायला लागलो. दीड-एक तासाच्या बाइक दौड नंतर आंबा घाटतल्या गणेश मंदिराच्या जवळ थांबलो. या जागे वरुन कोकणातला परिसर फार छान दिसतो. मी आणि रावने फोटो काढून घेतले. थोडावेळ आराम करत चहा मारला आणि पुढे निघालो. संपूर्ण आंबा घाट चढून आंबा गावात आलो. विशालगडला जाणार्‍या रस्त्याची चौकशी केली आणि देवरुख-कोल्हापूर रस्त्यावरून उजवीकडे जाणारा विशालगडाच्या रस्त्याला लागलो. आंबा ते विशालगड हे अंतर २०-२२ किलोमीटरचे आहे. पण हा रस्ता फारच खराब आहे. संपूर्ण रस्ता खडकाळ आणि मातीचा. बाइक चालवण्याचा संपूर्ण कस निघाला. हे अंतर आम्ही दीड-एक तासात पार केले. मधे एकदा-दोनदा फोटो काढायला थांबलो होतो.

दोन दिवस घरात आराम केल्यामुळे आज आम्हाला फरच गरमा जाणवत होत की काय असे वाटले. विशालगडला पोहोचल्या पोहोचल्या आम्ही सर्वात पहिले हॉटेल मधे शिरलो आणि थंड गार मॅगोला ऑर्डर केला. जरा जीव शांत करून घेतला आणि निघालो गड पाहायला. रावने मी गड पाहायला येत नाही तुम्ही जा असे सांगितले. राव हॉटेल मधे सर्व समान घेऊन बसून राहिला आणि मी व राजू गड पाहायला निघालो. विशालगडाच्या वर पर्येंत रस्ता आहे आणि त्यानेच आम्ही पण आलो होतो. एक पूल ओलांडला नि शिरलो गडाच्या आत. वास्तविक गडाला दरवाजा वगैरे काही नाही आहे. गडाच्या सुरवातीला बरीच दुकाने आहेत आणि ती थेट गडात असलेल्या पिर बाबांच्या दर्ग्या पर्येंत जातात. पिर बाबांच्या दर्ग्याला बर्‍याच भाविकांची गर्दी असते आणि ती आम्हाला पण पाहायला मिळाली. Samadhi of Baji Prabhu Deshpande, Vishalgadगर्दीतून पिर बाबांना दर्ग्याच्या बाहेरूनच नमस्कार केला आणि गड पाहायला दर्ग्याच्या बाजूचा रस्ता घेतला. या पिर बाबांच्या दर्ग्याची एक पद्धत आहे, बरेचशे भाविक लोक  कोंबडीला मारुन आपला नवस फेडत. दर्ग्याच्या मागच्या बाजूला प्रचंड घाण आहे आणि वास हि येतो. सर्वत्र कोंबडीची पिसच पीस होती. हे पिसांचे जंगल पार केले आणि विशालगड पालथा  घालायला निघालो. विशालगड हे नाव या किल्ल्याला त्याच्या विशालते मुळेच पडले असावे असे मला वाटते. मला या किल्ल्याचा फार इतिहास माहीत नाही. मला फक्त बाजे प्रभू देशपांडे याची समाधी विशालगडा वर आहे एवढे माहिती होते आणि तीच पाहायची होती. विशालगड हा तटबंदी ने पाहावा असे वाटले होते पण मधेच बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी दिसली आणि वळलो त्या दिशेला. समाधीवर नतमस्तक झालो आणि त्या शुरांनामुजरा करून परत फिरलो किल्ला पाहायला. आम्ही नुसते चालतच होतो तटबंदी काही केल्या येईच ना. Rajendra, Vishalgadमाझ्या बरोबर राजू पण होतो आणि त्याला ट्रेकिंग ची फार सवय नव्हती. भर उनात आम्ही चललो होतो. शेवटी बरीच तंगड तोड करून तटबंदी काही गाठली नाही. जरा वेळ उनातच विश्रांती घेतली आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. पण आता राजूची संपूर्ण ताकद संपली होती. तसे त्याने मला सांगितले नाही पण त्याचा चेहरा पाहून मला जाणवले. अजुन पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता आणि आम्ही मागे वळलो. परत येताना तर राजू फक्त माझ्या मागोमाग चालत होतो त्याला काही कळतही नव्हते. बरीच तंगड तोड करून आम्ही परत रावकडे हॉटेल मधे आलो.

