22.10.09

लेह बाईक ट्रिप संकल्पनेचा उगम

माझे काही मित्र लेहला जाऊन आले होते आणि बरयाच मित्रानं कडून मी लेहच्या सौंदर्या बद्दल ऐकले होते. जे कोणी "लेह-लडाख" बद्दल काही बोलायचे, तर फक्त "अप्रतिम" हाच शब्द मला कानी पडायचा. त्याच क्षणा पासून मला लेहला जायचे वेध लागायला चालू झाले होते. याच दरम्यान ऑक्टोबर २००३ मध्ये, मी माझी पहिली बाईक (TVS Victor) घेतली आणि मी लेहला बाईकने जायचं असे ठरवले, मग कईक मित्रानं बरोबर लेह बद्दल बोलताना आपण लेहला बाईकने जायचं अस बोलून जायचो. त्याच दरम्यान लेहला बाईकने जाण्याचा खर्च, रूट आणि कोणा बरोबर हे विचार मनात येऊ लागले. शेवटी सर्व प्रकारच्या चर्चा आणि झाल्यावर, अंदाजे मुंबई - लेह - मुंबई बाईकने रुपये ३५ हजार दरम्यान खर्च निघाला आणि शेवटी सर्व प्लान धुसर होत असल्याचे जाणवले..........

साल २००४ मध्ये, मी माझ्या मित्रानं बरोबर एन. सी. पी. ए. ला शाम मंचर याचं लेह - लडाखचे छायाचित्र प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो आणि त्याच क्षणा पासून लेहला आयुष्यात केव्हातरी एकदा बाईकने जायचे हे मी निश्चित केल. यानंतर बरेचदा या वर्षी आपण लेहला जाऊया, या वर्षी जाऊया, असे करीत करीत बरीच वर्षे निघून गेली. या वर्षी मार्च मध्ये अभिजित नाचरे चा आम्हा सर्वांना इमेल आला. तो लेह सफारी आणि ट्रेक प्लान करत आहे आणि आमच्या पैकी कोणाचीही इच्छा असल्यास, त्याला कळवावे. मी त्याच्या इमेल ला परत उत्तर पाठवल कि, तुझा प्लान फार छान आहे, पण मला लेहला बाईकने जायच आहे. त्याच करिता लेह सफारी साठी २० % मला धर आणि जर बाईक ट्रीप असेल तर मला तू २०० % धर. यानंतर बरेच जणांनी या मेल ला उत्तर पाठवले. बाईक ट्रीप असेल तर मज्जा येईल आणि वगैरे वगैरे. मला माहित होते कि रोहन आणि अभिजित ला पण बाईकने लेहला जायचं बर्र्याच वर्षा पासूनची इच्छा होती, त्यमुळे मला कुठे तरी माहित होते कि हे होऊ शकते. माझ्या वात्रट उत्तराने का होईना, प्रत्येक जण बाईक ट्रीप बद्दल विचार करायला लागले होते.

माझ्या वाढदिवसा निमित्त मी, रोहन, ऐश्वर्या, पूनम आणि सिद्धेश असे भेटायचे ठरले. त्याप्रमाणे सर्व रुईया नाका येथे भेटलो आणि हेच लेह बाईक ट्रीप करूया ना अशी चर्चा सुरु झाली. चर्चा बरीच सकारात्मक होती, पण रोहनचं आणि माझा किंतु – परंतु , याला जमेल - त्याल जमणार नाही, असे - मग तसे, अशा बऱ्याच  विषयांवर आम्ही चर्चा हाताळत होतो. तत्पूर्वी माझे अभिजित बरोबर पण फोनवर बोलणं झालं, माझे मत तेच बाईक ट्रीप तर मी २०० % नाही तर २० % आणि वरील सगळ्या चर्चा केल्या होत्या. वास्तवीक पाहायला गेल्यास, प्रत्येकाच्या मनात हेच विचार चालेले होते. आखिर बरेच दिवसांनी पुन्हा एक अभिजीतचा मेल आला, लेह बाईक ट्रीप करूया. पण आम्हा सर्वांना माहित होते कि, आता खरं काम पुढे आहे. अशा प्रकारे आमच्या बाईक ट्रीपच्या संदर्भात चर्चा सुरु केल्या आणि अभिजितने पुढकार घेऊन प्राथमिक कामाला सुरुवात केली.

4 comments:

  1. रोहनकडून या ट्रीपचे अगदी सविस्तर वर्णन एकले आहेच.आता तुझेही वाचते आहे... :)

    ReplyDelete
  2. अमेय साळवी - फटका माणूस18/11/09 17:31

    धन्यवाद, मी तुमच्या सारखा व्यवस्थित मराठी लिहू शकत नाही. पण रोहन पासून प्रेरणा घेऊन मी हा केलेला एक छोटासा प्रयेत्न. बर्याच चुका तुम्हाला सापडतील, कुपया त्या माझ्या निदर्ष्णास आण्याचे करावे.

    ReplyDelete
  3. प्रेरणा घेणाऱ्या फाटक्या माणसा... :P किमान मला सांगायचेस तरी की तू लिखाण करतो आहेस ते... आता सर्व लिखाण येऊ दे पटापट. तिकडे उंटावर बसून वेळ नको कादूस नुसता. माझा ब्लॉग पूर्ण होत आला आहे... :D

    ReplyDelete
  4. अमेय साळवी - फटका माणूस3/12/09 13:51

    अरे हो रे, पण तुला माझा सभाव माहित आहे ना रे आणि जसा वेळ मिळेल तसा मी लिहित आहे. पाहू कधी आणि कस होतंय.

    ReplyDelete