
परमिट अभी कडे होते म्हणून त्याने फक्त आमच्या बाईकचे नंबर घेतले आणि तो परत मागे गाडी कडे गेला. तो पर्यंत आम्ही तिकडेच थांबलो होतो. तेवढ्यात मला वाघ डरकाळ्या फोडतोय असे जाणवायला लागले. पण वाघ मारायला आडोसा कुठेच नव्हता. आमची हि सुद्धा काही बाबतीत संकेतिक भाषा आहे. समजून घ्या. मग मी जवळच एक टेकाड चढून वाघ मारला. च्यामारी एवढस टेकाड चढलो तर धापा लागल्या होत्या , कशाला वाघ मारायला आलो असे वाटायला लागले होते. मी वाघ मारून खाली येई पर्येंत अमेय म्हात्रे जो पुढे गेला होता तो ५-६ किलोमीटर वरून परत मागे आला होता. मग आम्ही सर्व बाकीचांची वाट पाहत बसलो. तेव्हा मला समोरच एक गुम्पा दिसली. तेव्हा हा काढलेला फोटो.
थोड्या वेळाने मागाहून सर्व आले. या सर्वात ७ वाजत आले होते. आता पुढे कसे काय हे सर्व विचार मनात ठेऊन आम्ही सर्व पुढे निघालो. रस्ता जरा चांगला होता म्हणून आम्ही जरा वेग पकडला होता. लगेचच आम्ही "शक्ती" येथे येऊन पोहोचलो , अमेय म्हात्रे इकडनच कुठून तर परत आला होता. शक्ती ची उंची सुमारे १३५०० फुट आहे. न थांबता आम्ही पुढे निघालो. आम्हाला जराही वेळ दवडायचा नव्हता. आता आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा "चांग-ला"चा रस्ता चढायला लागलो होतो."ला" म्हणजे लढाकी भाषेत पास. रस्ता जरा चांगलाच होता. सरळ चढण मग यु टर्न , २-३ किलोमीटर परत सरळ चढण मग परत यु टर्न. मग परत चढण आणि परत यु टर्न. चढण-यु टर्न , चढण-यु टर्न असे करत आम्ही चांग-ला चढत होतो. अधून-मधून मी फोटो काढत होतो.
मधेच आम्हाला रस्त्यात वाहता नाला पण लागला. दीपालीला खाली उतरवून मी बाईक सिंगल सीटच काढली. सर्वच अडचणींवर मात करत आम्ही पुढे चाललो होतो. एक शेवटच चढण घेतले आणि दोन डोंगराच्या मध्ये चांग-ला आर्मी चेक पोस्ट ला पोहोचलो. चांग-ला ची उंची सुमारे १७५०० फुट आहे. फोटू-ला नंतर आम्ही गाठलेली सर्वोतच जास्त उंची होती. आर्मीची २ सिख लाइट इंफंट्रीचे ची पोस्टिंग आहे तिकडे. १७५०० फुटावर पर्यटकांना काही त्रास होऊ नये म्हणून आर्मीने बऱ्याच सोई करून ठेवल्या आहेत. त्यापैकी मला लक्षात आहे त्या या "मेडिकल एड , गरम चहा , पाणि , शौचालय " आणि सर्वात मुख्य म्हणजे अशा सर्व परिसरात रस्ता. खरोखर आर्मीचे आपल्यावर फार उपकार आहेत. आर्मीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. अति बर्फ पडून सुद्धा BRO रस्ता दुरुस्त करत असत आणि हे सुद्धा पहाना १७५०० फुटाच्या थंडीत आपल्याला थंडी लागू नये म्हणून गरम-गरम चहा.
