
नाश्ता करून हॉटेलच्या बाहेर आलो तेव्हा आमचे स्वागत एका फायटर जेट विमानाने केले. काय आवाज होता तो भिनभिनणारा, आमच्या डोक्यावरून पास झाल्यामुळे. मस्त अनुभव होता तो. थोडा वेळ बाहेर मस्ती करत आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालो. आता माझे पोट भरल्या मुळे मी काय फार बाईक पळवत नव्हतो. बाकी सर्व बाईक्स आता पण सुसाट पळवत पुढे निघून गेले होते. मी आणि अभी मात्र मस्त आरामात मागाहून चाललो होतो. आता जसे-जसे दिल्लीच्या जवळ चाललो होतो तस-तसे आमची बाईक ट्रीप समाप्तीला येत आहे याची जाणीव होत होती. थोडेसे निराशादायक मूड मध्ये आम्ही शिरकाव करत होतो असे जाणवले. बाईक जास्त जोरात न पळवण्याचे कारण मूड तर होता, मला तर दिल्ली गाठूच नये असे वाटत होते. पण बाईक जास्त न पळवण्याचे मुख्य कारण असे होते कि, अंबाला पार करून जसे हरयाणा मध्ये घुसलो तेव्हा रस्त्या मध्ये सारखे “Speed Limit 70 km/Hr. You Are Under Vigilance. Haryana Police” असे बोर्ड दिसायला लागले होते. काल रात्रीच्या प्रसंगामुळे आता मी, अभी, मनाली आणि दीपाली एक ग्रुप झालो होतो. मस्त हळू-हळू गप्पा मारत कुरुकक्षेत्र पार केले. हळू-हळू म्हटले तरी ६०-७० च्या स्पीडने चाललो होतो. मस्त सरळ आणि चांगला रस्ता असल्यामुळे सलग एक लय मिळत होती बाईक चालवायला.पुढे एका पेट्रोल पंप वर थांबलो. अभीच्या आणि माझ्या बाईकला थोडेसे पेट्रोल पाजून घेतले आणि पेट्रोल पंपाच्या दारातच एका झाडाखाली असलेल्या टपरी वर चहा ओर्डर केला. चहा बने पर्येंत टपरीच्या बाजूला असलेल्या खाटे वर चौघे हि निवांत आडवे पडून राहिलो. इकडेच गप्पा मारत असता सर्वाना आज ट्रिपचा शेवटचा दिवस आहे म्हणून फार वाईट वाटत होते हे जाणवले.
चहा घेता घेता अभिने रोहन बरोबर फोन करून गाडी कुठे पोहोचल्याचे जाणून घेतले. ज्याने मुंबई वरून आमच्या बाईक लोड केल्या होत्या त्याला अभीने फोन लावून, दिल्लीच्या एका लोडचा फोन नंबर घेतला. अभीची फोना-फोनि चालू असे पर्येंत मी पण माझी दिल्लीची मैत्रीण शर्वरीला फोन लावून घेतला. तिने तर मला दिल्लीला आल्यावर आज भेटच असा आग्रह धरला आणि तिचा आग्रह मी तोडू शकलो नाही. पाहू दिल्लीत पोहोचल्या वर कसे काय जमते ते, असे बोलुन मी तिचे मन राखले. आता मला दिल्लीला जायचे काही तरी कारण मिळाले होते, नाहीतर मगास पर्येंत का चाललोय दिल्लीला असेच वाटत होते. चहा, फोना-फोनी आणि थोडावेळ निवांत आराम करून आम्ही पुढे निघालो. आता मला दिल्लीला लवकरात लवकर जायचे आहे हे जेव्हा दीपालीला कळाले तेव्हा, एक सारखी ती मला चिडवा-चिडवी करून त्रास देऊ लागली होती. आता गप्पा-मस्ती परत चालू झाली आणि मूड थोडा चांगला झाला होता. अशा गप्पान मध्ये एकदा-दोनदा रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी ब्रेक घ्यायचो आणि सटा-सट रस्ता कपात कर्नाल पार करून पानिपत गाठले.
