7.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - आठवा दिवस (देवरुख आराम)

१२ जून २०१०, काल झालेल्या पळ-पळी मुळे आज सर्वच जरा थकले होते आणि आज तसे आमचा काय कुठेही जायचा प्लान नव्हता. आरामात सर्व १०.३० - ११ च्या दरम्यान उठलो. उन्नु सकाळीच जरा आमच्या आधी उठला होता. लगेच त्याने जाऊन बाहेरून सर्वांसाठी चहा घेऊन आला. फ्रेश होऊन आम्ही आरामात चहा घेत बसलो. आता पर्येंतच्या बाईक ट्रीपच्या गप्पा चालल्या होत्या आणि आता पुढचे कसे जायचे याची पण चर्चा करू लागलो.

प्लान प्रमाणे आज देवरुखला राहायचे आणि उद्या पहाटे लवकर ४ - ५ च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने प्रवास करायचे होते. पण राव व उन्मेषला पुण्याला जायचे होते आणि अपर्यायाने राजुला पण त्यांच्या बरोबर जावे लागणार होते. कारण राजूसाठी जर ते पनवेल पर्येंत येउन मग पुण्याला जाणार त्यापेक्षा ते सर्व पुण्याला जाऊन मग राजू एकटा मुंबईला येईल असे ठरले. आम्ही तर मुंबईलाच जाणार होतो आणि पुण्यामार्गे आम्हाला फार वळसा पडला असता.

शेवटी या वेळी परत आमच्या गेल्या बाईक ट्रीप प्रमाणेच झाले. राव, राजू व उन्मेष पुण्याला जाणार आणि मी व अक्षता मुंबईला असे दोन वेगळ्या मार्गाने जायचे ठरले. देवरुख ते पुणे हे अंतर सुमारे २६० किलोमीटर आहे आणि त्यासाठी जास्त वेळ नाही लागणार होत्या त्यांना. एकदा आंबा घाट चढला कि मग मलकापूर ते पुणे हा रस्ता सरळ आणि फार चांगला आहे. या मुळे राव ने मला सांगितले की ते सर्व आजचं निघून जातील.  म्हणजे मग उध्या पर्येंत राजुला पण घरी जाता येई आणि उन्मेष पण पुण्यातून पुढे सोलापूरला निघू शकतो. रावने मला विचारले की मी व अक्षता एकटे मुंबईला जाण्यास काही अडचण आहे का. वास्तविक माझी कसली हरकत असणार, जो काही प्लान आता ठरला आहे तो सर्वांच्या सोईचा आहे. मग मी कशाला हरकत करणार. आमच्या नवीन परतीच्या प्लान वर आता सर्वांची न हरकतीचा शिक्का मर्तब झाला एकदाचा.

या सर्व चर्चेत जेवायची वेळ झाली म्हणून आता आम्ही सर्व प्रथम जेवून घेऊ असे ठरले. सर्व जेवायला बाहेरच गेलो रावच्या ठरलेल्या हॉटेल मध्ये. जेवून आल्या वर पुण्याला जाणारे सर्व निघायच्या तयारीला लागले. राव, उन्मेष आणि राजूने त्यांचे सर्व सामानाची बांधा-बांध केली आणि लागले निघायच्या शेवटच्या तयारीला. सर्व तयारी आवरून ते २ - २.३० च्या दरम्यान झाले बाईकवर स्वार आणि निघाले पुण्याच्या दिशेने माझा व अक्षताचा निरोप घेऊन. त्यांना आम्ही टाटा बाय बाय केले आणि जरा आराम करून घेऊ असे म्हणत आडवे झालो. मस्त संध्याकाळी आरामात उठलो आणि मग आमच्या निघण्याच्या तयारी ला लागलो. मी राव बरोबर फोना-फोनी करून त्यांची खुशाली विचारून घेतली आणि आम्ही पण बाहेरच जेवायला गेलो. रावनेच दाखवलेल्या शाकाहारी खानावळीतच गेलो. आरामात गप्पा मारत जेवण जेवत होतो. बरेच दिवसांनी मी व अक्षता एकटेच होतो. जेवण उरकून घरी आलो. आमच्या देवरूखच्या घरचे शेजारी राहाटे काका - काकींना भेटायला गेलो. देवरुखला गेलो कि मग आम्ही त्यांना भेटतोच आमचे आणि त्यांचे बरेच चांगले संबंध आहे. त्यांचा बरोबर पण थोडा वेळ गप्पा-गोष्टी झाली आणि मग घरी येउन शेवटची तयारी करू लागलो.

आज संध्याकाळ पासूनच जरा वातावरण फार बदलेले होते. आज उन्ह पण जरा कमीच होते. आता तर ढग पण दाटून आले होते. पाऊसाची चिन्हे दिसायला लागली होती. उद्या आम्ही निघताना जास्त पाऊस लागेल असे वाटत होते आणि जर लागलाच तर मग आमची पंचायीत होणार होती. जर जास्तच जोराचा पाऊस लागला आणि मुंबई पर्येंत जाता नाही आले तर आपण मध्येच कुठे तरी राहू असे मी अक्षताला सांगितले. बहुदा महाड किंवा नागोठणे असे कुठे तरी राहू. काही झाले तरी आपण आरामात हळू - हळूच जाऊ असे पण मी अक्षताला सांगून तिचे सांत्वन करू लागलो. अक्षताचे सांत्वन झाल्यावर मग मी आईला पण फोन लावून तिचे पण सांत्वन करून घेतले. सर्वांन बरोबर फोना - फोनी करून घेतली आणि त्यातून कळाले की राव आणि कंपनी पुण्याच्या जवळ पोहोचले आहेत. आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे होते म्हणून राव बरोबरची गप्पा - गोष्टी लवकर आवरली आणि त्या सर्वांची सुखारुप्ता कळली आणि मग आम्ही झोपी गेलो.

No comments:

Post a Comment