10.5.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - पहिला दिवस (मुंबई ते देवरुख)

०५ जून २०१०, ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी ४ वाजता उठलो आणि पटा-पट सर्व विधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. आम्ही निघे पर्येंत आई पण उठली.  ती आम्हाला सारखे सावकाश जा असे सांगत निरोप दिला. मी, राव व राजूने सर्व सामान बाईक वर लावले आणि घरी येऊन देवाच्या पाया पडून निघालो आम ची अर्धवट राहिलेली कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप पूर्ण करायला. आमच्या प्रथे प्रमाणे दोन्ही बाईक माझ्या कांदिवलीच्या बिल्डिंग बाहेर उभ्या केल्या, नारळ बाईकवरून ओवाळून फोडला आणि फोटो काढून ५.३० च्या दरम्यान निघालो.

कांदिवली वरुन निघालो ते जोगेश्वरी-विक्रोळी मार्गे मधे कुठेही न थांबता पनवेल पळस्पे फाटा गाठला. आज आमचा प्रवास फार लांबचा होतो आणि संध्याकाळ पर्येंत आम्हाला देवरुख पण गाठायचे होते. कारण उन्मेश सोलापूर वरून निघाला होता. तो संध्याकाळ पर्येंत देवरूखला पोहोचणार होता. थोडासा वेळ आम्ही आराम केला आणि लागलो गोवा रोडला. कर्नाळा पार केला पुढे टोल नाका पण पार करून पेणच्या दिशेने निघालो. पेणच्या २-३ किलोमीटर अलीकडे आम्हाला मजबूत ट्राफिक जाम लागले. हळू-हळु पेणच्या दिशेने आम्ही चाललो होतो. पेणच्या थोडेसे अलीकडे एका पुलावर तर आम्ही गाड्यांच्या मध्ये बराच वेळ अडकलो. जरा जायला जागा मिळाल्यावर कसे बसे आम्ही हळू-हळु आजु-बाजूने बाईक काढत रामवाडी पार करून वडखळ गाठले.

एवढ्या ८-१० किलोमीटरच्या ट्राफिक मुळे बराच वेळ गेला आणि त्यामुळे थकायला पण झाले. वडखळला आम्ही नाष्ट्या करता थांबलो. मस्त गरम-गरम वडा उसळ ऑर्डर केली. ऑर्डर येई पर्येंत आम्ही फ्रेश होऊन घेतले. मस्त आरामात नाश्ता केला आणि निघालो पुढे. बरेच दिवसांनी आम्ही मोठी बाईक ट्रीप करत होतो, म्हणून जरा आरामात चाललो होतो. वडखळ पार करून आम्ही नागोठणे येथे गोविंदा कामत कडे थांबलो.
आता जरा ऊनाचा त्रास होत होता. घरातून निघाल्या पासून आता आहा आमचा पहिला मोठा ब्रेक घेऊ असे ठरले. जास्त वेळ न घालवता लगेच फ्रेश होऊन घेतले आणि नाश्ता मागवला. पटा-पट नाश्ता हांडला आणि लागलो पुढे निघायच्या तयारीला. गोविंदा कामत काढून निघालो ते मध्ये कुठेही न थांबता थेट माणगावला थांबलो. आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मस्त एक मॅंगोला मारला आणि झालो बाईकवर परत स्वार. १ किलोमीटर पण पुढे गेलो नसू आणि रावने बाईक बाजूला घेतली. पाहिले तर त्याची बाईकला लावलेली साइलेनसर कडची बॅग साइलेनसरला घासून फाटली होती. मग आम्ही थोड्या करामती करून बॅग व्यवस्थित वरच्या बाजूला बांधून घेतली जेणेकरून परत साइलेनसरला लागणार नाही.

आता गर्मीचा मारा चालू झाला होता आणि या करामती मुळे बराच घाम आला. घाम पुसून घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मस्त आरामात इंदापूर-माणगाव पार करून महाडला विठ्ठल कामत येथे थांबलो. बाईक हॉटेल मधून दिसतील अशा लावल्या आणि घुसलो हॉटेलात. आता मात्र फारच गरम होत होते आणि होणारच उन्हाळ्यातल्या भर दुपारी रण-रणत्या ऊनात आम्ही भटकंतीला निघालो होते. आलटून-पालटून जाऊन फ्रेश होऊन घेतले आणि मिसळ मागवली. भरपेट मिसळ हांड्ल्या आणि थंडा पीत आराम करत बसलो. मी आईला फोन पण करून घेतला व महाड पर्येंत व्यवस्थित पोहोचलो असे कळवले. बराच वेळ आराम झाला असे म्हणत आम्ही निघालो पुढे.

महाड सोडले आणि पोलादपुर पार करून कशेडी घाट चढायला लागलो. कशेडी घाटात जरा झाडांची सावली बरयापैकी असते म्हणून जरा गार वाटत होते. कशेडी घाटाच्या माथ्यावर एक छोटासा ब्रेक घेतला आणि लागलो कशेडी घाट उतरायला. घाट उतरून आरामात आम्ही नातुनगर पार करत २ च्या दरम्यान भरणा नाक्याला आलो. भरण्या नाक्यावर त्यावेळेला आम्हाला बरेचसे हॉटेल उघडे दिसेच ना आणि अक्षताला सुसुला जायचे होते. मग एक मंदिर पहिले आणि अक्षाताची सोय करून दिली. मंदिराच्या बाहेर येऊन आम्ही एक-एक मॅंगोला मारला आणि निघालो पुढे. अजूनही ऊनाचा मारा लागत होता, नुसत्या घामाच्या धारा लागत होत्या. भरणे सोडले व मध्ये कुठेही न थांबता आम्ही परशुराम घाट पार करून चिपळूण गाठले

