19.3.11

लेह बाईक ट्रीप - दीपालीची आठवण, दीपालीच्या हस्ते.

रोहन आणि अभिजीत या दोन वेड्यांमुळे मला बरच काही बघायला मिळालाय, अनुभवायला मिळालय आणि भविष्यात मिळेल सुद्धा आयुष्यात कधीही ट्रेकला न गेलेली मी पहिल्यांदा ट्रेक केला तो थेट हिमालयात (सारपास) ते शक्य झाल या दोघांमुळेच आतापर्यंत सगळ्यात मोठा बाईक प्रवास केलाय तो ठाणे ते अंधेरी आणि मी तयार झाले होते लडाखच्या बाईक ट्रीपसाठी अर्थातच रोहन आणि अभिजीत वर असणाऱ्या विश्वासामुळेच. पण घरच्यांसाठी मी support vehicle मधूनच फिरणार होते. ( लग्न झालंय आणि नवरा बरोबर नसताना फिरायला जातो मित्र मैत्रिणीबरोबर हाच आधी सगळ्यात मोठा गुन्हा त्यात बाईक वर फिरणार असे म्हटले असते तर माझ्या प्लानचे तीन तेरा वाजले असते. )

पहिल्याच मीटिंग मध्ये क्लियर करण्यात आलेल कि हि काही साधी पिकनिक नाहीए. प्रत्येकाने mentally & physically fit असायला हवं. High altitude वर जाणार म्हणजे श्वासाचे प्रॉब्लेम, बाईकवर बसायचे तेही इतके दिवस continuous म्हणजे physical fitness आणि इतके दिवस सगळ्यांनी एकत्र राहायचंय तर मिळून मिसळून राहण. साध माथेरानला गेल, माथेरान सोडाच officeच्या ACत सुद्धा शिंका येऊन नाक गळायला लागत असली शेंबडी मी. तिकडे थंडीत आपला कसा निभाव लागणार. तस अभिजीत ने breathing exercise सांगितले होते मिटींगला.

झाल मग २-३ महिने आधी झालेली आमची मिटींग आणि आता एक महिना झाला तरी fitness साठी काहीही पावलं उचलली गेलेली नाहीत. रोज नव्याने gym लावायचा संकल्प मात्र सोडला शेवटचा १ महिना राहिलेला तेव्हा महात्प्रयत्नाने सकाळी लवकर उठून walkला जाऊन आले ( फक्त एकच दिवस ) माझे हे ( आमचे हे :) ) ने मात्र अभिजीतला सांगितले हे असले मेंबर म्हणजे Risk आहे.

आता मात्र बरोबर मिरच्या झोंबल्या माझ्या नाकाला सकाळी लवकर उठून कपालभाती - प्राणायाम सुरु झाल. रोज उठून शिंकणारी मी आता शिंका कमी झाल्या, माझ्या great manager सासूबाईंनी सामान गोळा करायची जबाबदारी स्वत:वर घेतली आणि जायच्या आठवडाभर आधीच मी बॅग भरून तयार ऑफिस मध्ये सुद्धा सगळ्यांना सांगून झालेलं लडाखला जाणार म्हणून आणि सगळ्यांच्या कौतुक मिश्रित नजरांनी स्वतःला great समजून घेत होते.