पोस्टच्या आत मध्ये पेंगॉँग लेकच्या फोटो छापलेले टी-शर्ट , मग , ग्लासेस अश्या बऱ्याच गोष्टी विकायला होत्या. मी पण टी-शर्ट आणि मग घेतला. पण हे सर्व पेंगॉँग लेक पर्येंत कशाला बरोबर घायचे आम्ही परत याच मार्गाने येणार होतो. मी त्या जवानाला विचारले "ये अगर में आपके पास इधर हि रख दुंगा और फिर आते समय में लेकर जाऊ तो चलेगा क्या". त्याने " चलेगा" असे उत्तर दिले. मग काय पाहिजे तसे झाले. मी चहा घेऊन बाहेर आलो. दादा(आशिष) आणि उमेश बाहेरच फोटोग्राफी करत होते. त्याच्या बरोबर मी पण फोटोग्राफी करायला लागलो. तेवढ्यात आम्हाला पाहून एक मराठी काका लाडू आणि करंज्यांचा डबा घेऊन आमच्या कढे आले. लाडू आणि करंज्या खायला देत गप्पा मारयला लागले. मस्त २ करंज्या मी हाणल्या होत्या. वास्तविक त्यांनी आम्हाला एक-एकच दिली होती , पण गप्पा मारता-मारता पहिली संपली म्हणून मी काकान कडून "काका अजून एक मिळेल का" असे निर्लज्जा सारखी दुसरी ही मागून घेतली होती. माझ पहिल्या पासून हे धोरण आहे " निर्लज्ज साधा सुखम्". मग उमेश आम्हाला १७५०० फुटावर लाडू आणि करंज्या खायला मिळाले त्याचा फुटेज घ्याला लागला. पण तो अनुभव मला फार वेगळा होता. मुंबई पासून कईक हजार किलोमीटर दूर आणि ते हि तिसऱ्या क्रमांकाचा उच्च रस्ता (१७५०० फुटावर) आम्हाला प्रेमाने लाडू व करंज्या खायला घालून अपरिचित काकांनी तोंड गोड केले होते. मग आहे अनुभव वेगळा असणारच कि नाही.
परत याच मार्गाने येणार होतो म्हणून सर्वाना "फिर मिलेंगे" करत आम्ही निघालो. आता आमचे लक्ष होते चांग-ला दुसऱ्या बाजूला उतरून "पेंगॉँग-त्सो". " त्सो" म्हणजे लढाकी भाषेत सरोवर. आता ९.३० वाजले होते. चंग-ला वरून सुटलो आणि चंग-लाची दुसरी बाजू उतरायला लागलो. जास्त वेळ न लावता आम्ही " त्सोलटोक" पोस्टला पोहचलो. काही केल्या आम्हाला ११ च्या आत शैतान नाला पार करायचा होता. सर्व औपचारिकता पूर्ण केली आणि पुढे ४० किलोमीटर वर असलेली " तांगत्से " च्या दिशेने निघालो. "त्से" म्हणजे लढाकी भाषेत गाव. अधून-मधून काही वळण सोडली तर संपूर्ण रस्ता मस्तच होता. ६०-७० च्या वेगाने आम्ही बाईकस पळवत होतो.
काही वळण तर फारच छान होती. या परिसरात मला फोटोग्राफी करायला फार मजा आली. निसर्गच नीर-निराळ रूप पाहून माझे मन हरपून गेले होते. पुढे आणखीन बरीच निसर्गाची किमया पाहायला मिळणार या आशेवर मी बाईक चालवत होतो. १०.४५ च्या सुमारे आम्ही " तांगत्से " च्या पोस्टला पोहचलो . इकडे एक दुसर्या बाईक ग्रुपचा मुलगा उभा होता. तो त्याच्या सर्व बाईकसची नोंदणी आर्मीच्या जवानाला करून देत होता. आम्हाला पाहून आर्मीच्या जवानाने त्याला विचारले "ये आपके साथ हे". आम्हीच बोललो "नही". आमच्या मागाहून त्यांची सर्व मंडळी आली. मग आम्ही पण आपली नोंदणी केली आणि सर्व " पेंगॉँग लेक " च्या दिशेने निघालो. आता तर रस्ता सरळच होता. ४-५ किलोमीटर मधेच आम्हाला "मेजर शैतानसिंह" फायरिंग रेंज आणि त्यांचे बटालीयन लागले. या सर्व परिसराला " चुशूल घाटी " म्हणतात. तेवढ्यात मागाहून सुसाट काही बाईकस आम्हाला ऑवर टेक करून गेल्या. MH-12 च्या नंबर प्लेट पाहून पुण्याचे असल्याचे कळाले. नंतर हे हि कळाले कि, हि तीच लोक आहे जी आम्हाला काल पेट्रोल पंप वर भेटली होती. त्यातली काही लोक रोहन, कुलदीप आणि अमेय म्हात्रेच्या ओळखीची होती. मध्ये जास्त फोटो न काढता आम्ही पुढे सरकत होतो.

