22.2.11

लेह बाईक ट्रीप – एक आठवण

लेह बाईक ट्रीपला आता जवळ-जवळ दिड वर्ष होऊन गेले. तरी हि मला या बाईक ट्रीपच्या आठवणी अजून ताज्या आहेत. याच ताज्या आठवणी मुळे इतक्या उशिरा का होईना पण मला हा ब्लोग पूर्ण करायला मिळाला. आज हि माझ्यात लेह बाईक ट्रीपच्या आठवणी जिवंत आहेत. कुठेही आयुष्यात या संदर्भात गोष्टी चालू झाल्या कि मी लगेच लेहच्या आठवणीत पोहोचतो. खरो-खर माझ्या साठी हि अजून पर्येंतची सर्वोत्तम ट्रीप होती. आम्ही सर्वांनी फार मज्जा केली.

मला या ट्रीप वर नुसती मज्जा करायला मिळाली असे नव्हे तर फार चांगले मित्र हि मिळाले. अभी, रोहन, मनाली, शमिका, पूनम आणि ऐश्वर्या फार पूर्वीपासून आम्ही एकत्र ट्रेकिंग करत होतोच. दीपाली आणि आदित्य बरोबर एखाद-दुसरा ट्रेक केला होता. पण आशिष, अमेय म्हात्रे, कुलदीप, शोबित, साधना आणि उमेश यांची तर या ट्रीप वर पहिल्यांदाच माझी ओळख झाली. पण या सर्वात, योगा-योगाने झालेली दीपाली बरोबरची मैत्री जास्त लागून राहिली. दिपाली आणि मी या ट्रीप वर केलेली मस्ती-मज्जा हि सर्वात मोठी आठवण राहून गेली. या आठवणी बरेचदा मला शब्दात मांडता पण येत नाही. याच आठवणीच्या पाठो-पाठ बर्याच आणखीन काही चांगल्या-वाईट आठवणी पण जागा करून राहिल्या आहेत. सुरवात करायची झाली तर, ट्रीप साठी निघताना मुंबई विमातळावर झालेली आमची फजेती. जम्मू पार्सल ऑफिस मधला नाट्यमय किस्सा. दल झील पाहून झालेली निराशा. श्रीनगरच्या गाडीचा किस्सा, बाईक पंचर झालेली, सोनमर्गची रात्र आणि पहाट. द्रासच्या अलीकडे पडलेला पूल आणि  तेव्हाचे किस्से. द्रास मेमोरीअलची भेट. कारगिलचा भेटलेला मराठी आर्मी ऑफिसर. दीपालीने मला, बाईकला आणि स्व:ताला दरीत पडताना वाचवलेला किस्सा. लेह्तील नबिच्या घरचा रहिवास. नबिचा मुलगा असीम. लेह आणि आजू-बाजूचा परिसर. सिंधू घाट पाहून झालेली निराशा. गिटार वाजताना फिरंग. चांग-ला पोस्ट मधला आर्मीचा जवान आणि मग तो झालेला मित्र. पेंगॉँग लेक आणि त्या पर्येंत पोहचण्याचा प्रवास. चांग-ला वरून लेह कडे परत येत असतानाचा माझा आणि दीपालीचा संगीत मय प्रवास. लेह मध्ये १५ ऑगस्ट साजरा केलेला. लेह परिसरातील १००० वर्ष जुनी गुंफा आणि परत लेह कडे येताना मी व उमेश बाईक वरून पडता-पडता वाचलो होतो ते. याचा रात्री अभीचे लेह मधील ग्रूप वर रागावणे. जगातील सर्वाच्च रस्ता (खारदुंग-ला). सिंधू नदीचे पाहायला मिळालेले रुद्र रूप. हिमालयातील वाळवंट (नुम्ब्रा वॅली). न पाहायला मिळालेले २ खुंट असलेले उंट. त्सो-मोरिरीला जाताना मध्ये आर्मी पोस्ट वर खाल्लेल्या शिव्या आणि मग काजू.बदाम, पिस्त्यांचे आदरतिथ्य. त्सो-मोरिरीला बिना जॅकेट बाईक चालवताना लागलेली थंडी. त्सो-मोरिरीला पाहायला मिळालेला सोनेरी ढग. त्सो-मोरिरीची आमची पार्टी. त्सो-मोरिरीची पहाट. पांगला जाताना तेनसिंगचा अति शहाणपणा. तेनसिंगने मला फसवलेले किस्सा. पांग पर्येंतची माझी झोप आणि आराम. माझ्या आरामा मुळे बाईक वरून पडलेला उमेश. पांगला सर्वानी मला घातलेल्या शिव्या. सरचूची रात्र आणि पहाट. रोहतांग अलीकडचा आणि  रोहतांगचा चिखल. मनालीतला आराम. भरतपूरची मारा-मारी. चंदिगड पूर्वीचा अभिचा झोपाळू प्रवास आणि त्या वेळी माझी व दीपालीची मस्ती. चंदिगड मधले कुणालचे चंदिगडी आदरतिथ्य. चंदिगड-अंबाला सुसाट बाईक पळवलेली. अंबालाचा महागडा नाष्टा. लोणीमय पराठा आणि दीपाली व मनालीचे वाकडे चेहेरे. दिल्लीतले वादळाने केलेले स्वागत आणि त्यामुळे झालेला ट्राफिक जाम. ट्राफिक जाम मुळे झालेले नुकसान (इंडिया गेटला न झालेला ट्रिपचा शेवट). दिल्ली रेल्वे स्टेशन वर बाईक लोड करताना झालेला त्रास. दिल्ली मेट्रो, दिल्ली युथ होस्टेल. दीपालीच्या शापा मुळे न झालेली शर्वरीची भेट. शर्वरीला फोन वरून घातलेली समजूत. दिल्ली ते मुंबई प्रवासातील मस्ती. मुंबई विमानतळावर परत भेटू असे म्हणत करणारा टाटा. 

