4.11.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सहावा दिवस (देवरुख)

२३ मे २००६, १०च्या दरम्यान खिडकीतून ऊन घरात यायला लागले आणि गरम व्हायला लागले तेव्हा आम्हाला जाग आली. बराच वेळ इकडे तिकडे अंगणात बसलो आणि फ्रेश होऊन नाक्यावर टापरी सारखे छोटेसे हॉटेल आहे तिकडे चहा साठी गेलो. मग बराच वेळ चहा, गप्पा, मिसळ, चहा आणि गप्पा असे चलले होते. आज आमचा आरामाचा दिवस होता. १२ वाजे पर्येंत तिकडेच टाइम पास करत बसलो. माझे देवरुख आणि परीसरच्या गावात बरेच नातेवाईक आहेत. काही जणांना भेटायचे होते आणि थोडीशी इकड-तिकडची कामे पण होती. राजू आणि रावला घरी सोडले आणि निघालो माझ्या कामाला. ४च्या दरम्यान मी परत देवरुखला घरी आलो. राजू आणि रावचा काहींना-काही टाइम पास चालू होताच मधेच हरीलाल बरोबर त्यांनी गप्पान मधे मैत्री पण केली. हरीलाल कढून मला घराचे २-३ महिन्याचे भाडे घ्यायचे होते, व्यवहार क्लियर झाला आणि मी पण घुसलो गप्पान मधे. अंधार पडे पर्येंत गप्पा चालू होत्या.

मात्र आता आमच्या गप्पा चर्चांमध्ये बदलल्या होत्या. विषय होता पुढच्या ट्रीप बद्दल. करम... उद्या रात्री पर्येंत आम्हाला पन्हाळ्याला पोहचायचे होते. रावच्या घरातले सर्व पन्हाळ्याला येणार होते. म्हणून देवरुख सोडण्याआधी आमच्या पुढच्या ट्रीपचा निर्णय घेणे जरुरीचे होते. या वेळेला माझे मत रावच्या पेक्षा पूर्ण निराळे होते. राजू कोल्हापूर वरुन परत मुंबईला रावच्या घरातल्यान बरोबर जाणार होता आणि पुढची ट्रीप आम्ही दोघेच करणार होतो. रावचा पाय अजुन ठीक झाला नव्हता आणि त्याची बाइक वर चढ-उतार, कुठे उठता बसताना लागणारी मदत अजूनही लागत होती. पुढच्या ट्रीप साठी आम्ही दोघेच असणार आणि मदतीला माझ्या शिवाय कोणी नाही. मी एकटा तरी कुठे-कुठे धावपळ करणार, रावची काळजी आणि त्याला लागेल तिथे मदत, सामानाची चढ-उतार, हे आण ते आण, किल्ले फिरायचे अशा बर्‍याच गोष्टी होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रत्नागिरी पुढचे एक-दोन किल्ले डोंगरावर होते आणि ते चढून जावे लागणार होते. आम्ही दोघे असल्या कारणास्तव रावला सोडून कुठे ही जाता येणार नव्हते आणि राव जास्त चढ-उतार करू शकत नव्हता.

बराच वेळ आमच्या या विषया वर चर्चा झाल्या, पुढे जायचे की नाही. शेवटी माझ्या मतावर रावच्या मना विरुद्ध एकमत झाले. ठरले मग पुढचे किल्ले करायचे नाही. रावचा पाय बरा झाला की पुन्हा केव्हा तरी येऊ परत. राव आणि राजू कोल्हापुरातून पुणामार्गे मुंबईला जाणार आणि मी परत देवरुखला. कारण आईची बरीच कामे देवरुखला होती आणि म्हणून मी आईला पण देवरुखला बोलवायचे ठरवले होते. माझ्या या निर्णयामुळे राव नाराज झाला होता, हे मी जाणून होते आणि चर्चा सुरू करण्याआधी राव नाराज होणार हे ही मला माहीत होते. पण माझा ही नाईलाज होता, मी काय पुढच्या ट्रीप साठी आणि रावची एवढी मोठी जबाबदारी पेलायला तयार नव्हतो आणि ती ही एकट्याने बरोबरीला एक तरी असता तर गोष्ट निराळी होती. या सर्व चर्चा करून पुढच्या ट्रीपचा निर्णय घेतला आणि ७च्या दरम्यान निघालो जेवायला.

पुन्हा तिकडेच स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो आणि त्याच टेबल वर जाऊन बसलो. विशेष करून आमचा अवतार ही काल सारखाच, तीचं मोरपिसी ट्रेक पॅंट, तेच फाटके टी-शर्ट आणि तसाच त्यातल्या-त्यात बरा असलेला राजू. आज तर त्या हॉटेलचा वेटर, काही कर्मचारी आणि मालकाने पण आश्चर्य मुद्रेने पाहिले. आज त्यांच्या ही मनात हाच प्रश्न असावा "कोण आहेत ही आणि कुठून आलेत?". काल प्रमाणेच कमी अधिक फरकाने तशीच जेवणाची ऑर्डर आणि तशाच गप्पा. जेवण उरकून १०च्या दरम्यान निघालो, घरी आलो आणि थोडासा वेळ टंगळ-मंगळ करून झोपी गेलो.

No comments:

Post a Comment