एप्रिल - जून २०१०, मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी सौदी अरेबियाला गेलो होतो आणि तिकडेच मी आमची लेह बाईक ट्रीपचा ब्लॉग लिहीत असताना मनात विचार आला की या पुढची बाईक ट्रीप आता कोणती करायची. लगेच लेह ब्लॉग लिहायचा ठेवला बाजूला आणि इंटरनेट वर शोधायला लागलो. शोध मोहिमे तून मला काही ४ - ५ विविध परिसरातल्या बाईक ट्रीपच्या माहिती मिळाल्या. राजस्थान, केरला, कर्नाटका, तमिळ नाडू, ईशान्यपुर्व भारत आणि सिक्कीम - भूतान. या सर्वातून माझी प्रथम पसंती ईशान्यपुर्व भारत आणि सिक्कीम - भूतान कडेच गेली. ईशान्यपुर्व भारत बाईक ट्रीपसाठी बऱ्याच दिवसांची मोठी ट्रीप लागणार होती, जवळ - जवळ महिना तर कमीत - कमी लागणारच होता. सध्या सर्वांच्या नोकरीच्या परिस्थितीतून महिन्या भराची तर नक्कीच सुट्टी मिळेणार नाही याची मला खात्री होती. त्यामुळे नाहीलाजास्तव मला माझ्या मनाला सिक्कीम - भूतान ट्रीप साठी तयार करावे लागले. वास्तविक अरुणाचल, आसाम, मेघालय हे ईशान्यपुर्वेचे राज फिरण्यासाठी अप्रतिम आहेत. सिक्कीम व भूतान पण त्याच परिसरात आहे आणि भूतान म्हणजे परदेशी ट्रीप. या सर्व मुद्यांवरून शेवटी माझ्या मनात सिक्कीम - भूतानला पुढची बाईक ट्रीप नक्की असे ठरले. मी सिक्कीम - भूतान ट्रीपचा प्लान, रूट वगैरे पाहायला लागलो. इंटरनेट वर बर्याच लोकनी या बाईक ट्रीप केल्या आहेत असे कळले आणि मग त्यांचे ब्लॉग वाचणे चालू झाले. या सर्वांच्या रूटचा वर - वर अभ्यास करू लागलो. याच इंटरनेट वरच्या भटकंतीच्या दरम्यान मला आमच्या ग्रुप साठी जवळ पास साजणारा रूट प्लान मिळाला आणि त्यात आमच्या पद्धतीचे अजून काही बदल करून मी हा वर - वरचा आराखडा रोहन चौधरी आणि अभिजीत नाचरेला पाठवला. खऱ्या अर्थाने माझ्या बाजूने भूतान बाईक ट्रीपची संकल्पना आणि सुरवात अशी झाली. बहुदा रोहन आणि अभी हि या बाईक ट्रीप बद्दल विचार करतच होते. पण माझ्या या ई-मेल ने तर पुढची ट्रीप भूतानचीच हे सर्वांच्या मनात कोरून ठेवले असेल असे मला वाटते.
माझ्या ई-मेल वर रोहन आणि माझी बोला - बोली चालू झाली. बरेचदा आम्ही चॅट वर पण या विषयावर बोलू लागलो. पुढे मी अभिजीत राव आणि प्रशांत आचरेकरला पण या ट्रीप बद्दल कळवले. मे २०१० ला मी जेव्हा सौदी वरुन परत आलो तेव्हा अभिजीत नाचरे बरोबर या विषयावर चर्चा केली. पण येत्या २ वर्षांत अभ्याला काय ही ट्रीप जमणार नव्हती आणि अभ्या शिवाय आम्ही काय ही ट्रीप करणार नव्हतो. अभ्या तर आमचा मोरखा आहे आणि त्या शिवाय कुठलही मोठ एक्सपीडीशन मी तर नक्कीच नाही करणार. मग मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा नाचऱ्याला बोललो की ही ट्रीप जेव्हा तुला जमेल तेव्हा करू.
आता भूतान ट्रीप तर लगेच होणार नव्हती म्हणून मग मी अभिजीत रावला आमची कोकण सागरी किल्ले राहिलेली बाईक ट्रीप करू असे बोललो आणि या मुळे अक्षताला पण बाईक ट्रीपची सवय होईल. मे - जून २०१० ला आम्ही आमची कोकण बाईक ट्रीप पूर्ण करून घेतली. १०११ मध्ये मला ऑफीसच्या कामासाठी एक वर्षासाठी लंडनला जावे लागले होते. लंडन मध्ये असताना मी या सर्वांशी संपर्कात होतोच. याच कालावधीत रोहन त्याच्या परिवारा बरोबर तो भूतानची टूर करून आला होतो. या नंतर कधी तरी मी नाचरेशी बोलताना एकदा त्याला विचारले की आपण कधी करणार रे आपली भूतान बाईक ट्रीप. त्या वेळी मला नाचरे बोलला कि करूया आपण भूतान बाईक ट्रीप येत्या वर्ष भरात. फक्त मी त्याला बोललो की मी लंडन मध्ये असताना प्लान करू नकोस. मला ट्रीप वर यायला फार अडचण होईल. तरी पण जर तू भूतान ट्रीप मी लंडन मध्ये असताना प्लान करशील तर मला किमान ४ - ५ महिने आधी सांग म्हणजे सुट्टी, विमानाची तिकिटे वगैरे यांची तयारी करायला वेळ पाहिजे. मग अभ्या ने मला गवाही दिली कि मी भारतात येत नाही तो पेर्येंत आपण भूतान बाईक ट्रीप नाही करणार.