बरेच अंतर पार केले म्हणून एक ब्रेक घेऊया आणि परत जरा भूक लागली म्हणून धाब्याजवळ थांबलो. वास्तविक तो फॅमिली हॉटेल सारखा मोठा ढाबा होता. फॅमिली ढाबा म्हंटला तर, ६०-७० एक टेबल मांडले असतील. फार खपाटीला पोट लागले अशी भूक नव्हती लागली, म्हणून आम्ही एक-एक आलू परोठा मागितला. जेवण येई पर्येंत फ्रेश होऊन घेतले आणि गप्पा मारत बसलो. अभी ने परत एकदा फोन करून घेतला. मस्त गरम-गरम परोठा घेऊन आला, तेव्हा आमचे सर्वांचे डोळे भिर-भिरले. दीपाली आणि मनाली जोरातच ओरडल्या “ एवढा मोठा परोठा”. मस्त परोठ्या वर २ चमचे लोणी घातले होते. मी तर मस्त एन्जोय करत परोठा खाल्ला, पण दीपाली मात्र जास्त लोण्यामुळे तोंड वाकडे करून खात होती. कसे-बसे परोठे संपवले आणि मस्त दुधाची चहा पिऊन दिल्लीच्या दिशेने निघलो. दिल्ली अजून ७० एक किलोमीटर वर होते. जसे पानिपत सोडले आणि दिल्लीच्या जवळ जायला लागलो तसे निसर्गाचे रूप पालटायला लागले होते. कडक उन जाऊन ढगाळ वातावरण झाले होते आणि जोरात वाराही सुटला होता. मजबूत धुरळा पण उडत होता हवे मध्ये, वादळी वाऱ्यामुळे. वादळी वाऱ्यातून आणि धुरळ्यातून आम्ही पुढे निघालो. दिल्ली पासून ३० एक किलोमीटर वर पावसाने आम्हाला गाठले. लगेच आम्ही बाईक बाजूला घेऊन रेनकोट घालून घेतले. मला तर स्व:ता पेक्षा कॅमेऱ्याची जास्त काळजी होती.

लोडरच्या सुचने प्रमाणे आम्ही सर्व पार्सल ऑफिस जवळ त्याची वाट पाहात राहिलो. आता फावल्या वेळे मध्ये आम्ही काय गप्प बसतो. चालू झाली आमची मस्ती. आता जास्त करून सर्वच मस्ती मध्ये शामिल झाली होते. पूनम, ऐश्वर्या, आदित्य, अमेय म्हात्रे, कुलदीप, आशिष, दीपाली, मनाली आणि मी जास्त करून मस्ती करत होतो. अभी मात्र संपूर्ण पणे बाईक लवकरात-लवकर लोड करायच्या म्हणून फोना-फोनी मध्ये घुसला होता. अधून- मधून मी ही त्याला मदत करत होतो. थोडा वेळ मस्ती आणि मधेच गरज लागली कि अभिला मदत. लोडर बरोबर झालेल्या शेवटच्या फोना-फोनी तून कळाले कि आम्ही चुकीच्या पार्सल ऑफिस जवळ आहोत. दिल्ली रेल्वे स्टेशनला ४ पार्सल ऑफिस आहेत.

आता आम्ही थोडे रिलॅक्स झालो होतो. बाईक लोड करणे फारच महत्वाचे होते. या बाईक लोडिंगच्या कामामध्ये बराच वेळ निघून गेला आणि भूक पण लागली होती. आता आमचे पुढे लक्ष होते ते जेवण आणि मग चाणक्यपुरी मधल्या युथ हॉस्टेल वर जायचे. आमच्या पैकी दिल्लीची कोणालाही काहीच माहिती नव्हती. मग मी शर्वरीला फोन लावून विचारून घेतले. चाणक्यपुरी युथ हॉस्टेल वर कसे जायचे आणि हॉस्टेल वर जायच्या आधी दिल्लीतले चम-चामित जेवण कुठे मिळेल हे हि विचारून घेतले. शर्वरीने दिल्ली मेट्रोने चाणक्यपुरीला जा आणि त्याच लाईने वर मध्ये राजीव चौकला उतरून कोनट प्लेस मध्ये जेवून घ्या असे सांगितले, पण जे काय करायचे आहे ते ११च्या आत. कारण ११ नंतर दिल्ली मेट्रो बंद होतात असे हि सांगितले. आता ९ च वाजले आहे आणि जेवण जेवून मग युथ हॉस्टेल वर जायचे सोडले तर दुसरे आमच्या कडे काहीच काम नव्हते असे बोलून आम्ही १० जन शर्वरीने सांगितलेल्या मार्गावर चालायला लागलो. दिल्ली रेल्वे स्टेशन वरून मेट्रो पकडली आणि राजीव चौक मेट्रो स्टेशन वर