Road to Vishalgadया वेळेला तर राजू पूर्णपणे गाळुन पडला होता. सर्व प्रथम रावने आम्हाला मॅगोला पाजला आणि मग माझी जी काही कान उघडणी केली, मजबूत शिव्या घातल्या. एकतर यायला बराच वेळ लावला आणि राजूची हे हाल करून आणले म्हणून. रावने मला बऱ्याच शिव्या घातल्या आणि शांत झालो. बराच वेळ आराम करून घेतला आणि त्यातच जेवून पण घेतले. रावच्या घरातले पन्हाळ्यावर आले होते. पुन्हा आम्ही पुढच्या प्रवसासाठी सज्ज झालो. अधून-मधून फोटोग्राफी किंवा कंटाळा आला तर माधेच कुठही ब्रेक घेत आणि आम्ही पन्हाळा जोतीबा फाट्यावर आलो. गरम्याचा तर फारच त्रास होत होता आणि माझ्या विशालगडाच्या टंगड तोडी मुळे राजुला पण त्रास होत होता. फाट्यावर मस्त मोरणा लस्सी प्यायलो आणि पुढे लागलो पन्हाळा चढायला. चढायला म्हणजे बाइक ने....पन्हाळ्यावर गाडी जाते आणि सर्वत्र गाडीने फिरता पण येते पन्हाळा कोल्हापूरकरांचे हिल स्टेशन आहे. संध्याकाळी ४ च्या दरम्यान आम्ही पन्हाळ्यावर रावच्या घरातल्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो.सर्वांनी आमची विचारपूस केली आणि शिव्या पण घातल्या. रावच्या आई-वडिलांनी रावला त्यांच्या ताब्यात घेतले आणि मजबूत झाडणी केली आम्हा सर्वांची. रावच्या घरची बरीच मंडळी होती. त्याचे आई-बाबा, भाऊ-वाहिनी, मामा-मामी, २ मामेभाऊ. आम्ही सर्व पटा-पट फ्रेश होऊन पन्हाळा गड पाहायला गेलो. रावचा मामा कोल्हापूरातच रहतात त्यामुळे संपूर्ण गड तेच आम्हाला फिरवू लागले. अंधार होई प्रयेंत मस्त गड फिरत होतो आणि मग पुन्हा हॉटेल वर आलो. जेवणाची सोय रावच्या मामांनी हॉटेल वरच केली होती. फ्रेश होऊन सर्व थोडा वेळ आराम करत बसलो. बसल्या-बसल्या राजू आणि रश्मी यांची मैफिल जमली आणि मग काय मस्त गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. बराच वेळ मैफिल रंगली आणि कईक गाण्यांच्या फर्माईश पण पूर्ण झाल्या. रावचे मामा तर फारच दिलखुलास आहेत. त्यांच्या मते जेवणा आधी थोडी मस्ती करूया असे होते, मग काय आम्ही झालो त्यांच्या मस्तीत शामिल. कोल्हापूरकरच ते ऐकणार काय कोणाला. सर्वांना गाडीत घालून हॉटेलच्या बाहेर एका पठारावर घेऊन गेले आणि गाडीच्या डेक वर गाणी लावून आम्ही धिंगाणा घालायला लागलो. पौर्णिमेच्या जवळ पासचे दिवस होते त्यामुळे मस्त चांदणे पडले होते. काय धमाल केली आम्ही, पन्हाळ्याच्या पठारावर भर रात्री मस्त चांदण्यात नाच गाणे चालले होते आमचे. दीड-दोन तास लहान मोठ्यांचा धिंगाणा आवरून आम्ही हॉटेल वर परत आलो आणि मस्त जेवून झोपी गेलो.