जायच्या रात्री झोप काही येत नव्हती. अभी, मनाली, साधना गँग ट्रेन ने पुढे गेलेली. मी,शोभित, अमेय साळवी, दादा ( आशिष चौधरी ) असे पहिल्यांदाच विमानाने जाणारे चौघे सकाळी विमानतळावर भेटलो. सगळेच जण आप-आपल्या सामानाच्या वजनाबाबत साशंक. मला तर वाटत होत माझ्या सामानाच वजन जास्त होणार आणि माझे अर्धे कपडे हे लोक ( airport staff ) बाहेर फेकणार ( पहिल्यांदा जाण्याची अनाठायी भीती ) मी आपली उगाचच अमोलला बाहेर थांब हा! सामान कमी करायची वेळ आली तर...... अमोल ने आपली बायको किती बावळट अशा नजरे ने फक्त बघितले आणि मी विनोद पण कळत नाही याला अशा नजरेचे उत्तर दिले. पण आमच्या अमेय साळवी ( उर्फ फाटका माणूस ) आणि दादा यांनी आम्हाला व्यवस्थित जम्मूला आणलं. आणि आल्यावर लगेचचं आमच्या पुढच्या प्रवासाची कल्पना आली. आम्हाला न्यायला येणारी गाडी न्यायला आलीचं नाही आणि कडकडीत उन्हात आम्ही गाडीची व्यवस्था होतेय का याची वाट बघत बसलो. शेवटी हॉटेलवर पोहचून जेवून बिऊन मस्त ताणून दिल. संध्याकाळी बाकीची टीम सुद्धा आली. सगळे एकत्र आल्यावर आता जरा ट्रिपचा feel यायला लागला. रात्रीच्या जेवणानंतर उद्याच्या planची मीटिंग झाली तेव्हा तर एकदम Pro-bikers वाटलो. आम्ही आता थोडी थोडी ओळख होऊ लागली होती. मी घरी सांगितलेलं कि बाईक वर बसणार नाही, गाडीतूनच प्रवास करणार म्हणून दुसऱ्या दिवशी अभिने विचारल कि गाडीत कोण कोण बसणार तर मी लगेच हात वर केला आणि घरच्यांना दिलेल्या वचनाची पूर्ती केली याचं समाधान वाटल. पण गाडीत बसून काही मजा येत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आजारी पडल्यामुळे माझी अमेय साळवीचा pillion म्हणून नेमणूक झाली. आधी एक दोन ट्रेकला आमची ओळख होती पण बाईकवर काय अखंड वेळ एकत्र आणि त्यातून आम्ही दोघे हि बडबडे मग काही बघायलाच नको अखंड बडबड. अमेयला फोटोग्राफीची आवड आणि मी त्याची assistant लेन्स पकडायला, कॅमेराची बॅग सांभाळायला. लग्न, कॉलेज, नाती गोती, आई-बाबा, गाणी, मित्र-मैत्रिणी, स्वभाव.....आम्हाला कधी म्हणून विषयाची कमतरता जाणवली नाही. लधाक ट्रीपने ज्या काही देणग्या दिल्यात त्यातली हि एक, दुसरी देणगी म्हणजे माझा नवीन दादा (रोहनचा मोठा भाऊ). मी त्याला Mr. Perfect म्हणते. त्यच्या इतका व्यवस्थीत-नीटनेटका माणूस मी आजगायत बघितला नाही.


कोठेही गेल्यावर कोणाचं काय खाणे-पिणे झाले. बिल किती झालय. बिल व्यवस्थीत दिलाय ना? सकाळी सगळ्यात वेळेवर हजर राहाण. पाण्याच्या बाटल्या भरून, गाडीची हवा बिवा सगळे बघून, सांगितलेल्या वेळेवर आमचा दादा तयार आणि आम्ही सगळ्यात उशीर करून सुद्धा निघे पर्येंत....अरे माझे पाणी राहील, माझे हेल्मेट कुठे आहे, मी गाडीत कि मी बाईक वर असेच चालू असायचं.

किती-किती म्हणून आठवणी आहेत लधाकच्या. सकाळी उठलाय पासून रात्री झोपे पर्येंतरोज एका गडबडीच्या लयीत सर्व चालू होत. गडबडीच्या लयीत अश्या साठी आम्ही रोज काही तरी प्लान करायचो आणि रोज काहीतरी गडबड व्हायची. पण आमचा उत्साह मात्र दाणगा होता. एकदा तर मी, अभी, मनाली रात्री १२ वाजल्या पासून २.३० वाजे पर्येंत त्यांच्या रूम वर गप्पा मारत बसलो होतो. त्या दिवशी कारगील-लेह प्रवस करून सर्वच फार थकले होते. परंतु आम्ही मात्र गप्पा टाकत बसलो होतो. आता सगळ आठवले कि इतक छान वाटत. किती सुंदर क्षण आहेत हे.  I feel lucky for myself, मला इतके छान मित्र मैत्रिणी मिळाल्यात.

- दिपाली.

3 comments:

  1. मस्त दिपाली पुन्हा एकदा आठवणी जाग्या केल्यास....

    ReplyDelete
  2. आयला... चांगले लिहिलंय की... मी मागितले तेंव्हा १० ओळी लिहून दिल्या नाहीत दिपालीने... :) फटके द्यायला पाहिजेत तिला... :)

    ReplyDelete
  3. अरे रोहन वास्तविक तिने हे तुझ्यासाठीच लिहिले होते. पण तिचे हे लिहून पूर्ण होई प्रयेंत तुझा लेह ब्लोग झाला होतो. मग एकदा मला तिने सांगितले कि रोहनसाठी मी लिहेलेले आहे, तुला पाहिजे असेन तर देते. पण तिने ते वहीत लिहिले होते आणि मला स्कॅन करून पाठवले. तिने आधीच सांगितले होते कि ऑनलाइन काही लिहून देणार नाही, पाहिजे असेल तर असे घे. मग काय घेतले तसेच आणि मी सर्व ब्लोगवर टाइप करून तिच्या वतीने पोस्ट केले. :) महान दिपाली....

    ReplyDelete