उतरलो. राजीव चौक वरून कोनट प्लेस हे फार लांब नसल्या मुळे पायीच गेलो. मस्त चालत मस्ती करत आणि दिल्ली शहराचे नीर-निराळे रूप पाहात आम्ही कोनट प्लेस मध्ये एक हॉटेल शोधून काढले. हॉटेल मध्ये बरीच गर्दी होती म्हणून बाहेरच मस्ती करत आमचा नंबर यायची वाट पाहात होतो. नंबर येई पर्येंत सर्वांनी आप-आपली फोना-फोनी करून घेतली. नंबर आल्यावर हॉटेल मध्ये शिरलो आणि पटा-पट जेवण ओर्डर करायला घेतले. पण आता मात्र सकाळच्या नाष्ट्या प्रमाणे अभी ने प्रत्येकाला स्वतंत्र ओर्डर करून नाही दिली. अभिने सर्वांच्या सहमतीने सामुहिक आणि सर्वांना पुरेल अशी व्यवस्थित ओर्डर केली. लगेचच जेवण आले आणि आम्ही पण लगेच हाणायला लागलो. सर्व फारच भुकेले होते. मस्त जेवून १० च्या दरम्यान आम्ही परत राजीव चौक मेट्रो स्टेशन वर होतो. आमचे आता पोट भरले होते म्हणून म्हणा ना किंवा मेट्रो स्टेशन वर गर्दी पण कमी होती म्हणून आम्ही जरा मस्तीच्या मूड मध्ये होतो. आम्ही सर्वच मेट्रो चा प्रवास पहिल्यांदा करत होतो म्हणून फार कुतूहल होते. कुतूहल दायक मेट्रोचा प्रवास करत आम्ही चाणक्यपुरी स्टेशन वर उतरलो आणि ऑटो रिक्षा पकडली युथ हॉस्टेल साठी. युथ हॉस्टेल वर रोहन आणि टीमने सर्वांचे गाडीतले सामान रूम वर ठेवून घेतले होते.
दिल्ली युथ हॉस्टेल खरो-खरच हॉस्टेल सारखे आहे, डबल बेडचे. प्रत्येकाला एक-एक बेड अलॉट करून रोहन ने ते आमचे बेड आधीच ताब्यात घेऊन ठेवले होते. आमच्या बरोबर हॉस्टेल मध्ये बाकी प्रवासी पण होते. आम्ही सर्व लगेच सामानाची आवरा-आवर करायला लागलो. आमच्या आवरा-आवरी मुळे बाकी सर्वाना फार त्रास होत होता. इतके दिवस आम्ही सर्व एकत्र होतो म्हणून आमच्या पैकी कोणा-कोणाचे तरी सामान इकडे-तिकडे कोणा ना कोणा कडे तरी होतेच. सामानाच्या आवरा-आवरीच्या आवाज मुळे बाकी सर्वांची चीर-चीर चालू झाली होती. पटा-पट आम्ही सामान आवरून घेतली. विमानात खाली टाकायच्या आणि वरती आपल्या बरोबर घायच्या बॅग्स वेगळ्या करून ठेवल्या. सामान आवरून सर्व झोपी गेले, फक्त रोहन, अभी आणि मी मात्र जागे होतो. वास्तविक बाईक ट्रीप संपली होती म्हणून ट्रीप संदर्भात कुठल्याही कामा साठी आम्ही जागे नव्हतो. रोहन आणि अभी, रोहनच्या विमानाचे तिकीटची वेळ बदलण्यासाठी लागले होते कॉल सेंटरच्या फोन वर आणि मी लागलो होतो शार्वारीशी फोन वर. मी तिला दिल्लीत आल्यावर नक्की भेटेन असे प्रॉमिस केले होते. किंबहुना शर्वरीच्या आईने मी घरी जाणार म्हणून स्वयंपाक पण केला होता. काही कर आणि तू ये असे तिचे मत होते. कितीही उशीर झाला तरी आमचे भेटायचे असे ठरले. मला दिल्लीतले काहीही माहित नाही म्हणून, शर्वरीने मेरू टॅक्सीचे नंबर देवून ठेवले होते. पण या बाईक लोड करण्याच्या कामात फारच उशीर झाला आणि मग सामानाची आवरा-आवर यात १२ वाजले. मी तिला आता भेटू शकत नाही म्हणून मी तिची समजूत घालायला लागलो. बराच वेळ तिची समजूत घालत आणि मग इकड-तिकडच्या गप्पा मारत २.३० वाजले ते कळलेच नाही. शेवटी शर्वरीचे समाधान करून तिचा निरोप घेतला आणि तसाच झोपली गेलो.
छान :-)
ReplyDeleteमाझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/