२४ मे २००५, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. रावने मला पुन्हा एकदा पुढच्या ट्रीप बद्दल विचार कर असा प्रश्न टाकला. पण माझे मत आता ही तसेच होते काही निराळे नव्हते. खरोखर मी एकटा पुढच्या ट्रीपसाठी तयार नव्हतो. शेवटी रावने पण नागी टाकली. तयार होऊन देवरुखच्या नाक्यावर आम्ही नाष्ट्यासाठी आलो. नाष्टा करताना पण रावचे बर्याच मार्गाने माझे मन वळवायचा प्रयेत्न चालला होता. पण या वेळेला त्याचे काहीच चालले नाही. नाष्टा उरकून १०.३० च्या दरम्यान आम्ही देवरुख सोडले.
सारखरपा पार केले आणि आंबा घाट चढायला लागलो. दीड-एक तासाच्या बाइक दौड नंतर आंबा घाटतल्या गणेश मंदिराच्या जवळ थांबलो. या जागे वरुन कोकणातला परिसर फार छान दिसतो. मी आणि रावने फोटो काढून घेतले. थोडावेळ आराम करत चहा मारला आणि पुढे निघालो. संपूर्ण आंबा घाट चढून आंबा गावात आलो. विशालगडला जाणार्या रस्त्याची चौकशी केली आणि देवरुख-कोल्हापूर रस्त्यावरून उजवीकडे जाणारा विशालगडाच्या रस्त्याला लागलो. आंबा ते विशालगड हे अंतर २०-२२ किलोमीटरचे आहे. पण हा रस्ता फारच खराब आहे. संपूर्ण रस्ता खडकाळ आणि मातीचा. बाइक चालवण्याचा संपूर्ण कस निघाला. हे अंतर आम्ही दीड-एक तासात पार केले. मधे एकदा-दोनदा फोटो काढायला थांबलो होतो.
दोन दिवस घरात आराम केल्यामुळे आज आम्हाला फरच गरमा जाणवत होत की काय असे वाटले. विशालगडला पोहोचल्या पोहोचल्या आम्ही सर्वात पहिले हॉटेल मधे शिरलो आणि थंड गार मॅगोला ऑर्डर केला. जरा जीव शांत करून घेतला आणि निघालो गड पाहायला. रावने मी गड पाहायला येत नाही तुम्ही जा असे सांगितले. राव हॉटेल मधे सर्व समान घेऊन बसून राहिला आणि मी व राजू गड पाहायला निघालो. विशालगडाच्या वर पर्येंत रस्ता आहे आणि त्यानेच आम्ही पण आलो होतो. एक पूल ओलांडला नि शिरलो गडाच्या आत. वास्तविक गडाला दरवाजा वगैरे काही नाही आहे. गडाच्या सुरवातीला बरीच दुकाने आहेत आणि ती थेट गडात असलेल्या पिर बाबांच्या दर्ग्या पर्येंत जातात. पिर बाबांच्या दर्ग्याला बर्याच भाविकांची गर्दी असते आणि ती आम्हाला पण पाहायला मिळाली. गर्दीतून पिर बाबांना दर्ग्याच्या बाहेरूनच नमस्कार केला आणि गड पाहायला दर्ग्याच्या बाजूचा रस्ता घेतला. या पिर बाबांच्या दर्ग्याची एक पद्धत आहे, बरेचशे भाविक लोक कोंबडीला मारुन आपला नवस फेडत. दर्ग्याच्या मागच्या बाजूला प्रचंड घाण आहे आणि वास हि येतो. सर्वत्र कोंबडीची पिसच पीस होती. हे पिसांचे जंगल पार केले आणि विशालगड पालथा घालायला निघालो. विशालगड हे नाव या किल्ल्याला त्याच्या विशालते मुळेच पडले असावे असे मला वाटते. मला या किल्ल्याचा फार इतिहास माहीत नाही. मला फक्त बाजे प्रभू देशपांडे याची समाधी विशालगडा वर आहे एवढे माहिती होते आणि तीच पाहायची होती. विशालगड हा तटबंदी ने पाहावा असे वाटले होते पण मधेच बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी दिसली आणि वळलो त्या दिशेला. समाधीवर नतमस्तक झालो आणि त्या शुरांनामुजरा करून परत फिरलो किल्ला पाहायला. आम्ही नुसते चालतच होतो तटबंदी काही केल्या येईच ना. माझ्या बरोबर राजू पण होतो आणि त्याला ट्रेकिंग ची फार सवय नव्हती. भर उनात आम्ही चललो होतो. शेवटी बरीच तंगड तोड करून तटबंदी काही गाठली नाही. जरा वेळ उनातच विश्रांती घेतली आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. पण आता राजूची संपूर्ण ताकद संपली होती. तसे त्याने मला सांगितले नाही पण त्याचा चेहरा पाहून मला जाणवले. अजुन पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता आणि आम्ही मागे वळलो. परत येताना तर राजू फक्त माझ्या मागोमाग चालत होतो त्याला काही कळतही नव्हते. बरीच तंगड तोड करून आम्ही परत रावकडे हॉटेल मधे आलो.