तेवढ्यात आर्मीच्या ट्रकने प्रत्येकी १०० रुपये घेऊन आम्हाला पलीकडे नेहतो असे सांगितले. चला आमचा प्रश्न मिटला. पटा-पट आम्ही सर्व ट्रक मध्ये चढलो. हा डांबराचा ट्रक होता, त्यामुळे खाली बुड टेकून बसूहि शकत नाही आणि दगडातून ट्रक उडणार म्हणून उभेही राहू शकत नही अशी अवस्था झाली होती. मग काय बुड न टेकवता ट्रकची कडा पकडून उकिडवे बसलो. ट्रक चालू झाला आणि आम्ही "गणपती बाप्पा मोरया"च्या जय-जयकार सुरु केला. कसला तो ट्रकचा प्रवास होता, ४ किलोमिटरच पण आयुष्यात कधीच न विसरणारा. ट्रक मधून पेंगॉँग लेकच्या काठावर उतरलो आणि मनात २ गोष्टी चालू होत्या. पाहिलं म्हणजे काय ते सरोवराच अप्रतिम सौंदर्य आणि दुसरा ट्रकचा अविस्मरणीय प्रवास. ट्रक आमच्या साठी १५-२० मीनटच थांबणार होता. मी तर नुसते पटा-पट फोटो काढत सुटलो होतो. पाण्यात एकदा पाय टाकण्याचा प्रयेंत केला पण ५ सेकंदा पेक्षा जास्त उभाच राहू शकलो नाही . बुडाला पाय लावून पळत बाहेर आलो. कसले थंड पाणी होते ते. सर्वांचीच कमी-अधिक फरकाने माझ्या सारखीच अवस्था होत होती. अप्रतिम सौंदर्य मी फार काय बोलूच शकत नाही. पहा काही फोटो.....

" पेंगॉँग लेक " हा १५००० फुटचा खऱ्या पाण्याचा सरोवर आहे. काय निसर्गाची अदभूत किमया आहे पहाना. हा लेक ६० टक्के चीन मध्ये आहे आणि ४० टक्के भारता कडे आहे. हिवाळ्यात हा लेक संपूर्ण पणे गोठून जातो. सर्वांनी पाण्यात उभे राहून फोटो काढून घेतले, पण माझी काय बाबा हिंमत होत नव्हती. शेवटी दीपालीच्या आग्रहा वरून मी ही पाण्यात उभा राहून फोटो काढून घेतला. बाकी सर्व मस्त पाण्यात खेळत होते आणि आप-आपली फोटोग्राफी करत होते. पण सर्वात मानले पाहिजे ते शोबित आणि दीपालीला, सुरवाती पासून पाण्यातच होते. मी जर इतका वेळ त्या थंड पाण्यात उभा राहिलो असतो तर पाय सुन्नच झाले असते. ट्रकवाल्याच चलो-चलो चालू झाले होतेच. मी इकडे काढलेले काही फोटो.... 