आता आम्हा सर्वांना परत भूख् लागली होती, म्हणून चिपळूण ला थांबलो. मस्त मिसळ पाव आणि चहा घेतला  व आराम करत बसलो. या वेळेला मात्र आम्ही बराच वेळ हॉटेलच्या आवारात बसून आराम करत होतो. आरामा बरोबर आमच्या गप्पा पण चालल्या होत्या. जवळ-जवळ ५ वाजत आले होते आणि आता जरा उन पण सारायला लागले असे पाहून आम्ही निघालो पुढे. चिपळूण सोडले आणि आता जास्त कुठे ही ब्रेक नको असे म्हणत आम्ही निघालो पुढे. मुंबई पासून २५०-२६० किलोमीटर बाईक चालवत आलो होतो, आता शेवट-शेवटला जरा थकायला होत होते आणि होणारच. ते ही उन्हाळ्यातल्या रण-रणनाऱ्या उन्हात आमचा प्रवास चालला होता. आता राव पुढे होता. चिपळूण पासून २५ एक किलोमीटर पुढे आलो आणि रावने रस्त्याला लागून मस्त एका झाडाची सावली पाहून बाईक थांबवली. मी रावला बाईक का थांबवली असे विचारले. त्याने मला बुड दुखते आहे, असे खुणेने सांगितले. एक छोटासा ब्रेक घेऊ असे ठरले.

बाईक लावली व तिकडेच उभे राहिलो व थोडा आराम करून घेतला. रावने उन्मेशला फोन लावला आणि कुठवर पोहोचल्याची विचारपूस केली. कळाले की उन्मेश केव्हाचाच देवरुखला पोहोचला आहे. याचा अर्थ मी व रावने असा काढला की आज उन्मेशने बाईक मजबूत पळवली असेल, नाहीतर एवढ्या लवकर सोलापूर ते देवरुख कस काय गाठले. या आमच्या विचारावर थोडीशी चर्चा चालू होती. तेवढ्यात रावला जवळच रस्त्याला लागून असलेल्या जुन्या वडाच्या झाडाच्या पारंब्या दिसल्या. त्याला ते दृश पाहून फोटो काढावासा वाटला. पटा-पट फोटो काढले आणि निघालो पुढे. आता सूर्य मावळणार हे जाणवायला लागले होते. आम्हाला अंधार पडायच्या आत जास्तीत-जास्त देवरुखच्या जवळ जायचे होते किमान संगमेश्वर पर्येंत तरी. उन्मेश पण देवरुखात आमची वाट पाहत होता.

आता आम्ही जरा जोरात सुटलो आणि कुठे हि न थांबता संगमेश्वर पार करून देवरूखच्या रस्त्याला लागलो. खालच्या कोसुंब जवळ मला आईचे चुलत मामा भेटले. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या आणि जे सुटलो ते थेट देवरुखला ६.३० च्या दरम्यान पोहोचलो. रावने उन्मेशला फोन करून सांगितले कि आम्ही घरी आलो आहोत. सर्वंनी आप-आपल्या घरी फोना-फोनी करून सांगितले की आम्ही सुखरूप देवरूखला पोहोचलो. आईने आमच्या शेजारच्या बंगल्यात कामाला असलेल्या मामांना सांगून घर साफ करून घेतले होते. आज आमचा प्रवास फार लांबचा होता. सर्वच फार थकलो होतो. अक्षतासाठी तर पहिलीच बाईक ट्रीप आणि एवढा लांबचा बाईकवरचा  प्रवास. पण हा प्रवास कितीही खडतर असो तिने आपली मानसिक तयारी केली होती, त्यामुळे तिला या प्रवासाचा काही त्रास जाणवत आहे हे तरी तिने आम्हाला जाणवून दिले नाही. तिला प्रवासाचा त्रास तर नक्कीच झाला असणार पण तिच्यातल्या प्रचंड सहनशील स्वभावा मुळे ती आम्हाला ते जाणवून देत नव्हती. किंभवाना ती मस्त हासत खेळत होती. पटा-पट सर्वांनी फ्रेश होऊन घेतले आणि थोडा वेळ टंगळ-मंगळ करून जेवायला पर्वती पॅलेस हॉटेल मध्ये गेलो. आमच्या गेल्या बाईक ट्रीपच्या वेळी २००५ ला देवरुख मध्ये एकच हॉटेल होते आणि ते पण बार वजा हॉटेल. फॅमिलीसाठी तसे व्यवस्थित नव्हते. पण आता ५ वर्षात देवरुख फार बदलले आहे, बरीच हॉटेल झाली आहेत आणि ते हि फॅमिलीसाठी. या ५ वर्षात राव आणि उन्मेश माझ्या पेक्षा जास्त देवरुख मध्ये राहीले होते. त्यांना देवरुख माझ्या पेक्षा जास्त माहिती होते. त्यानीच आपण पार्वती पॅलेस हॉटेल मध्ये जाऊ असे सुचवले होते. मग तिकडेच जाऊ असे एक मत झाले आणि ते घेऊन गेले. मस्त गार्डन मध्ये बसून जेवण ऑर्डर केले आणि गरम-गरम जेवण हाणून परत घरी आलो. थोडावेळ अंगणातच बसून गप्पा मारत करत होतो आणि पुदच्या प्रवास बद्दल चर्चा करीत राहिलो. उध्याच्या पण प्लान बद्दल चर्चा केली आणि सर्व आडवे पडलो.

No comments:

Post a Comment