या वेळेला तर राजू पूर्णपणे गाळुन पडला होता. सर्व प्रथम रावने आम्हाला मॅगोला पाजला आणि मग माझी जी काही कान उघडणी केली, मजबूत शिव्या घातल्या. एकतर यायला बराच वेळ लावला आणि राजूची हे हाल करून आणले म्हणून. रावने मला बऱ्याच शिव्या घातल्या आणि शांत झालो. बराच वेळ आराम करून घेतला आणि त्यातच जेवून पण घेतले. रावच्या घरातले पन्हाळ्यावर आले होते. पुन्हा आम्ही पुढच्या प्रवसासाठी सज्ज झालो. अधून-मधून फोटोग्राफी किंवा कंटाळा आला तर माधेच कुठही ब्रेक घेत आणि आम्ही पन्हाळा जोतीबा फाट्यावर आलो. गरम्याचा तर फारच त्रास होत होता आणि माझ्या विशालगडाच्या टंगड तोडी मुळे राजुला पण त्रास होत होता. फाट्यावर मस्त मोरणा लस्सी प्यायलो आणि पुढे लागलो पन्हाळा चढायला. चढायला म्हणजे बाइक ने....पन्हाळ्यावर गाडी जाते आणि सर्वत्र गाडीने फिरता पण येते पन्हाळा कोल्हापूरकरांचे हिल स्टेशन आहे. संध्याकाळी ४ च्या दरम्यान आम्ही पन्हाळ्यावर रावच्या घरातल्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो.सर्वांनी आमची विचारपूस केली आणि शिव्या पण घातल्या. रावच्या आई-वडिलांनी रावला त्यांच्या ताब्यात घेतले आणि मजबूत झाडणी केली आम्हा सर्वांची. रावच्या घरची बरीच मंडळी होती. त्याचे आई-बाबा, भाऊ-वाहिनी, मामा-मामी, २ मामेभाऊ. आम्ही सर्व पटा-पट फ्रेश होऊन पन्हाळा गड पाहायला गेलो. रावचा मामा कोल्हापूरातच रहतात त्यामुळे संपूर्ण गड तेच आम्हाला फिरवू लागले. अंधार होई प्रयेंत मस्त गड फिरत होतो आणि मग पुन्हा हॉटेल वर आलो. जेवणाची सोय रावच्या मामांनी हॉटेल वरच केली होती. फ्रेश होऊन सर्व थोडा वेळ आराम करत बसलो. बसल्या-बसल्या राजू आणि रश्मी यांची मैफिल जमली आणि मग काय मस्त गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. बराच वेळ मैफिल रंगली आणि कईक गाण्यांच्या फर्माईश पण पूर्ण झाल्या. रावचे मामा तर फारच दिलखुलास आहेत. त्यांच्या मते जेवणा आधी थोडी मस्ती करूया असे होते, मग काय आम्ही झालो त्यांच्या मस्तीत शामिल. कोल्हापूरकरच ते ऐकणार काय कोणाला. सर्वांना गाडीत घालून हॉटेलच्या बाहेर एका पठारावर घेऊन गेले आणि गाडीच्या डेक वर गाणी लावून आम्ही धिंगाणा घालायला लागलो. पौर्णिमेच्या जवळ पासचे दिवस होते त्यामुळे मस्त चांदणे पडले होते. काय धमाल केली आम्ही, पन्हाळ्याच्या पठारावर भर रात्री मस्त चांदण्यात नाच गाणे चालले होते आमचे. दीड-दोन तास लहान मोठ्यांचा धिंगाणा आवरून आम्ही हॉटेल वर परत आलो आणि मस्त जेवून झोपी गेलो.

भटकंती आवडली
ReplyDeleteधन्यवाद....
Delete