4.11.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सहावा दिवस (देवरुख)

२३ मे २००६, १०च्या दरम्यान खिडकीतून ऊन घरात यायला लागले आणि गरम व्हायला लागले तेव्हा आम्हाला जाग आली. बराच वेळ इकडे तिकडे अंगणात बसलो आणि फ्रेश होऊन नाक्यावर टापरी सारखे छोटेसे हॉटेल आहे तिकडे चहा साठी गेलो. मग बराच वेळ चहा, गप्पा, मिसळ, चहा आणि गप्पा असे चलले होते. आज आमचा आरामाचा दिवस होता. १२ वाजे पर्येंत तिकडेच टाइम पास करत बसलो. माझे देवरुख आणि परीसरच्या गावात बरेच नातेवाईक आहेत. काही जणांना भेटायचे होते आणि थोडीशी इकड-तिकडची कामे पण होती. राजू आणि रावला घरी सोडले आणि निघालो माझ्या कामाला. ४च्या दरम्यान मी परत देवरुखला घरी आलो. राजू आणि रावचा काहींना-काही टाइम पास चालू होताच मधेच हरीलाल बरोबर त्यांनी गप्पान मधे मैत्री पण केली. हरीलाल कढून मला घराचे २-३ महिन्याचे भाडे घ्यायचे होते, व्यवहार क्लियर झाला आणि मी पण घुसलो गप्पान मधे. अंधार पडे पर्येंत गप्पा चालू होत्या.

मात्र आता आमच्या गप्पा चर्चांमध्ये बदलल्या होत्या. विषय होता पुढच्या ट्रीप बद्दल. करम... उद्या रात्री पर्येंत आम्हाला पन्हाळ्याला पोहचायचे होते. रावच्या घरातले सर्व पन्हाळ्याला येणार होते. म्हणून देवरुख सोडण्याआधी आमच्या पुढच्या ट्रीपचा निर्णय घेणे जरुरीचे होते. या वेळेला माझे मत रावच्या पेक्षा पूर्ण निराळे होते. राजू कोल्हापूर वरुन परत मुंबईला रावच्या घरातल्यान बरोबर जाणार होता आणि पुढची ट्रीप आम्ही दोघेच करणार होतो. रावचा पाय अजुन ठीक झाला नव्हता आणि त्याची बाइक वर चढ-उतार, कुठे उठता बसताना लागणारी मदत अजूनही लागत होती. पुढच्या ट्रीप साठी आम्ही दोघेच असणार आणि मदतीला माझ्या शिवाय कोणी नाही. मी एकटा तरी कुठे-कुठे धावपळ करणार, रावची काळजी आणि त्याला लागेल तिथे मदत, सामानाची चढ-उतार, हे आण ते आण, किल्ले फिरायचे अशा बर्‍याच गोष्टी होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रत्नागिरी पुढचे एक-दोन किल्ले डोंगरावर होते आणि ते चढून जावे लागणार होते. आम्ही दोघे असल्या कारणास्तव रावला सोडून कुठे ही जाता येणार नव्हते आणि राव जास्त चढ-उतार करू शकत नव्हता.

बराच वेळ आमच्या या विषया वर चर्चा झाल्या, पुढे जायचे की नाही. शेवटी माझ्या मतावर रावच्या मना विरुद्ध एकमत झाले. ठरले मग पुढचे किल्ले करायचे नाही. रावचा पाय बरा झाला की पुन्हा केव्हा तरी येऊ परत. राव आणि राजू कोल्हापुरातून पुणामार्गे मुंबईला जाणार आणि मी परत देवरुखला. कारण आईची बरीच कामे देवरुखला होती आणि म्हणून मी आईला पण देवरुखला बोलवायचे ठरवले होते. माझ्या या निर्णयामुळे राव नाराज झाला होता, हे मी जाणून होते आणि चर्चा सुरू करण्याआधी राव नाराज होणार हे ही मला माहीत होते. पण माझा ही नाईलाज होता, मी काय पुढच्या ट्रीप साठी आणि रावची एवढी मोठी जबाबदारी पेलायला तयार नव्हतो आणि ती ही एकट्याने बरोबरीला एक तरी असता तर गोष्ट निराळी होती. या सर्व चर्चा करून पुढच्या ट्रीपचा निर्णय घेतला आणि ७च्या दरम्यान निघालो जेवायला.

