16.11.09

लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी - कागदोपत्री

माझ्या सहित बऱ्याच मित्रांनी अभिजीतला होकाराचे ई-मेल पाठवले होते. अभिजित आणि रोहन यांनी प्राथमिक पूर्वतयारी जोरात सुरु केली, पण आम्ही मात्र या दोघांना लागेल तशी आणि लागेल त्या वेळी मदत करायचे मनात ठरवल होत. वास्तविक या दोघांना प्राथमिक पूर्वतयारीत आम्ह्ची कुठेच मदत लागली नाही आणि पहिला कागदी प्लान असलेला अभिजीतचा ई-मेल सर्व होकार असलेल्या मंडळींना आला. यामध्ये किती दिवस, प्रत्येक दिवसांचा आराखडा, येणारी माणस, येणारा खर्च, वगैरे वगैरे बऱ्याच ट्रीप संदर्भातल्या गोष्टी नमूद केल्या होत्या, त्याच बरोबर अभिजीतला प्रत्येकाची वयक्तिक माहिती आणि प्राथमिक खर्चाला लागणारे ५ हजार रुपये हवे होते.

कोणी अभिजीतला माहिती आणि पैसे दिले, कोणी फक्त माहिती दिली तर कोणी फक्त पैसे दिले, तर कोणी काहीच दिले नाही. मी मात्र फक्त माहिती दिली आणि पैशा बद्दल जरा थांब बोललो, कारण मला ऑफिस मध्ये सुट्टी करिता विचारायच होत. वास्तविक माझ्या ऑफिस मध्ये लग्नाला कशीबशी १० कामाचे दिवस सुट्टी मिळते आणि मला तर फिरायला ११ कामाचे दिवस सुट्टी हवी होती. मनावर दडपण, संकोच आणि थोडीशी लाज घेऊन मी माझ्या मॅनेजर कडे गेलो सुट्टी मागायला. मॅनेजर म्हणाला लग्न करत असशील आणि बायकोला घेऊन जात असशील तर देतो, वास्तविक ते मस्करीत होत. मग कशाला चाललास वगैरे वगैरे चालू झाल आणि ऑगस्ट मधेना, मग बघु. मी बोललो की तुम्ही सुट्टी देणार असाल तरचं मी पैसे भरीन. थोडासा विचार केल्यावर मॅनेजरने सुट्टी देण्याचे ठरवले. मी आनंदाच्या भरात अभिजीतला फोन केला आणि लवकरात-लवकर मी तुला पैसे पाठवतो असे सांगितले, पण पैसे काही लवकर गेले नाही. बरेच दिवसांनी पैसे मी अभिजीतला पाठविले.

मधल्या कालावधीत अभिजित आणि माझे, फोन किंवा ई-मेल वर भरपूर बोलन चालू होते. माझ्या शंका आणि विचारांची देवाण-घेवाण अभिजित बरोबर चालूच होती. रोहन किंवा आम्हा कोणाशीही, जर अभिजीतची चर्चा झाली की तो सर्वाना ती माहिती पोहचवत होता. मी सर्व चर्चान मध्ये जसे जमेल तसे भाग घेत होतो, मात्र सर्वात जास्त जोर सराव ट्रीप वर देत होतो कारण आम्ही सर्वांनी एकत्र भरपूर ट्रेकिंग केल आहे, पण आम्ही सर्वांनी बाईक ट्रीप मात्र एकत्र कधीच केली नव्हती. पाहायला गेल्यास हेच फार महत्वाचे होते आणि म्हणूनच मी सराव ट्रिप्स वर जोर देत होतो. सराव ट्रिप्सचा माझा सुजाव अभिजित आणि रोहनला पटला कारण बाईक ट्रीपच्या अडचणी आणि होणारे त्रास आम्हा तिघां व्यतिरिक्त कोणाला हि जाणवत नव्हता. आम्हा तिघांना ट्रेकिंग आणि बाईकिंगचा बराच अनुभव होता. त्यात अभिजित आणि रोहनला, ट्रेकिंग आणि ट्रीप नियोजांचा चांगलाच अनुभव होता. मी अभिजित राव बरोबर बऱ्याच बाईक ट्रिप्स केल्या होत्या, त्या कारणास्तव  मला सराव ट्रिप्स महत्वाच्या वाटत होत्या. माझ्या आणि रावच्या अजूनपर्यंतच्या बाईक भटकंतीत आम्हाला बराच बाईकिंगचा अनुभव आला होता, म्हणूनच सराव ट्रिप्स महत्वाच्या वाटत होत्या. पण मला, अभिजित नाचरे, रोहन आणि अभिजित राव सोडल तर सराव ट्रिप्सच महत्त्व कोणाला फारस जाणवत नव्हत. शेवटी अभिजित नाचरे ने आम्हा सर्वांच्या म्हणण्याला जोर देऊन पहिली सराव बाईक ट्रीप प्लान केली आणि आम्हा सर्वांना राजमाची सराव बाईक ट्रीपचा ई-मेल आला.

अजूनही सर्वजण अभिजीतला हवे असलेल्या माहिती आणि गोष्टी पाठवत नव्हते. याच संदर्भात माझे अभिजित बरोबर एकदा फोनवर बोलण झाल आणि असा हलगर्जीपणा आता चालणार नाही, असे अभिजितने सर्वांना सांगण्याची जरुरी भासत होते. अभिजीतला बरेच मनाविरुद्ध पण सफल लेह बाईक ट्रीपसाठी काही निर्णय घ्यावे लागत आणि लागणार होते. पण याला काही पर्याय नव्हता, कारण आम्ह्च सर्वांना सारखा सांगण होत कि हि काय नेहमीची बाईक ट्रीप किंवा ट्रेक नाही आहे. आपण सर्व लेह बाईक ट्रीप करणार आहोत, हि एक मोठी मोहीम आहे. या मोहिमेच महत्त्व आम्ही काही जण सोडले तर फारसे कोणाला समजत नव्हत, म्हणूनच अभिजीतला बरेच कठोर निर्णय घ्यावे लागले आणि आम्ही त्याचाशी सर्वच सहमत होतो.

अशा प्रकारे आमची पहिली सराव बाईक ट्रीप राजमाचीला जाण्याच ठरल. सराव राजमाची बाईक ट्रीप बद्दल  पुढील ब्लोग मध्ये सविस्तर सांगीन.

2 comments:

  1. लडाखला जाण्यापेक्षा याची तयारी जास्त त्रासदायक होती मित्रा... आपली ट्रिप जितकी यशस्वी झाली त्याचे ८० टक्के श्रेय एकट्या अभिजितचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

    ReplyDelete
  2. अमेय साळवी - फटका माणूस3/12/09 15:59

    नकीच रे १००% आणि माझ्या मते हे सर्वांचं मत आहे, कारण आपण फक्त लागेल तशी त्याला मदत करायचा प्रयत्न केला. पण त्याला ती मदत झाली कि, आपण त्रास वाढून ठेवला हे मला माहित नाही. आपला सर्वांचा प्रयेत्न १००% होता, पण चांगला वाईट हे हि मला माहित नाही.

    ReplyDelete