आणखीन  काही फोटो स्वरूपातल्या आठवणी....






























हि बाईक ट्रीप आम्हा सर्वाना किती जवळची झाली असेल हे आता पर्येंत जाणवतच असेलच. तरीही माझ्या लग्नाचे निमित्त सोडले आणि एकदा-दोनदा मी, अभी-मानली सोडले तर कोणालाही बाईक ट्रीप नंतर भेटलेलो नाही आहे. या ट्रीप वर दीपाली आणि माझी एवढी गट्टी होऊन सुद्धा गेल्या दिड वर्षात आम्ही एकदाही भेटलो नाही. आमची फक्त १५ दिवसांचीच गहन मैत्री आणि अविस्मरणीय बाईक ट्रीपच्या आठवणी बऱ्याचश्या तुमच्या पुढे मांडून, मी लेह बाईक ट्रीपच्या लिखाणाचा प्रवास सुद्धा संपवत आहे.

3 comments:

  1. pangong la tuzya ani mazya parshavabhagavar truck madhye milalela prasad athavtoy ka? athavan ali ki ajunahi dukhata :P lol

    ReplyDelete
  2. प्रिय अमेय अतिशय धन्यवाद ..... त्या अविस्मरनीय आठवानिना पुन्हा उजाला दिल्या बददल. तू घेतलेल्या परिश्रमण बद्दल धन्यवाद...

    खरोखर अतिशय सुन्दर, अविस्मरनीय अशीही आपली ट्रिप होती.... आणि ट्रिप मधील मित्रानी ती अजुन सुन्दर जाली....

    आशा अजुन एक अनुभवाची वाट पाहत आहे....

    ReplyDelete
  3. अमेय... आपला खुद्द मोहिमेचा प्रवास.. मग माझा लिखाणातून झालेला प्रवास आणि पुन्हा मग तुझ्या लिखाणातून झालेला प्रवास ... आठवणी रे फक्त आठवणी... :) आजही डोळे बंद करून बसलो तर सर्व प्रवास जसाच्या तसा पूर्ण करीन मी इतका लक्ष्यात आहे... :)

    पुन्हा एकदा कधी तिथे जातोय असे झालाय मला... खास करून त्सो-मोरीरी आणि पेंगोंग-त्सो.

    ReplyDelete