पुन्हा तिकडेच स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो आणि त्याच टेबल वर जाऊन बसलो. विशेष करून आमचा अवतार ही काल सारखाच, तीचं मोरपिसी ट्रेक पॅंट, तेच फाटके टी-शर्ट आणि तसाच त्यातल्या-त्यात बरा असलेला राजू. आज तर त्या हॉटेलचा वेटर, काही कर्मचारी आणि मालकाने पण आश्चर्य मुद्रेने पाहिले. आज त्यांच्या ही मनात हाच प्रश्न असावा "कोण आहेत ही आणि कुठून आलेत?". काल प्रमाणेच कमी अधिक फरकाने तशीच जेवणाची ऑर्डर आणि तशाच गप्पा. जेवण उरकून १०च्या दरम्यान निघालो, घरी आलो आणि थोडासा वेळ टंगळ-मंगळ करून झोपी गेलो.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- पाचवा दिवस (गणपतीपुळे ते देवरुख)

२२ मे २००६, सकाळी ८च्या दरम्यान मंदिरात येणार्‍या जाणार्‍या भक्तांच्या गर्दीच्या आवाजाने आम्ही उठलो. उठून पाहतो तर माझ्या स्लीपिंग बॅग वर बरीचशी वाळू साचली होती. आजूबाजूचे येणारे जाणारे आमच्याकडे पाहून हसत होते. थोडेसे हसलेल्या सारखे वाटले म्हणून पटा-पट उठलो आणि समान आवरून हात पाय तोंड धुवून घेतले. शौचाला गेलो तर फार मोठी लाईन होती आणि मला व राजूला जोरात लागली होती. राव आणि सुजयला मंदिराकडे सामनासहित सोडले आणि मी व राजू मंदिराच्या बराच पुढे बीच वर सुरूच्या बनाच्या आडोशाला जाऊन बसलो काम फत्ते करायला. आमचे विधी उरकून परत मंदिराकडे आलो तर आता सुजय बोलला मला पण लागली आहे मग तो गेला. सर्व प्रातविधी उरकून आम्ही पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेरच नाष्टा करून १० च्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने निघालो.

Ratnadurg, Ratnagiri गणपतीपुळे ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ३० किलोमीटरचे आहे. निवळी मार्गे नाही हा सागरी किनाऱ्यामार्गे काय सुंदर रस्ता होता मस्त समुद्राला लागून आणि कुठे कुठे कोळी गावांकडून. मध्ये बरेचदा फोटोग्राफी साठी थांबत थांबत १२च्या दरम्यान रत्नागिरीला टिळकआळीमधे काकाच्या घरी पोहोचलो. काकाचे भाडेकरू साळवी परिवार माझ्या परिचयाचे होते आणि काकाने त्यांना आधीच फोन करून सांगितले होते की मी येणार आहे. काकाच्या घराची चावी त्यांच्याकडे असते. साळवी काकांनी आमची विचार पूस केली आणि दिली चावी हातात. आम्ही सर्वांनी फ्रेश होऊन घेतले आणि समान काकांच्या घरीच ठेवून भगवती बंदराला लागून असलेला रतनदुर्ग किल्ला पाहायला निघालो. सकाळचा नाष्टा फार काय चांगला नव्हता म्हणून परत टिळक आळीतली फेमस टपरीवरची मिसळ खाऊ आणि मग किल्ला सर करू असे ठरले. मिसळ हाणली आणि निघालो किल्ला सर करायला. किल्ल्याच्या पायथ्या पर्येंत रस्ता आहे. बाइक लावल्या आणि घुसलो किल्ल्यात. किल्ल्यात शिरल्या-शिरल्या भगवती देवीचे मंदिर आहे. भगवती देवी हे रत्नागिरीच्या लोकांचे आराध्य दैवत मानले जाते. दर्शन घेतले आणि किल्ल्याचा फेर-फटका मारायला निघालो. किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीचे काम चालू होते. आम्ही तटबंदि वरूनच फिरायचे ठरवले. तसे पाहायला गेल्यास तटबंदि आणि मंदिर सोडले तर बाकी काहीच नाही आहे. मधे सर्व माळरान आहे आणि किल्ला पण तसा छोटा आहे. मात्र किल्ल्याची बरीचशी बाजू समुद्राच्या दिशेने आहे त्यामुळे समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा खडकांवर आपटताना पाहायला मिळतात. काय सुंदर नजारा होता तो. मी आणि राव ने बरेच फोटो काढले आणि भगवती मंदिराच्या बाजूला असलेल्या एक चौथऱ्यावर सावलीत बसलो.