सर्वांचा एकत्र फोटो काढला आणि आम्ही परत ट्रक मध्ये बसलो. यावेळेला आमच्या बरोबर ३-४ फिरंग पण होते. सर्वानी आप-आपल्या जागा परत तश्याच प्रकारे पकडल्या. पण शोबित मात्र जरा निराळी पकडली. त्या फिरंग लोकांना आपला पार्श्व भाग दाखवत ओडवा उभा होता. फिरंग सहित आम्हा सर्वाना हे जाणवले आणि सर्वच हसायला लागलो. तेवढ्यात ट्रक सुटला आणि आम्ही परत "गणपती बाप्पा मोरया" असा जय-जयकर सुरु केला. मागे वळून लेक कडे पहिले तेव्हा असे वाटले कि फार कमी वेळ मिळाला आम्हाला इकडे. पण पुन्हा एकदा मी इकडे येईन आणि नुसत येईन नाही १ दिवस राहीन. असे मी माझ्या मनाशी बोललो आणि अजूनही मला तसेच वाटते. परत आता आम्ही शैतान नाल्या कडे आलो. तासा भरात पाण्याची पातळी वाढली होती. बाईक्स नाही घेऊन आलो ते बरे झाले ना. नाला पार केला आणि बाईक्स घेऊन परत लेहच्या दिशेने निघालो.

मला त्या प्राण्याचे नाव माहित नाही. पण आम्ही सर्वच सावकाश पणे त्याचे फोटो काढायला लागलो. तसेच दुसऱ्या बाजूला एक परदेशी स्थलांतरित पक्षी पण आम्हाला पाहायला मिळाला. त्याचे पण फोटो काढले आणि ३ च्या दरम्यान लेहच्या दिशेने निघालो. परत तीच सर्व गाव पार करत आम्ही चांग-ला च्या दिशेने चालत होतो. पण फरक मात्र एवढाच होता कि, आता आम्ही आरामात चललो होतो बाईक्स पळवत नव्हतो. मी तर क्षणा-क्षणाला फोटो साठी बाईक थांबवत होतो. पण या परिसरातला निसर्ग पण तसाच निराळा आणि सुरेख होता. सकाळी जे फोटो काढायचे होते पण काढले नव्हते ते मी आता काढत होतो. नजर फिरते न फिरते तेवढ्यात डोंगरांचे रंग बदलत होते.
फोटोग्राफी शिवाय मध्ये कुठेहि न थांबता आम्ही चांग-ला ला पोहोचलो. परत गरम-गरम चहा घेतला आणि आता हरप्रीत सिंग शी निवांत गप्पा मारत होतो. थोड्याशा वैयक्तिक गप्पा पण झाल्या. त्यावरूनच आम्हाला कळाले कि तो २ वर्षान पासून आपल्या घरी गेला नाही आहे. इकडेच पोस्टिंग वर आहे, पण आता काही दिवसांनी एक-दीड महिन्याच्या सुट्टीवर जाणार आहे. मानले पाहिजे या जवानांना यार...... दोन-तीन वर्ष आपल्या घरी जात नाही आणि वरून अशा तणाव पूर्ण परिस्थितीत काम करावे लागते. यांच्या बरोबर आम्ही फोटो काढले आणि लेहच्या दिशेने चांग-ला उतरायला लागलो. 
आज तसे खाण्याचे जरा हालच झाले होते. म्हणून पुन्हा एकदा हॉटेल ड्रीमलैंडलाच जायचे ठरले. मस्त बटर चिकन, बटर नाना, जीरा राइस हाणल आणि जेवण उरकून ११ वाजता परत हॉटेल रेनबो वर आलो. अभिने मीटिंग घेतली आणि सर्वांनाच जरा झापले , कारण सकाळी झालेल्या ४५ मिनट उशिरा मुळे आज आम्हाला लेक वर जास्त वेळ देता आला नव्हता. १५-२० मिनटान करता जवळ-जवळ ३०० किलोमीटरची रगड पट्टी झाली असे वाटत होते. पण पुढे असे होऊ नये म्हणून अभिचे झापणे गरजेचे होते. १२ वाजले तेव्हा सर्वानी एक-मेकांना स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्या दिल्या आणि सकाळी लवकर उठून लेह पोलो ग्राउंड वर परेड पाहायला जायचे असे ठरवून झोपी गेलो. पडल्या-पडल्या झोप लागली....काय सांगू तुम्हाला......


