याचा दरम्यान नाचरे दाम्पत्यांना मुलगा झाला. आता मला वाटले की अजुन २ - ३ वर्ष तरी काय नाचरे बाईक ट्रीप प्लान नाही करणार. पण पुढे नाचऱ्याच्या हालचाली वरुन तो भूतान बाईक ट्रीप बहुदा १ - २ वर्षांत प्लान करतो आहे असे मला जाणवायला लागले होते. माझ्या मनात तर पूर्ण गोंधळ झाला होता. कि अभ्या भूतान बाईक ट्रीप करतो आहे कधी. मला या ट्रीप वर अक्षताला घेऊन जायचे होते. माझी फार इच्छा होती कि मी व अक्षताने भूतान बाईक ट्रीप एकत्र करायची. पण अभ्याच्या हालचाल पाहून काही कळायचे नाही, कधी वाटायचे कि तो आता १ - २ वर्षात ट्रीप करेल आणि कधी कधी वाटायचे कि त्याला ट्रीप साठी पुढे २ - ३ वर्ष तरी लागतील. एक तर मी लंडन मध्ये होतो आणि आता आम्हाला पण आयुषातली पुढची प्लॅनिंग चालू करायची होतो. पण या सर्व गोंधळात पुढे करायचे काय हा आमच्या पुढे गहन प्रश्न पडला होता. माझे सर्व प्राधान्य होते भूतान बाईक ट्रीप मी व अक्षताने एकत्र करावे. पण शेवटी आमचे प्राधान्य बदलावे लागले आणि आम्हाला पण आयुषातल्या पुढच्या प्लॅनिंग च्या दिशेने जावे लागले. पण तरी हि माझे मन मात्र भूतान बाईक ट्रीप मी व अक्षताने एकत्र करावी या दिशे कडे होते. असो, तरीही मी अभ्याला सांगून ठेवले होते की जेव्हा त्याला योग्य वाटेल तेव्हा भूतान बाईक ट्रीपची प्लॅनिंग कर मी बाईक ट्रीपसाठी लंडन वरुन काय जगाच्या पाठी वरुन कुठून पण येईन आणि आयुष कुठे का असे ना मी तरी पण भूतान बाईक ट्रीप साठी नक्की येईन. मात्र आता अक्षता येईल याची मी खातरी नाही देऊ शकणार.

मार्च २०१२ मध्ये मी अक्षताच्या डोहाळे साठी लंडन वरुन मुंबईला आलो होतो. त्याच वेळेला माझ्या वाढदिवस होता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नाचरे मला भेटायला आमच्या कांदिवलीच्या घरी आला होता. आता पर्येंतच्या माझ्या वाढदिवसा पैकीची सर्वात मौल्यवान भेट अभ्याने मला दिली. ती म्हणजे, आमच्या लेह बाईक ट्रिपचा मी जो ब्लॉग लिहिला होता ना त्याचे त्याने कलर प्रिंट कडून एक पुस्तक बनवले आणि ते त्याने मला वाढदिवसाची भेट म्हणून दिले. पुस्तक पाहून तर मी चकितच झालो कि मी एवढे लिहिले. मला तर खात्रीच होत नव्हती की मी एवढे लिहू शकतो आणि शकलो. पुस्तक रुपी ब्लॉग पाहून मला फारच आनंद झाला. असेच पुस्तक नाचऱ्याने रोहनच्या लेह सफरनामाच्या पण बनून त्याला दिले होते. पण नक्कीच रोहनच्या आणि माझ्या ब्लॉग ची काहीच तुलना नाही आहे. रोहनच्या लिखाण उच्च दर्जाचे आहे आणि माझे लिखाण फाटके आहे. त्या पुस्तकात नाचऱ्याने प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत माझ्या लेखनातल्या भरपूर चुका अक्षताने बारकाईने शोधून काढून दुरुस्त केल्या बद्दल तिचे सर्वात जास्त आभार मानले आहे. हे कार्य अध्यापही अक्षता कडून चालू आहे आणि वेळे अभावी आता अक्षताला जमत नाही म्हणून माझ्या आईची मदत होत आहे. या एक आनंदाच्या धक्या नंतर नाचऱ्याने मला अजुन एक सुखद धक्का दिला. तो म्हणजे की जून २०१३ मधे आपण भूतान बाईक ट्रीप करतो आहे आणि त्याने त्याची तयारी सुरू केली आहे. १० मार्च २०१२ ला नाचऱ्याने माझे आणि घरचे वातावरण आनंदमय करून ठेवले होते.
मी तर फारच खुश होतो की आता आमची दुसरी मोठी बाईक ट्रीप होणार आणि ते ही परदेशात. मी नाचऱ्याला सांगितले की त्याला माझी मदत कुठे लागेल तेथे आणि तेव्हा सांग. वास्तविक नाचऱ्याला प्लॅनिंग मध्ये आमची तशी जास्त मदत लागतच नाही. तो यात परिपूर्ण मुरलेला आहे. हीच आणि अश्या तऱ्हेने आमच्या भूतान बाईक ट्रीप ची सुरवात झाली.
No comments:
Post a Comment