Sea from Ratnadurg, Ratnagiri

आमच्या ट्रीपचा ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा संपला आणि ठरल्याप्रमाणे सुजय व राजुला रजा द्यायची वेळ आली होती. पण राजूने आमच्या बरोबर पुढे ट्रीपवर यायचे ठरवल्यामुळे आता फक्त सुजयला रजा द्यायची वेळ आली. आम्ही पुढचे प्लॅनिंग करायला लागलो. रत्नागिरी वरुन मुंबईला निघणाऱ्या बसेस सर्व रात्रीच्या असतात तो पर्येंत सुजय एकटा काय करणार आणि वगैरे-वगैरे. पण काय पर्याय नव्हता आम्हाला माझ्या घरी देवरुखला संध्याकाळच्या आत पोहोचायचे होते. रतनदुर्ग उतरलो आणि टिळक आळीत मी व राजू मस्त माश्याच्या जेवणावर ताव मारू लागलो आणि राव व सुजय चिकन आणि मटन वर होते. जेवण आवरले आणि रत्नागिरी स्टॅंडला आलो सुजयसाठी मुंबईचे तिकीट पाहायला. आता मात्र सुजयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आम्ही सर्व आता पासून वेगळे होणार या भावनेने सुजयचा चेहरा पडला होता. समजू शकतो मी त्याच्या भावना कितीही भांडलो तरी आम्ही सर्व मित्र आहोत आणि आम्हाला या मजेदार ट्रीप वर सोडून जायला जमत नव्हते. सुजयचे रात्रीच्या मुंबई गाडीचे तिकीट दिले हातात आणि काही टाइमपास करण्यासाठी वाचायला पेपर व मासिके घेतली. आम्ही सुजयसाठी रात्री पर्येंत रत्नागिरी मधे थांबणार नव्हतो, आम्हाला संध्याकाळच्या आत देवरुख गाठायचे होते. सुजयची परतीची सोय करून परत काकाच्या घरी गेलो. समान उचलले आणि सुजयला पुन्हा रत्नागिरी स्टॅंड वर सोडले. सुजयचा निरोप घेण्यापुर्वी एक-एक मॅंगोला मारू असे ठरले. सुजय किती हळवा झाला होता की त्याने गरीब गाय सारखे आज्ञाकारक होऊन रावला विचारले मी आता तरी मॅंगोलाच्या ऐवजी थंप्स अप पीऊ का? आता माझी ट्रीप संपली. या वेळा सुजयच्या निरागस आणि बद्दललेल्या रूपाने आमचे सर्वांचेच मन हळवे झाले. आम्ही तिघांनी मॅंगोला आणि सुजयने  थंप्स अप मारून त्याला ट्रावल  ऑफीस मधे बसवले आणि एकमेकांचा निरोप घेऊन २ च्या दरम्यान देवरुखच्या दिशेने निघालो.


Hornbill, Devrukhरत्नागिरी ते देवरुख हे अंतर ५० किलोमीटर आहे. आरामात बाइक चालवत अधून मधून थांबत. २ तासांनी ४ वाजता देवरुखला माझ्या घरी पोहचलो. माझ्या देवरुखच्या घराचा अर्धा भाग भाड्याने दूरदर्शनचा इंजिनियर हरीलाल ला दिलेला होता आणि त्याला आईने आधीच कळवले होते की आम्ही येणार आहोत. त्याने सर्व घर साफ करून घेतले होते, नाही तर गेल्या-गेल्या आम्हाला साफ-सफाई करावी लागली असती. त्याचा कडून कळले की ग्राम पंचायतीचे पाणी उन्हाळ्या मुळे येत नाही आहे. पाहायला गेले तर कोकणात नेहमीच उन्हाळ्यात पाण्याचा प्रोब्लेम तर हा असतोच आम्हाला काय हे नवीन नव्हते. पण एक ३-४ दिवस उन्हात आणि मातीत माखून आम्ही देवरुख गाठले होते आणि आज मात्र काही केल्या आंघोळीची गरज होती. हरीलालच्या मदतीने ६० रुपये देऊन ५०० लिटर पाण्याचा टॅंकर मागवला. कपडे धुवायला भिजत घालून, आंघोळ्या करून घेतल्या. स्लॅपचे घर असल्या कारणास्तव घरात फार गरम होत होते.माझ्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भली मोठी आमराई आहे आणि त्या बाजूला सावली असल्या कारणास्तव थोडा थंडवा आहे. आम्ही जाऊन बसलो तिकडे हवा खायला. तेवढ्यात आमच्या कानावर पक्षाचा आवाज यायला लागला, पाहतोतर एक मोठा पक्षी जवळच फांदीवर बसलेला दिसला. राव या प्रकारची फोटोग्राफी करण्यात माहीर होता पाया मुळे ताटवरून उडी मारणे शक्य नव्हते. रावचा कॅमरा घेऊन मी मारली उडी तटवरून. उपद्याप करून एक-दोन फोटो माझ्या परीने काढून घरात जाऊन आरामा करत बसलो. राजू टाइम पास म्हणून गिटार वाजवू लागला. मी आणि राव, राजूने छेडलेल्या सुरांचा आनंद लुटत होतो. मला तो आजही छान आठवतो आहे. राजू कॉटवर बसून गिटार वाजवत होता, राव दरवाज्यात वारा खात आणि मी लादिवर आडवा पडून ऐकत होतो. मी ऐकता-ऐकता मस्त अंतराळत  पोहोचलो, कधी झोपलो कळलेच नाही. राव आणि राजूने बराच वेळ मैफिल चालू ठेवली. तासाभराची झोप काढून आम्ही कपडे धुवून घेतले आणि नंतर बराच वेळ हरीलाल बरोबर गप्पा टाकत बसलो.



Rajendra, of the guitar

देवरुख तसे फारच लहान शहर आहे. त्यावेळी देवरुखात एकाच हॉटेल होते आणि तेही १०-१०.३० ला बंद होते असे कळाले. ७ च्या दरम्यान आम्ही देवरुख स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो. परत मासे आणि चिकन ऑर्डर केले. जेवण येई पर्येंत आमच्या गप्पा चालू होत्या. दीपक हॉटेल पाहायला गेले तर फारच साधे आणि छोटे हॉटेल आहे. वरुन पर्मिट रूम असल्या कारणास्तव बरीच सारी लोकपण येतात. आमचा अवतार पाहून बर्‍याच लोकांना "कोण बाबा हे लोक आलेत"? असा पण प्रश्न एकडे ही पडलेला जाणवले. आमचा अवतार फारच विचित्र होता यात काय शंकाच नाही मात्र आमचे बरेचशे संभाषण इंग्लीश मधे चालले होते. विशेष करून माझा अवतार फारच विचित्र होता. मोरपिसी कलरची  ट्रेक पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट. त्यातल्या त्यात राजुच जरा बरा होता. राव पण मळलेले फाटके टी -शर्ट. बराच वेळ गप्पा टाकत जेवण उरकले आणि आलो घरी. ४-५ दिवसांचा थकवा होताच फार, मस्ती टंगळ मंगळ न करता तिघेही ११च्या दरम्यान झोपी गेलो.